मेष : उधार दिलेले पैसे मिळण्याची शक्यता
कला आणि सिनेसृष्टीशी संबंधित लोकांचा फायदा होईल. नवीन जमीन किंवा घर विकत घेण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : तणाव वाढण्याची शक्यता
व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखा. तणाव वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ शकेल. एखाद्यास मदत करण्याची वेळ येऊ शकते.
मीन : आरोग्याच्या समस्या निर्माण होतील
आरोग्याबाबत समस्या कायम असतील. सावध राहा. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. राजकारणातील जबाबदारी वाढू शकतात. वाद टाळा. काही काळासाठी प्रवास करणे टाळा.
वृषभ : नव्या प्रेमसंबंधाची सुरुवात
नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मालमत्तेचा वाद संपुष्टात येऊ शकतो. परस्पर संबंध अधिक दृढ होतील. प्रतिष्ठित लोकांची भेट यशस्वी होईल. प्रतिस्पर्धींचा पराभव होईल.
मिथुन : विद्यार्थ्यांना अधिक परिश्रमाची आवश्यकता
विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या किरकोळ गोष्टीवरून वरिष्ठांसोबत वाद वाढू शकतात. नोकरीत अडचणी येण्याची शक्यता. प्रतिस्पर्धी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
कर्क : अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता
अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यामध्ये फायदा होईल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. अपत्याच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत निर्माण झालेला तणाव दूर होईल.
सिंह : करार रद्द होण्याची शक्यता
महत्त्वाच्या कामांमध्ये निष्काळजीपणा दाखवू नका. व्यावसायिक करार रद्द होण्याची भीती आहे. कायदेशीर बाबी त्रासदायक ठरू शकतात. सामाजिक कार्यात सक्रियता वाढेल. प्रियकरासोबत झालेली भेट सुखद असेल.
कन्या : मानसिक त्रास होईल
प्रतिस्पर्ध्यांचे मनोबल वाढताना पाहून मानसिक त्रास होईल. वादापासून दूर रहा. सासरच्यांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.
तूळ : कौटुंबिक वाद दूर होतील
कौटुंबिक वाद हळूहळू दूर होतील. कामाच्या शैलीमुळे वरिष्ठ खूश होतील. भावनिकदृष्ट्या मन प्रसन्न राहील. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. धार्मिक कार्यात रस वाढेल.
वृश्चिक : नोकरीचा शोध पूर्ण होईल
मनासारख्या नोकरीचा शोध पूर्ण होईल. कार्यालयाच्या ठिकाणी लोकप्रियता वाढेल. कामकाजातील व्यत्यय दूर होतील. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. जोखीम असणाऱ्या कामांमध्ये रस वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील.
धनु : आर्थिक नुकसान होईल
घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेऊ शकता. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. नोकरीच्या ठिकाणी परिवर्तनाची शक्यता आहे. जुन्या समस्यांचं समाधान होईल. धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे.
मकर : आदर आणि संपत्तीत होईल वाढ
आजारातून मुक्तता होईल. नवीन फायदेशीर संबंध तयार होतील. व्यावसायिक कंत्राट प्राप्त होतील. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा. आर्थिक परिस्थिती बळकट राहील.
अधिक वाचा :
कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या
जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली