मेष – आईवडीलांसोबत मदभेद होतील
आज आयात निर्यातीच्या व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. मनात निराशेचे आणि असमाधानाची भावना निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यातील रस वाढू शकतो. जोडीदाराचा भावनिक आधार मिळेल.
कुंभ – यश मिळेल
आज विद्यार्थ्यांना चांगल्या मार्कांसाठी चांगला अभ्यास करावा लागेल. राजकारणाच्या मदतीने कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत व्हिडिओ कॉल अथवा फोनने संपर्क साधाल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन- लाभ मिळेल
आज व्यवसायात लाभ मिळणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. अभ्यासात मन रमणार आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. घराच्या सजावटीत वेळ घालवा. घरातील लोकांसोबत असलेले मदभेद दूर होण्याची शक्यता आहे.
वृषभ – तणाव वाढण्याची शक्यता
आज मुलांमुळे तुमचे मन निराश होणार आहे. तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता आहे. राजकारणातील कामामध्ये व्यस्त राहाल. जुना आणि अर्धवट राहीलेला छंद जोपासण्यासाठी योग्य काळ आहे.
मिथुन – आईवडीलांची साथ मिळेल
संकट काळात आईवडील पाठीशी ठामपणे उभे असतील. विरोधकांचा त्रास कमी होणार आहे. प्रतिष्ठीत लोकांसोबत मैत्री होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणात निरनिराळी आव्हाने समोर येण्याची शक्यता आहे.
कर्क – अर्धवट राहीलेले छंद जोपासा
आज जुने छंद जोपासण्यासाठी योग्य काळ आहे. सामाजिक कार्यात यश मिळेल. जोखिम घेणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरात राहून वेळ घालवा.
सिंह – मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता
आज नातेवाईकांसोबत व्यवहार करू नका. नातेसंबंध खराब होण्याची शक्यता आहे. एखादी मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत वाद करणे टाळा. रखडलेली कामे पूर्ण करा.
कन्या – दिवसभर फ्रेश वाटेल
आज जीवनशैलीत बदलल्यामुळे आरोग्य सुधारेल. तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटणार आहे. जोडीदाराशी नाते सुधारणार आहे. काम घरातून करावे लागल्यामुळे मन आनंदी असेल. उत्साहात वाढ होणार आहे.
तूळ – जोडीदाराचा तणाव वाढणार आहे
आज तुमच्या जोडीदाराचा तणाव आणखी वाढणार आहे. मुलांना तुमच्या प्रेम आणि सहवासाची गरज आहे. व्यवहार करताना सावध राहा. व्यवसायासाठी प्रवास करणे टाळा. मेहनतीचे फळ चांगले मिळेल.
वृश्चिक – उत्पन्न वाढण्याची शक्यता
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदाचे असेल. अर्धवट राहीलेले छंद जोपासा. कामाच्या ठिकाणी बदल करावा लागेल. जीवनावश्यक गोष्टींसाठी खरेदी करावी लागेल.
धनु – कंबर अथवा खांदा दुखेल
आज दिवसभर लॅपटॉपवर काम केल्यामुळे तुमची कंबर अथवा खांदा दुखणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. व्यवसायासाठी प्रवास करणे टाळा.
मकर – मित्रांशी संपर्क होईल
आज जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधता येईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. साठवलेले धन कमी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल करावा लागेल. जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करावी लागेल. घरातून बाहेर जाणे टाळा.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान