मेष : गुडघे-पायांच्या दुखण्यानं त्रास
गुडघे किंवा पायांच्या दुखाण्यामुळे आपल्याला आज त्रास होऊ शकतो. खाणे-पिणे आणि नियमित दिनक्रमाची काळजी घ्या. राजकीय युतीचा फायदा व्यवसायात होईल. सासरहून आनंदाची बातमी मिळू शकते.
कुंभ : महागडी भेटवस्तू मिळू शकते
आईवडिलांकडून महागडी भेटवस्तू मिळू शकते. वाहन सुखात वाढ होईल. जोडीदारासोबत संस्मरणीय क्षण व्यतित कराल. परदेश यात्रेचा प्रस्ताव मिळू शकतो. रखडलेली काम पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल.
मीन : अभ्यासातील समस्यांमुळे त्रास
अभ्यासात वारंवार येणाऱ्या समस्यांमुळे त्रस्त असाल. व्यवसायतील निष्काळजीपणा महागात पडण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी निरर्थक गोष्टींपासून दूर राहा. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. लहान मुलांना वेळ द्याल.
वृषभ : कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल
जोडीदारासह तुम्ही लाँग ड्राईव्हवर जाण्याची शक्यता आहे. कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल. मंगल कार्यांचे नियोजन आखले जाईल. नवीन व्यावसायिक करार मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
मिथुन : विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. मार्केटिंग आणि सेल्ससंबंधित लोकांना कठीण परिस्थितींचा सामना करण्यात यश मिळेल. व्यवसायातील भागीदारीचा फायदा होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या
कर्क : कर्ज घेणे टाळा
अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. कर्ज घेण्याचा निर्णय टाळा. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अडचणी वाढतील. वादविवादापासून दूर रहा. रखडलेली कामे पूर्ण होतील.
सिंह :आरोग्य सुधारेल
तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढेल. गुंतागुंतीची प्रकरणे मार्गी लागतील. व्यावसायिक भागीदारीचा फायदा होईल. राजकारणातील जबाबदारी वाढण्याची शक्यता.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टिप्स)
कन्या : नात्यात तणावाची शक्यता
रागावर आज नियंत्रण ठेवा, अन्यथा नातेसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. सामाजिक कार्यादरम्यान अधिक धावपळ होईल. कायदेशीर प्रकरणात दिलासा मिळेल. व्यावसायिक सेमिनारमध्ये आपल ठसा उमटवण्यात यश मिळेल.
तूळ : मानसिकरित्या अशांत
आज तुम्ही मानसिकरित्या अशांत असू शकता. स्वभाव चिडचिडा असेल. संभाषणादरम्यान संयम बाळगा. परिवाराचे सहकार्य मिळेल. नोकरीनिमित्तानं प्रवासाचा योग आहे.
वृश्चिक : पूर्वीच्या गुंतवणुकीमुळे धनलाभ
आज नवीन योजनांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमुळे धनलाभ होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. अपत्यासंबंधीत कुटुंबात आनंद येईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
धनु : प्रभावशाली लोकांची भेट ठरेल फायदेशीर
जोडीदारासोबत खरेदी करण्यात वेळ जाईल. प्रभावशाली व्यक्तींची भेट घेणे फायद्याचे ठरेल. सामाजिक कार्यात सामील होण्याची संधी मिळेल. व्यवसायात नफा आणि विस्ताराची संधी मिळेल.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मकर : नवीन कामाचा आरंभ टाळा
नवीन कामाचा आरंभ करणं आजपासून टाळा. अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.