मेष : प्रेमसंबंधांना मार्ग मिळेल
एखाद्या व्यक्तीच्या सोबतीमुळे तुम्हाला चांगले वाटेल. प्रेमसंबंधांना मार्ग मिळू शकेल. परस्परांमधील मतभेद विसरून कामाला लागा, यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कामांमध्ये विश्वास वाढेल.
कुंभ : आजारपणामुळे त्रास होईल
हवामानाशी संबंधित झालेले आजार त्रासदायक ठरू शकतात. शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊ शकतात. आपणास भावनिकदृष्ट्या चांगले वाटेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रेमसंबंध रोमँटिक असतील.
मीन : मालमत्ता खरेदीची योजना
जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. व्यवहाराची कोणतीही मोठी समस्या सोडवली जाऊ शकते. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. नुकसान करणाऱ्यांपासून सतर्क राहा. रखडलेली कामे सहजपणे पूर्ण होतील.
वृषभ : करार रद्द होण्याची शक्यता
प्रोफेशनल लाइफमध्ये अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता. राजकारणात आवड अधिक वाढू शकते. प्रेमसंबंध घट्ट होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : मालमत्ता खरेदीची योजना
जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. नोकरीत पदोन्नती मिळेल. रचनात्मक कामात यश मिळेल. एखाद्या प्रकरणात गोंधळाची स्थिती निर्मिती होईल. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
कर्क : वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता
विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. एकाग्रता टिकवून ठेवा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. वादापासून दूर रहा. व्यवसायात चढ-उतार निर्माण होतील. प्रवास करणं टाळा.
सिंह : अशक्तपणा आणि थकवा जाणवेल
जास्त काम केल्यामुळे तुम्हाला शारीरिक अशक्तपणा आणि थकावा जाणवेल. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी मिळू शकते.
कन्या : सरप्राइझ मिळण्याची शक्यता
कौटुंबिक आणि आर्थिक प्रकरणांत यश मिळण्याची शक्यता. प्रियकराकडून एखादं सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे. असं काही तरी करा जेणेकरून मीडियामध्ये प्रसिद्धी मिळेल. एखाद्या संस्थेकडून सन्मान होईल.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
तूळ : महत्त्वपूर्ण काम पूर्ण होईल
व्यवसायात राजकारणाचा फायदा होऊ शकतो. रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढू शकेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
वृश्चिक : मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती
एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची किंवा हरवण्याची भीती आहे. वाहनाच्या देखरेखीवरील खर्च वाढू शकतो. जोडीदारासह एखाद्या सामाजिक कार्यक्रमात जाऊ शकता. रखडलेलं काम मार्गी लागेल.
धनु : तणावातून सुटका
आज तणावातून सुटका होईल. तब्येत ठीक राहील. व्यवसायात फायदा होईल. अपत्यांसंबधी चांगली बातमी मिळू शकेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. नवीन वाहन खरेदीची योजना आखली जाऊ शकते.
(वाचा : राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली)
मकर : तणावाची शक्यता
जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीती. वादग्रस्त प्रकरणे टाळल्यास समस्या उद्भवू शकतात. सामाजिक संबंधांवर परिणाम होतील असे कोणतेही काम करू नका. आर्थिक परिस्थिती ठीक राहील.