मेष – जोडीदाराशी मतभेद
आज तुमचे जोडीदाराशी भांडण होऊ शकते. मुलांमुळे चिंता वाढण्याची शक्यता. धुर्त लोकांपासून सावध रहा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात रस वाढेल. व्यापारात यश आणि नोकरीत पदोन्नती मिळेल. धनसंपत्तीबाबत आनंदवार्ता मिळू शकते.
कुंभ – व्यवसायात तोटा होऊ शकतो
व्यवसायात दुर्लक्षपणामुळे तोटा जाणवेल. आर्थिक समस्या निर्माण होतील. कर्ज घेऊ नका. उधारी बुडण्याची शक्यता आहे. घरातून भावनिक आणि आर्थिक मदत मिळेल. रचनात्मक कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.
मीन- आईच्या आरोग्यात सुधारणा होईल
आईची बिघडलेली तब्येत सुधारेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगली संधी आहे. जुन्या ओळखी लाभलायक ठरतील. कोर्ट-कचेरीतून सुटका होईल. आर्थिक बाजू कमकुवत होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल.
वृषभ – वृद्धांना कंबर आणि गुडघेदुखीचा त्रास
आज घरातील वृद्ध लोकांना कंबर आणि गुडघेदुखी जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यायवसायिक प्रोजेक्ट मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खूष होतील. सामाजिक सन्मान मिळू शकतो. व्यवहाराच्या समस्या सुटतील.
मिथुन – आर्थिक समस्या दूर होतील
एखाद्या नवीन कामामुळे मन उत्साहित होईल. आर्थिक समस्या सुटू शकतात. राजकारणील लोकांना फायदा होईल. चल-अचल संपत्ती मिळू शकते. आधुनिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रवासाला जाण्याची संधी मिळेल.
कर्क – कुटुंबाकडून कौतूकाची थाप मिळेल
आज तुमचा दिवस प्रशंसेचा असेल. घरातून तुमच्या वागण्याचे कौतूक होईल. सकारात्मक विचारशैलीचा फायदा होईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळाल्याने खूष व्हाल. जुने नातेसंबंध पुन्हा चांगले होतील. व्यावसायिक संबंध सुधारतील. नोकरीतून आनंद मिळेल.
सिंह – कामाच्या ठिकाणी वाद टाळा
आज कामाच्या ठिकाणी वाद करणे टाळा. युवांना करिअरची चांगली संधी मिळेल. व्यवसायात चढउतार येतील. अचानक एखादा लांबचा प्रवास करावा लागेल. राजकारणातील कामे वाढण्याची शक्यता आहे.
कन्या – शेअर बाजारात फायदा होईल
आज तुम्हाला शेअर बाजारात चांगला फायदा होईल. आईकडून एखादे महागडी भेट मिळेल. कामाच्या ठिकाणी मन रमल्याने आनंद मिळेल. इतर लोकांवर अंधविश्वास ठेऊ नका. कामानिमित्त तुम्हाला धावपळ करावी लागेल. विरोधक त्रास देतील.
तूळ – विद्यार्थ्यांना चुकीची संगत मिळेल
आज विद्यार्थी चुकीच्या संगतीत फसले जाण्याची शक्यता आहे. घाईत कोणत्याही कामाची सुरूवात करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. राजकारणातील प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहार आणि विहारावर नियंत्रण ठेवा. व्यावासायिक वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील. जोडीदाराकडून भावनिक त्रास जाणवेल. कोर्टकचेरीतून सुटका होईल.
धनु – भांवडांशी नाते सुधारेल
आज तुमचे भांवडांशी नाते मजबूत होईल. जुनी मैत्री प्रेमात बदलू शकते. कामाच्या ठिकाणी अधिकारी मदत करतील. जोडीदाराच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. परदेशी जाण्याचा योग आहे.
मकर- विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल
विद्यार्थी आज मनापासून अभ्यास करतील. कौशल्याने काम केल्याने अधिकारी खूष होतील. व्यवसायात एखादे काम पूर्ण करण्यासाठी उत्साह वाढेल. राजकारणातील पकड मजबूत होईल. रचनात्मक कामांमुळे लोकप्रियता वाढेल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव