मेष – कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता
आज तुमच्या एखाद्या खास नात्यामुळे तुमच्या घरातील वातावरण बिघडणार आहे. कौटुंबिक तणावाची परिस्थिती निर्माण होईल. विरोधक शांत असतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.
कुंभ – आर्थिक संकट डोके वर काढण्याची शक्यता
आज आर्थिक संकटाच्या विचारामुळे निराश व्हाल. कर्ज घेणे टाळा. जुन्या आठवणींमुळे मनात भिती निर्माण होऊ शकते. मात्र अचानक आनंदाची बातमी मिळाल्याने खुश व्हाल. रचनात्मक कार्यातील रस वाढेल.
मीन- आरोग्य उत्तम राहील
आज तुमच्या घरातील वातावरण आरोग्यदायी असेल. प्रदूषित वातावरणापासून सुटका मिळेल. घरातून काम करावे लागेल. मुलांचा रचनात्मक कार्यातील रस वाढेल. वाहन चालवताना सावध राहा.
वृषभ – व्यवसायात प्रगती होईल
आज तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एखादे मोठे व्यायसायिक काम मिळणार आहे. घरातील सजावटीच्या कार्यात दिवसभर व्यस्त राहाल. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन – आरोग्याची काळजी घ्या
जास्त वेळ कंप्युटर अथवा लॅपलॉपवर काम केल्यामुळे तुमची तब्येत बिघडणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नात्यातील वाद दूर होतील.
कर्क – प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला प्रेमाचा पस्ताव येण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये अनुभवी लोकांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल.रचनात्मक कार्यात लोकप्रियता मिळेल. देणी घेणी सावधपणे करा.
सिंह – व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता
आज एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या व्यवसायात अडचण येण्याची शक्यता आहे. तुमच्यामधील सुप्त गुणांना उजाळा देण्याची चांगली संधी आहे. मुलांसोबत संगीताची कला जोपासाल. आर्थिक स्थिती चांगली असेल.
कन्या – गुंतवणूकीची योजना आखाल
आज व्यवसायात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अध्यात्म आणि योगातील रस वाढेल.
तूळ – मार्केटिंगच्या व्यवसायातील अडचणी वाढतील
आज सेल्स मार्केटिंग या व्यवसायातील अडचणी वाढणार आहेत. मेहनत जास्त आणि लाभ कमी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. वाहन चालवताना सावध राहा. एखादी आनंदाची बातमी मिळेल.
वृश्चिक – आईची तब्येत बिघडण्याची शक्यता
आज तुमच्या आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. स्वभावात चिडचिडेपणा वाढेल. कुटुंबासोबत रचनात्मक कार्यातील योजना आखाल. वाहन चालवताना सावध राहा. खर्चात वाढ होणार आहे.
धनु – नातेसंबध सुधारतील
आज तुमच्या नात्यातील जवळीक वाढणार आहे. घराच्या स्वच्छता आणि सजावटीत वेळ घालवाल. विरोधकांचा त्रास कमी होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. नियोजित कामे पूर्ण होतील.
मकर -व्यवसायात मनासारखे यश मिळेल
विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. घरातून बाहेर पडू नका. कामातील नाविण्यपूर्ण शैलीमुळे अधिकारी खुश होतील. सहकारी व्हिडियो कॉलद्वारा संपर्क साधाल. घरात साफ सफाई करण्यावर भर द्या.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात