ADVERTISEMENT
home / भविष्य
8 एप्रिल 2020चं राशीफळ, कर्क राशीसाठी दिवस आर्थिक लाभाचा

8 एप्रिल 2020चं राशीफळ, कर्क राशीसाठी दिवस आर्थिक लाभाचा

मेष – शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता

आज तुम्हाला शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता आहे. रखडलेले कार्य जलद गतीने पूर्ण होईल. सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलने संवाद साधाल. नवीन योजना आखण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे.

कुंभ – नवीन नातेसंबध निर्माण होतील

आज इंटरनेटवरून तुमचे नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. भावंडामधील मतभेद दूर होतील. योग आणि अध्यात्मातील रस वाढणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. विनाकारण खर्च करणे टाळा. 

ADVERTISEMENT

मीन- विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता

आज विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. 

वृषभ – जुन्या आजारपणातून सुटका मिळेल

आज जुन्या आजारपणातून सुटका मिळेल. मुलांना स्वयंपाकात आवड निर्माण होऊ शकते. व्यवसायातील स्थिती मजबूत होईल. देणी घेणी सांभाळून करा. अध्यात्म आणि योगामधील रस वाढणार आहे. 

ADVERTISEMENT

मिथुन – मित्रांशी वाद होण्याची शक्यता

आज तुमचे तुमच्या मित्रमंडळींसोबत वाद होण्याची शक्यता आहे. सध्या देणी घेणी करणे टाळा. व्यवसायात स्थिरता येण्याची  शक्यता आहे. सरकारी नियमांचे पालन न केल्यास समस्या वाढू शकतात. 

कर्क – धनसंबधी एखादी आनंदाची बातमी मिळेल

आज तुम्हाला पैशांबाबत एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढणार आहे. घरात कॅंडल लाईट डिनरचा प्लॅन कराल. विरोधकांचा त्रास जाणवणार आहे. प्रिय व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधता येणार आहे. 

ADVERTISEMENT

सिंह –  तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात संगीत मैफीलीचं आयोजन कराल. आर्थिक क्षेत्रात योजनापूर्वकच काम करा. एखादे अर्धवट राहीलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कन्या –  जोडीदाराशी नाते मजबूत होईल

आज तुमचे जोडीदारासोबत नाते मजबूत होणार आहे. घरातील सजावटीवर लक्ष केंद्रित करा. मुलांची आणि घरातील वृद्धांची काळजी घ्या. गरजेपेक्षा अधिक वाणसामान भरून ठेवू नका. घराबाहेर न पडणं या काळात योग्य राहील. 

ADVERTISEMENT

तूळ -दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल

आज एखाद्या सरकारी कामात अडचण येण्याची शक्यता आहे. घरात राहून ऑफिसचे काम करावे लागू शकते. प्रिय व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधाल. आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक – उत्पन्नाचे नवे साधन मिळेल

आज तुम्हाला उत्पन्नाचे नवे साधन मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाणे टाळलेलेच बरे राहील. घरात मंगल कार्याची योजना आखाल. मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराशी नाते मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढणार आहे. 

ADVERTISEMENT

धनु – पदोन्नतीत अडचणी  येण्याची शक्यता

आज तुमची पदोन्नती रखडण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत समस्या येऊ शकतात. एखाद्या मदत केल्यामुळे मन आनंदी होऊ शकते. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर – आरोग्य बिघडण्याची शक्यता

आज अचानक तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आहाराची आणि दिनक्रम नियमित करण्याची काळजी घ्या. दुर्लक्षपणा करणे महागात पडू शकते. कामाच्या ठिकाणी परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी.

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

ADVERTISEMENT

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

06 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT