ADVERTISEMENT
home / भविष्य
8 फेब्रुवारी 2020चं राशीफळ,  मेष राशीला पदोन्नती मिळण्याची शक्यता

8 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मेष राशीला पदोन्नती मिळण्याची शक्यता

मेष : पदोन्नतीची शक्यता
आर्थिक दिशेनं केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. रचनात्मक कामांमध्ये वाढ होईल.

कुंभ : प्रकृतीमुळे हैराण
सर्दी-खोकल्यामुळे तुम्ही आज हैराण असण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यामुळे बिघडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

मीन : प्रेम प्रस्ताव मिळतील
ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, त्याच्याकडून सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी आपली क्षमता सिद्ध करण्यात यश मिळेल. सामाजिक संपर्क वाढेल.

वृषभ : आर्थिक संकट निर्माण होऊ शकते
कमी वेळेत अधिक कमाई करण्याच्या लालसेमध्ये फसू नका. आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पैशांच्या देवाणघेवाणीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. निरर्थक वादापासून दूर राहा. वाहन संबंधी समस्या उद्भवू शकतात.

ADVERTISEMENT

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : आनंदाचा अनुभव घ्याल
आज तणावमुक्त आणि आनंदाचा अनुभव येईल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. अपत्यासंबंधीच्या समस्या दूर होतील.

कर्क : एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावू नका
कोणाच्या प्रेमसंबंधांमध्ये डोकावू नका. त्यामुळे नाती फिसकटण्याी शक्यता आहे. कौटुंबिक प्रकरणात राग निर्माण होऊ शकतो. प्रॉपर्टी संबंधी निर्णय तातडीनं घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी विरोधकांकडून सावध राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

सिंह : कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग
तुम्हाला कौंटुबिक संपत्तीचा कायदेशीर अधिकार मिळण्याचा योग आहे. सुखसुविधांच्या साधनांमध्ये वाढ होईल. व्यावसायिक करार लाभदायक असतील. प्रेमात त्रिकोणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मित्रांसोबत आनंद साजरा कराल.

ADVERTISEMENT

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)

कन्या : अपचनाची तक्रार
आज अपचनाचा तक्रार उद्भवू शकते. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये हलगर्जीपणा करू नका. सहकर्मचारी तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक सन्मान वाढेल. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन सहकारी मिळू शकतो.

तूळ : एखाद्या व्यक्तीला आकर्षित करू शकता
तुमच्या प्रेमळ आणि काळजी करणाऱ्या व्यवहारामुळे एखाद्याला तुम्ही आपल्याकडे आकर्षित करू शकता. नवीन कामाच्या सुरुवातीस कुटुंबाचं सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन सहकर्मचारी मिळतील. नवी संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते.

वृश्चिक : सहकर्मचाऱ्यासोबत वाद वाढण्याची शक्यता
सहकर्मचाऱ्यासोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अधिक कष्ट करण्याची आवश्यकता आहे. जवळच्या मित्राच्या मदतीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्यासंदर्भात सतर्क राहा. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

ADVERTISEMENT

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)

धनु : धन लाभाचा योग
अचानक धनलाभाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी आवडीचे काम मिळू शकते. व्यावसायिक भागीदारीमुळे नफा होईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. जोडीदारासोबत परदेश यात्रा होण्याची शक्यता आहे.

मकर : करार रद्द होऊ शकतात
व्यवसायात निष्काळजीपणा करू नका. करार रद्द होण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय बदलण्याची वेळ येऊ शकते. स्वतःमधील विशेष गुण पारखण्याचा प्रयत्न करा. आरोग्य ठीक राहील. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये हलगर्जीपणा करू नका.

 

ADVERTISEMENT
05 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT