ADVERTISEMENT
home / नातीगोती
how-dangerous-it-is-to-be-involved-in-a-toxic-relationship

Toxic Relationship मध्ये गुंतून राहणं किती आहे धोकादायक, काय करायला हवं

कोणत्याही नात्यामध्ये प्रेम अत्यंत गरजेचे असते. पण काही प्रेमाचे नाते हे एखाद्या विंचवासारखे असते. जे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशा स्वरूपाचे असते. यालाच Toxic Relationship असं म्हणतात. खरं तर अशा नात्यात गुंतून राहणं हे त्या व्यक्तीच्या मानसिक समाधानासाठी अत्यंत त्रासदायक ठरतं. समोरच्या माणसाशी नक्की कसं वागायचं आणि कसंही वागलं तरी समोरचा माणूस आपल्याला गृहीत धरणार अथवा आपल्याशी भांडणारच आहे आणि कोणत्याही गोष्टीचा शेवट हा भांडणामध्येच बदलणार आहे अशी जेव्हा वेळ येते तेव्हा आपलं नातं हे संपण्याच्या वाटेवर आहे हे समजून घेणे आणि त्या नात्यातून वेळेवर बाहेर पडणेच योग्य आहे. अन्यथा आयुष्यात नैराश्य, त्रास आणि दुःख याशिवाय अजून काहीही शिल्लक राहात नाही. अशा या नात्यातून बाहेर पडण्यासाठी नक्की काय करायला हवं हेच काही जणांना कळत नाही. अशाच काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 

स्वतःला वेळ द्या

जोडीदार देत नसेल वेळ, तर वापरा या सोप्या ट्रिक्स

आपण ज्याच्यावर प्रेम करत आहोत, त्या व्यक्तीला आपल्याबद्दल तितकंच प्रेम वाटत आहे की नाही याची पडताळणी करा. केवळ त्या व्यक्तीसाठीच आपलं आयुष्य आहे असं न समजता आपल्या भावनांना वाट करून द्या. मित्रमैत्रिणींबरोबर फिरा, गप्पा मारा, बाहेर जा आणि स्वतःला वेळ द्या. कधी कधी एकट्याने फिरणंदेखील आणि एकटं राहणंदेखील चांगलं असतं. असं नातं जर तुम्हाला मानसिक त्रास अधिक देत असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःला वेळ द्यायला हवा. 

वेळीच यातून मोकळं होण्याचा प्रयत्न करा

तुम्हाला जर सतत भांडणं नको असतील आणि सतत त्याच त्याच गोष्टींमुळे विचार करून मानसिक थकवा येतद असेल तर तुम्हाला वेळीच यातून मोकळं होण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. स्वतःच्या मनाची समजून काढून स्वतःला आवर घाला आणि हे नातं आपल्यासाठी नाही, यातून आपल्याला कोणतंही मानसिक सुख मिळत नाहीये याची योग्य वेळीच तुम्ही पडताळणी करून यातून मोकळं होण्याचा प्रयत्न करा. त्यातच तुमचं भविष्य अधिक चांगलं आणि सुखकर होईल. त्यावेळी कदाचित तुम्हाला अत्यंत त्रास होईल. पण यातून बाहेर पडल्यानंतर काही काळातच आपण किती सुखी आहोत याची जाणीव तुम्हाला होऊन आपण काय चूक करत होतो याचीही जाणीव होईल. 

अधिक वाचा – चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी करायलाच हव्यात

ADVERTISEMENT

चुकीच्या व्यक्तीला सतत संधी देण्यापेक्षा स्वतःला संधी द्या

आपल्या आयुष्यात असणारी व्यक्ती ही आपल्यासाठी चुकीची आहे हे एकदा समजल्यानंतर सतत त्या व्यक्तीला माफ करत आणि आपले प्रेम आहे अशी मनाची समजूत घालत जगण्यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका. चुकीच्या व्यक्तीला संधी देऊन काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही त्यापेक्षा आपलं स्वतःचं आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी स्वतःला त्या व्यक्तीपासून दूर करण्याची संधी द्या. जेणेकरून तुम्ही या नको असलेल्या नात्यातून बाहेर पडून नव्याने जगू शकाल आणि घुसमटत राहणार नाही. 

पुन्हा पुन्हा जुन्या आठवणीत रमू नका 

कोणतंही नातं हे लगेच टोकाला जात नाही. त्यात आधी चांगल्या आठवणीही असतात. पण जेव्हा तुमचं नातं हे टोकाला जातं अथवा Toxic Relationship म्हणून जाणवू लागतं. तेव्हा, अगदी चांगल्या आठवणी असल्या तरीही त्यामध्ये अधिक गुंतून राहू नका. जुन्या चांगल्या आठवणीत रमल्यामुळेही तुम्ही समोरच्या व्यक्तीपासून पटकन दूर होऊ शकत नाही आणि मग याच नात्यात गुंतून राहता. त्यामुळे हे नातं अधिक गुंतागुंतीचं होत राहातं आणि त्यातून बाहेर पडणं तुमच्यासाठी अत्यंत कठीण होऊन बसतं.

अधिक वाचा – ब्रेकअप (Breakup) नक्की का होतं, ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

मानसिक तणाव येत असेल तर त्वरीत सावरा!

अत्यंत दुःखदायक आणि त्रासदायक असं हे नातं असेल आणि सतत भांडणं आणि एकमेकांशी अजिबात प्रेमाने न बोलणं अथवा एकमेकांना समजून न घेणं अशी अवस्था असेल तर नक्कीच मनावर सतत तणाव येत राहातो. मानसिक तणाव हा कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यासाठी अजिबातच योग्य नाही. तुम्हालाही नात्यात जर मानसिक तणाव येत असेल, नात्यातील रोमान्स कमी झाला असेल तर तुम्ही त्वरीत सावरा आणि यामुळे शरीरावर परिणाम होत आहे याची जाण ठेऊन वेळीच वेगळं होण्याचा निर्णय घ्या. 

ADVERTISEMENT

कोणतंही नातं हे टिकणारं नसेल तर ते ताणण्यात अजिबातच स्वारस्य ठेऊ नका. कारण त्यामुळे तुम्हालाच त्रास होणार आहे हे जाणून घ्या. असं हे धोकादायक नातं वेळीच सोडा आणि स्वतःला सावरा!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT