ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
प्रदूषणामुळे तुम्ही दिसू शकता वयाआधीच म्हातारे

प्रदूषणामुळे तुम्ही दिसू शकता वयाआधीच म्हातारे

दिल्‍लीतील सध्याची अवस्था इतकी वाईट आहे की, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना मोकळ्या हवेतही श्वास घेणं कठीण जात आहे. धूळ आणि धूरामुळे दिल्लीतील लोकांच्या दमा असलेल्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. प्रदूषण असंच वाढत राहीलं तर मुंबईतही अशी परिस्थिती उद्भवेल. कारण प्रदूषण फक्त तुमच्या आरोग्यावरच नाहीतर चेहऱ्यावरही परिणाम करते. प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्याशी धूळ, माती आणि हवेतील घाणीचा संपर्क होतो. या समस्या पाहायला छोट्या वाटतात पण याचा परिणाम मात्र नंतर दिसून येतो. चला जाणून घेऊया प्रदूषणामुळे चेहऱ्याला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

  • वायु प्रदूषणाने होऊ शकतो एक्झिमा 

एक्झिमा किंवा स्किन इरिटेशन, त्वचेची जळजळ, खाज आणि रेशेस येतात. प्रदूषण वाढल्यावर चेहऱ्याचं दुहेरी नुकसान होतं. खरंतर सूर्याच्या यूव्ही किरणांच्या संपर्कात आल्यावर त्वचेचं टेक्श्चर आणि आरोग्य बिघडण्याची चिंता असते. याशिवाय धूळ-घाणयुक्त हवेने आणि धुराने तुमची त्वचा आजारी होते. 

  • वयाआधीच दिसू लागता म्हातारे 

अनेक रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, जे लोकं शहरात राहतात त्यांच्या चेहऱ्यावर वय वाढण्याआधीच म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. एजिंगच्या खुणा जसं डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स आणि रिंकल्स दिसू लागतात. धूळ आणि घाणीमुळे त्वचेवरील पोर्स बंद होतात. यामुळे त्वचेवर फोडं, पिंपल्स, पिंगमेंटेशन आणि डलनेस दिसू लागतो. यामुळे व्यक्ती वय वाढण्याआधीच म्हातारी दिसू लागते. 

ADVERTISEMENT
  • प्रदूषणाने वाढतो कोरडेपणा

त्वचेच्या कोरडेपणामागील एक कारण प्रदूषणसुद्धा आहे. प्रदूषित हवा त्वचेतील आर्द्रता कमी करते, ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. प्रदूषण आणि कोरडेपणामुळे त्वचेची लवचिकता कमी होते. परिणामी, त्वचा जुनी आणि निस्तेज दिसते. चेहऱ्याची चमक जाऊन एकदम खराब दिसू लागतो. 

  • डँड्रफ आणि कोरडे केस 

शरीराच्या त्वचेसोबतच केसाच्या त्वचेवर आणि स्कॅल्पवरही प्रदूषणाचा परिणाम होतो. हवेसोबतच केमिकल्स आणि धूळ-मातीचा केसाच्या त्वचेवरील पोर्स आणि केसांना चिकटते. यामुळे स्कॅल्पला खाज, फोडं आणि डँड्रफसारख्या समस्या जाणवतात. यामुळे केस तुटू लागतात.

या समस्यांवर करा हे उपाय

  • अशा परिस्थितीत चेहऱ्याला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा चेहरा धुवा. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल. 
  • त्वचा मॉईश्चराईज राहिल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी दिसतात. 
  • याशिवाय चांगल्या क्लींजरच्या वापराने दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवा. याशिवाय झोपण्याआधी चेहऱ्यावरील मेकअप नक्की काढा. 
  • डाएटमध्ये हेल्दी व्हिटॅमीन आणि मिनरल्सयुक्त पदार्थांच्या समावेश करा. जसं ताजी फळं, भाज्या, नट्स हे अँटी-ऑक्सीडंटयुक्त असतात. याशिवाय त्यांच्यात व्हिटॅमीन ए, सी आणि ई चं प्रमाणही भरपूर असतं. हे चेहऱ्याच्या स्कीनसाठी खूपच फायदेशीर असतं. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
19 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT