ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
अशी करा ऑनलाईन बर्थडे पार्टी

अशी करा ऑनलाईन बर्थडे पार्टी

वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. लहानगे काय आणि मोठे काय सगळ्यांनाच वाढदिवस शुभेच्छा संदेश देणं, गिफ्ट्स आणि मित्रपरिवारांसोबत पार्टी करायला नक्कीच आवडतं. पण सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे सगळंच बदललं आहे. त्यामुळे जंगी पार्टीचं काय तर साध्या पार्टीचं आयोजन सध्या शक्य नाही. पण बच्चे कंपनीच्या बर्थडेला पार्टी नसेल तर ते हिरमोड होणं साहजिक आहे. पण जिकडे इच्छा तिथे मार्ग असतोच. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टसिंगचे नियम पूर्ण पाळून तुम्ही बच्चे कंपनी किंवा कोणाचीही बर्थडे पार्टी किंवा अॅनिव्हर्सरी पार्टी प्लॅन करून सरप्राईज देऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही त्यांना वाढदिवस किंवा लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा हटके पद्धतीने देऊ शकता.  आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. त्यासाठीच हा लेख नक्की वाचा. 

ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल बर्थडे पार्टी हा यावरचा उपाय आहे. आता ही बर्थडे पार्टी काही नेहमीच्या पार्टीएवढी हॅपनिंग वाटेलच असं नाही. काही टेक्निकल अडथळेही येतीलच. पण मुलांच्या हट्टासाठी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी ही पार्टी नक्कीच मदत करेल. कारण लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात हाच एक पार्टी करण्याचा योग्य आणि सहज मार्ग आहे. 

ऑनलाईन बर्थडे पार्टीचं आयोजन

How to organise online birthday party?

ADVERTISEMENT

व्हिडिओ कॉलचं आमंत्रण (Video Call Invite)

लॉकडाऊनमुळे सर्व जवळच्यांना आणि मित्रपरिवाराला एकत्र आणण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे व्हिडिओ कॉल. ऑनलाईन बर्थडे पार्टीसाठी तुम्ही आजकाल अनेक व्हिडीओ कॉलिंग एप्सचा वापर करू शकता. जसं गुगल मीट किंवा झूम मीटींगची वेळ ठरवा. मग त्याची इन्व्हाइट लिंक सगळ्यांना शेअर करा. या इन्व्हाइटमुळे सगळे त्या दिवशी योग्यवेळी ऑनलाईन बर्थडे पार्टी जॉईन करतील आणि ज्यांना शक्य नसेल त्यांना आधीच याबाबत कळवता येईल. अशा प्रकारे तुम्हाला पार्टीला उपस्थित राहणाऱ्यांची संख्याही कळेल आणि पुढचा कार्यक्रम आखता येईल. 

पार्टीसाठी थीम (Party Theme)

बर्थडे पार्टीसाठी खास थीम

Theme Birthday Parties

ऑनलाईन पार्टी असली तरी या पार्टीसाठीही थीम ठरवा. यामुळे जेव्हा सगळे ऑनलाईन येतील तेव्हा छान स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ग्रुप फोटो करता येईल. सगळे एका थीमने तयार असल्यावरही फारच छान वाटतं. सध्याच्या काळात असा उत्साह अनेकांना आनंद देणारा ठरत आहे. 

ADVERTISEMENT

हॅपी बर्थडे हॅगिंग/प्लॅ कार्ड्स (Happy Birthday Hanging)

लॉकडाऊनच्या काळात हॅपी बर्थडे लिहीलेलं हॅगिंग किंवा प्रत्येक फॅमिली मेंबरने हातात हँपी बर्थडेचं एकेक अल्फाबेट लिहून कोलाज किंवा एकत्र ऑनलाईन विश करण्याची क्रेझ आली होती. ही आयडिया तुम्ही तुमच्या ऑनलाईन बर्थडे पार्टीतही वापरू शकता.

म्युझिक चॉईस (Choice of Music)

कोणतीही पार्टी म्युझिकशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे ऑनलाईन पार्टीलाही छान बर्थडे म्युझिक नक्की ठरवा. ज्यामुळे पार्टीत अजून रंगत येईल.

ऑनलाईन गेमिंग एक्टीव्हीटी (Online Gaming Activity)

ऑनलाईन बर्थडे आणि गेमिंग

Online Gaming Activity and Birthday

ADVERTISEMENT

तुम्ही मुलांसाठी ऑनलाईन गेम एक्टीव्हीटी ही ठेवू शकता. ज्यामुळे बच्चेपार्टी नक्कीच खुश होईल. तुम्ही मुलांचाही विचार याबाबत घेऊ शकता. कारण आजकालची लहान मुलं गेमिंगबाबतीत जास्त एक्टीव्ह असतात.

स्पेशल बर्थडे आणि रिटर्न गिफ्ट्स (Special Birthday and Return Gifts)

ऑनलाईन पार्टी असली तरी तुम्ही ती खास करण्यासाठी बर्थडे असलेल्या व्यक्तीसाठी ऑनलाईन बुक करून सरप्राईज गिफ्ट पाठवू शकता. अगदी बर्थडे पार्टीत सामील झालेल्यांसाठी ही तुम्ही बल्कमध्ये रिटर्न गिफ्ट्स सेंड करू शकता. तुम्हाला यासाठी ऑनलाईन अनेक वेबसाईट्स मिळतील. जर तुम्हाला एखाद्या चांगला कामासाठी गिफ्टचे पैसे द्यायचे असतील तर वाढदिवस असलेल्या व्यक्तीच्या नावे चॅरिटीही करू शकता.

लक्षात घ्या ऑनलाईन पार्टीसाठी बॅकअप प्लॅनही तयार ठेवा. कारण ऑनलाईन कनेक्शनमध्ये कधीही व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या पर्यायांचाही विचार करून ठेवा. नाहीतर ऐनवेळी उगाच पंचाईत व्हायची. मग तुम्हीही अशाप्रकारे वाढदिवस साजरा केलात तर आम्हाला जरूर कळवा. 

12 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT