Happy Birthday Wishes In Marathi - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्टेट्स आणि संदेश | POPxo

वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes In Marathi)

वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes In Marathi)

वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. आता वाढत्या वयाबरोबर त्याचं अप्रूप कमी होत जातं. ती गोष्ट वेगळी आहे. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही तिचं भाग्य घेऊन पृथ्वीतलावर येत असते. त्यामुळे मिळालेले आयुष्य हे प्रत्येकाने समाधानाने जगणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्या वाढदिवसाला कमी लेखू नये. हा दिवस आहे जल्लोषाचा आणि धन्यवाद देण्याचा. मग ते आपल्या घराच्यांबरोबर सेलिब्रेशन करणं असो वा त्या दिवशी एखादं चांगलं समाजकार्य करणं असो.


लहानपणी वाढदिवस म्हणजे बर्थडे पार्टी, सगळ्यांकडून खास वागणूक मिळणे, हवी ती गिफ्ट्स आईबाबा आणि इतरांकडून मिळवणे, केक कापणे हे असते. वर्षभर ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात बच्चेकंपनी. पण जसंजसं आपण मोठं होतो तसं गोष्टी बदलतात. वाढत्या वयाचं ओझं वाटू लागतं. पण असं का वाटून घ्यायचं. हा दिवस प्रत्येक वयात उत्साहाने साजरा झालाचं पाहिजे. कारण प्रत्येक वर्षी वाढणारं आयुष्य हे देवाने दिलेली अजून एक संधी आहे. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची, आनंद द्विगुणित करण्याची, समाजाला काहीतरी चांगलं देण्याची. त्याचबरोबर वाढदिवस अजून ही एका गोष्टीसाठी फार महत्वाचा आहे. ते म्हणजे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी.


वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. मग ते FB वर इमोशनल किंवा मजेशीर पोस्ट टाकणं असो, Insta वरचं झक्कास कोलाज किंवा सुंदर मुझ्यिक व्हिडीओ असो वा WhtsApp स्टेटसवर छान टेक्स्ट किंवा त्या व्यक्तीसोबतचा फोटो टाकणं असो. बर्थ डे गर्ल किंवा बर्थ डे बॉयवर सगळीकडून हार्दिक. शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर...त्याचं महत्व जरा जास्तच असतं नाही का? सध्या आपल्याला Whts App, Insta, FB सगळीकडे मराठी शुभेच्छा देता येतात. सध्या शुभेच्छांबरोबर ओवाळणीचं ताट, भला मोठा केक असं सगळचं पाठवता येतं. कविता आणि चारोळ्यांनी आपला वाढदिवस नुसता चिंब होऊन जातो. आपल्या मायमराठीत एक से एक मराठी स्टेटस ठेवता येतात. मग POPxo च्या मैत्रिणींनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास मराठमोळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजाना. ज्यामध्ये मजेदार, भावनिक आणि खास वाढदिवसाच्या शुभेच्छांची सुंदर गुंफण आम्ही केली आहे.


पाहूया मायमराठीतील वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा (Happy Birthday Wishes In Marathi)


विचार करा वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यात आधी आईकडून शुभेच्छा मिळाल्या तर किती छान वाटेल. आई म्हणजे प्रत्येकाचं दैवत. आई...जी आपल्याला जन्म देते. प्रत्येक बाळाबरोबर त्याच्या आईचा ही जन्म होत असतो. बाळाच्या जन्माबरोबरच त्याचे आयुष्य जणू तिचे आयुष्य होऊन जाते. त्याच्या प्रत्येक प्रगतीत ती आपली प्रगती पाहत असते आणि त्याच्या अपयशात ती त्याच्यापाठी खंबीरपणे उभी असते. मग ते बाळ कीती ही मोठं का होईना. अगदी त्याला मुलं झालं तरी आईला मात्र ते लहानच वाटत असतं. आयुष्यात प्रत्येक समयी स्वतःपेक्षा ती नेहमी आपल्या मुलाला प्राधान्य देते. त्यामुळे वाढदिवशी आपल्या जननीकडून मिळालेल्या शुभेच्छा या अनमोल असतात.


 happy-birthday-wishes-in-marathi


1. मोठा झालास तू आज हे अगदी खरं..
पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का रे!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठा हो… कीर्तिवंत हो…
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!


2. ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी...
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं...
हीच शुभेच्छा!


वडिलांकडून मुलांना वाढदिवसाच्या श्लोकातील शुभेच्छा (Birthday Wishes For Children)


आई एवढंच जवळचं नातं असतं ते आपल्या बाबाचं. आईप्रमाणेच बाप होताच प्रत्येक नवऱ्याच अायुष्यही बदलून जातं. आपल्या मुलांशी प्रत्येक वडिलांचं कधी प्रेमाचं, कधी धाकाचं तर कधी रागाचं ही नातं असतं. पण तरीही वडिलांचं ही आईएवढचं आपल्या मुलांवर प्रेम असतं. प्रत्येकवेळी ते त्यांना व्यक्त करून दाखवता येतंच असं नाही. पण आपल्या मुलाच्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वडिल आयुष्यभर झटत असतात.मग तो मुलगा असो वा मुलगी असो.


1. जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


happy-birthday-wishes-in-marathi


आईबाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Daughter)


आपल्या लाडक्या लेकीचं कौतुक प्रत्येक बापाला असतं. लेकीच्या लहानपणापासून तिचे आईवडील तिला भावी आयुष्याचा जोडीदार आणि सासर चांगलं मिळावं, अशी देवाकडे मागणी करत असतात. फुलापेक्षा नाजूक समजून जपलेल्या आपल्या लेकीच्या वाढदिवशी एका भावपूर्ण बापाने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


1. व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा


लाडक्या लेकीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Father From Daughter)


जसा बाबा तशी त्याची लेक. समजायला लागल्यापासून आपल्याच बाबाला आयडॉल मानणारी. सतत त्याच्या मागे मागे करणारी.. त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारी..लाडकी सोनुली. सासरी गेली तरी आपल्या आईबाबांची ओढ तिच्या मनात कायम असते. अश्याच एका लाडक्या लेकीने आपल्या बाबाला दिलेल्या या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.


1. बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


आजी- आजोबांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Grandparents)


आई-बाबांप्रमाणेच आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान असतं ते आपल्या लाडक्या आजीआजोबाचं. एकीकडे आमच्यावेळी नव्हते हो एवढे लाड असं म्हणणारे आजीआजोबा आपल्या नातवंडाचं मात्र भरपूर लाड करतात. आपल्या लाडक्या नातवंडाच्या वाढदिवशी काय करू आणि किती करू अशी भावना आजीआजोबांची असते. आपल्या बोबड्या बोलांनी आणि दूडूदूडू रांगण्याने नातवंड आजीआजोबांना तृप्त करत असतात. त्यांच्या वार्धक्य काळात जणू वसंत आणण्याचं काम ही नातवंड करत असतात. अशा आपल्या लाडक्या नातवंडाचा वाढदिवस म्हणजे लाडक्या आजोबा आणि आजीसाठी पर्वणी असते.


1. चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
यशवंत हो दीर्घायुषी हो
बाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister From Brother)


प्रत्येक नात्याची एक खासियत आहे. असंच एक नात म्हणजे भावाबहिणीचं नातं. कितीही भांडण होवो, कितीही मतभेद होवोत भावाचं बहिणीवरील आणि बहिणीचं भावावरील कधीच कमी होत नाही. भलेही भावंडांमध्ये संवाद नसला तरी मनात मात्र प्रेमाचा पाझर कायम असतोच. अश्याच एका प्रेमळ भावनाने आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवशी दिलेल्या या प्रेमळ शुभेच्छा......


1. मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  


ताईला छोट्या बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder Sister)


भावाबहीणीच्या नात्याहून कित्येक पटीने जास्त माया असते ती बहिणींच्या नात्यात. एकाच गोष्टीवरून मला हवी मला हवी म्हणून सतत भांडणाऱ्या पण थोडंही लांब गेल्यावर एकमेंकींच्या आठवणीने हळहळणाऱ्या असतात त्या बहिणी. तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अशी त्यांची सदैव गत असते. पण तरीही प्रेम कायम असते. आपल्या दीदीसाठी छोट्या बहिणीने व्यक्त केलेल्या भावनात्मक वाढदिवस शुभेच्छा.......


1. सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


वाढदिवसाच्या शुभेच्छा सासूसासऱ्यांकडून (Birthday Wishes For Mother-In-Law)


जसं आईबाप तसे सासूसासरे असं मानणाऱ्या स्त्रीला कधीच कश्याचीही उणीव भासत नाही. मग आपोआपच सासरीची ही नाती दृढ होतात आणि अनेक आशिर्वाद देतात.


1. नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा 


Birthday-Wishes-For-Friend-In-Marathi


वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा (Belated Happy Birthday Wishes)


काहीवेळा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला उशीर होतो पण त्यावर उपाय म्हणून पुढील संदेश नक्कीच फायद्याचा ठरेल.


1. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट


2. कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!


मैत्रिणींकडून वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा (Birthday Wishes For Friend)


प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा तरी अशी मैत्रीण असतेच जिच्या खाण्याच्या सवयीमुळे ती ग्रुपमध्ये फेमस असते. अशा मैत्रीणीच्या नावे पुढील मजेदार शुभेच्छा


1. वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


2. प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे


Birthday-messages-in-marathi


जगात भारी वाढदिवसाच्या शुभेच्छा 


1. आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेज
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!


वाढदिवसासाठी खास स्टेट्स (Happy Birthday Status In Marathi)


वाढदिवसाच्या दिवशी काही व्यक्तींनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी ह्रदयाला भिडतात आणि कायम आठवणीत राहतात.


1. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक"सण" होऊ दे हीच सदिच्छा..!


पत्नीकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Husband)


आपले आईबाबा आणि भावंडानंतर आपलं सर्वस्व स्त्री ही तिच्या नवऱ्याला देऊ करते. जगाच्या रीतीप्रमाणे माहेराहून सासरला येते. आपल्या पतीच्या घराला आणि कुटुंबाला आपलंस करते. अश्याच एका जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने पतीसाठी दिलेल्या शुभेच्छा…...


1. कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Brithday Wishes For Wife)


तोही तिच्या प्रेमाला पूरक वागायचा, तिला वेळोवेळी नव्या घरात सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतच असतो. आपल्या सहचारिणीसाठी आपला प्रत्येक क्षण देण्याचा तोही प्रयत्न करत असतो. प्रत्येक नवऱ्यासाठी आपल्या बायकोचा वाढदिवस म्हणजे एक सणच असतो नाही का? कारण नवरा जर बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याची काही खेैर नसते. तिचं आपल्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे, अशीच काहीशी कबुली देणारा पुढील संदेश……


1. तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !


वहिनीसाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Bride)


लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्रीला अनेक नवी नाती आणि नव्या भूमिका पार पाडाव्या लागतात. पण ती सहजरित्या सारी नाती सांभाळते आणि अगदी दुधातील साखरेप्रमाणे त्या नव्या कुटुंबात विरघळून जाते. अश्याच आपल्या वहिनीचं कौतुक सांगणाऱ्या ह्या पुढील शुभेच्छा…….


1. उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…


वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. (Birthday Messages In Marathi)


1. झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


2. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी
शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.


3. नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा


मराठमोळा बाणा असणारे वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश


काही जणांना प्रत्येक बाबतीत आपला मराठी बाणा दाखवायचा असतो. मग वाढदिवसाच्या शुभेच्छा ही त्याला अपवाद कशा राहतील. असाच थेट मराठी बाणा असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाची साक्ष देणारे काही वाढदिवस संदेश जे थेट मनाला भिडतात आणि मराठी बाणा ही जपतात. हे मराठमोळे संदेश ही तुम्हाला नक्कीच आवडतील यात शंका नाही.


1. आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी”
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!


2. आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!


3. जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..


प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. स्वभावाला काही औषध ही नसते. असं असलं तरी या व्यक्तींच्या वाढदिवशी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत असं होत नाही.


काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !


हे झाले सामान्यजनांच्या वाढदिवसाबद्दल. पण नेते मंडळी, सेलिब्रिटीज आणि मोठंमोठे उद्योजक यांचे वाढदिवस तर दरवेळी सणांप्रमाणेच साजरे होतात. त्यांच्या वाढदिवसांवरती तर लाखोंची उलाढाल ही होत असते. नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तर सेलिब्रिटीजना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतो. नेत्यांचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्यासाठी मोठंमोठे बॅनर लावतात. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सामाजिक उपक्रम लाडक्या नेत्याच्या नावे राबवले जाताता. पेपर आणि टीव्हीवर शुभेच्छांच्या जाहिराती दिल्या जातात. तर दुसरीकडे सेलिब्रिटीजची तर बातच और आहे. कित्येक चाहते आपल्या लाडक्या सेलिब्रिटीची वाढदिवशी झलक बघता यावी यासाठी त्याच्या किंवा तिच्या घराबाहेर अलोट गर्दी करतात. देवळात अभिषेक करतात. अनेक गिफ्ट्स पाठवतात. पण हे जुने मार्ग अजूनही वापरले जात असले तरी मागे पडत आहेत आणि नवा ट्रेंड रूजू होत आहे. तो म्हणजे डीजीटल शुभेच्छां देण्याचा आणि त्याही थेट.थॅंक्स अगेन टू एफबी, इन्स्टा आणि ट्विटर ज्यावर आपल्या लाडक्या नेत्याला आणि सेलिब्रिटीला टॅग करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. कविता पाठवू शकता. टेक्नोलॉजीमुळे आता कोणाचाही वाढदिवस पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. बस्स लॉग इन करा आणि पहा कोणाचा वाढदिवस आहे ते. लांब असो वा नेहमी संपर्कात नसलेल्या असो वाढदिवसाच्या शुभेच्छा एकमेंकाना या टेक्नोलॉजीमुळे दिल्या जातात. ज्यामुळे माणसं आपोआपच जोडली जातात.


शुभेच्छा सौजन्य : Marathi SMS


हेही वाचा - 


भाऊबीजेसाठी खास 'शुभेच्छा संदेश'


लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश


यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स