ADVERTISEMENT
home / आपलं जग
how to book cheap plane tickets In Marathi

स्वस्तात विमानप्रवास करण्यासाठी काही सोप्या ट्रॅव्हल टिप्स

वर्षातून दोनदा अथवा वारंवर वेकेशनवर जाणं अथवा कामानिमित्त सतत प्रवास करण्याची अनेकांना आवड असते. प्रवास करणं कितीही आवडीचं असलं तरी वाहतुकीवर होणारा खर्च सर्वांनाच परवडतो असं नाही. प्रवास करताना विमानाने प्रवास करणं सर्वात सुखावह असतं. कारण यामुळे तुमचा वेळ आणि कष्ट वाचतात. पण यासाठी तुम्हाला इतर वाहतुकीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे विमानप्रवास कितीही सोयीचा असला तरी सर्वांच्या खिशाला परवडेलच असं नाही.पण जर तुम्ही थोडं डोकं चालवलं, नीट प्लॅनिंग केलं तर कमी पैशातही तुम्ही नियमित विमानाने प्रवास करू शकता. यासाठीच या टिप्स नेहमी फॉलो करा. 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi

तीन महिने आधी अथवा महिनाभर आधी तिकीट बूक करा

जर तुम्ही नियोजन करून प्रवास करत असाल तर पैसे वाचवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. तुमच्या प्रवासाच्या तारखा फिक्स नसतील तर तुम्ही तीन महिने आधी अथवा महिनाभर आधी तुमचं विमानाचं तिकीट बूक करू शकता. यासाठी विकडेज अथवा स्वस्त तिकीट असलेल्या दिवशी तुमचा प्रवासाचं प्लॅनिंग करा. कारण वेकेशनच्या काळात, सुट्टीच्या दिवशी, विकेंडला नेहमी विमानाचं तिकीट महाग असतं. पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं (Places To Visit In Pune In Marathi)

प्रवास टप्प्या टप्याने करा

वेळ वाचवण्यासाठी आपण बऱ्याचदा नॉन स्टॉप फ्लाइट बूक करतो. पण त्यामुळे तुमचे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. त्याऐवजी दोन टप्प्यामध्ये दोन फ्लाइट बूक करा. जसं की तुम्हाला मुंबई ते कलकत्ता जायचं असेल तर आधी मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कलकत्ता असं तिकीट बूक करा. कारण बऱ्याचदा अशं केल्यामुळे तुम्हाला प्रवासासाठी जास्त वेळ लागू शकतो पण अगदी कमी पैशात तुम्हाला विमानाचा प्रवास करता येतो.

how to book cheap plane tickets In Marathi

विमानाचं तिकीट बूक करताना इनकॉग्निटोमोड वर सर्च करा

गुगलवर तुम्ही सर्च करत असलेली सर्व माहितीची नोंद ठेवली जाते. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी विमानाचं तिकीट सर्च करता तेव्हा काही वेळातच तुमच्या सर्चमुळे विमानाचं भाडं वाढलेलं दिसू शकतं. यासाठी अशा प्रकारचे सर्च करताना नेहमी इनकॉग्निटो मोड ऑन ठेवा. ज्यामुळे तुम्ही सर्च केलेली माहिती इतरांना कळणार नाही. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Tourist Places In Maharashtra In Marathi)

ADVERTISEMENT

ऑफरकडे लक्ष ठेवा

विमानकंपन्या बऱ्याचदा प्रमोशनसाठी अनेक ऑफर देत असते. जर तुम्ही या ऑफरकडे नीट लक्ष ठेवलं तर तुम्हाला स्वस्तात एखादं विमानाचं तिकीट नक्कीच मिळू शकतं. यासाठी विमान कंपन्यांचे सोशल मीडिया पेज नेहमी फॉलो करा. ज्यामुळे तुम्हाला या ऑफर्स समजतील आणि त्याचा योग्य वेळी फायदा मिळेल.

क्रेडिट कार्डचा वापर करा

आजकालचा जमाना हा प्लास्टिक मनीचा आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जातात. डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यावर कंपनी ग्राहकांना बऱ्याचदा अनेक प्रकारच्या सूट, मनी बॅक अशा ऑफर देत असते. तुम्ही जर एखाद्या कंपनीचे प्रामाणिक ग्राहक असाल तर तुम्हाला अशा ऑफरचा फायदा होऊ शकतो. 

19 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT