टॉमेटो (tomato) एक अशी भाजी आहे ज्याशिवाय भारतीय खाद्यपदार्थ अपूर्ण आहेत. भाजी असो वा आमटी टॉमेटोचा तर सर्रास वापर सर्व जेवणांमध्ये केला जातो. टॉमेटोशिवाय आपल्याकडे जेवणच अपूर्ण वाटतं. टॉमेटो हा खरं तर जेवणातील अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण टॉमेटोचा चांगला स्वाद येण्यासाठी तुम्ही घरात त्याची खरेदी करून आणताना योग्य टॉमेटो आणत आहात की नाही हे बघणेही तितकेच गरजेचे आहे. बऱ्याचदा टॉमेटो खरेदी करताना केवळ त्याचा रंग पाहून खरेदी करतात. पण फक्त लाल रंगाचा टॉमेटो असून चालत नाही. टॉमेटो कसा चांगला आहे हे पाहण्याचे टेक्निक आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला टॉमेटो खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या याच्या सोप्या टिप्स देणार आहोत. तुम्हीही याचा वापर करून यापुढे टॉमेटोची निवड योग्यरित्या करा.
टॉमेटो दाबून पाहा
Freepik
- जेव्हा तुम्ही टॉमेटोची खरेदी करता तेव्हा तो कडक आहे की नाही याची खात्री करून घ्या. कडक टॉमेटो पटकन सुकत नाही आणि आतून मऊ पडत नाही. तसंच तुम्ही हा टॉमेटो जास्त दिवस स्टोअर करून ठेऊ शकता
- टॉमेटो घेताना दाबून पाहा. पण याचा अर्थ अगदी घट्ट दाबा असा नाही. तर टॉमेटो दाबल्यावर जर पटकन दाबला गेला आणि पिवळा डाग दिसला तर हा टॉमेटो आतून सडलेला आहे असा त्याचा अर्थ असतो
- टॉमेटो जर हलका पिवळ आणि लाल असेल तर तुम्ही त्याची खरेदी करू शकता. पण टॉमेटो हाताला बऱ्यापैकी टणक लागायला हवा. बऱ्याचदा पिवळसर टॉमेटो हा आतून अत्यंत गळलेला असतो
स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स
हिरवा टॉमेटो खरेदी करू नका
- बऱ्याचदा भाजीवाले तुम्हाला हिरवा टॉमेटो खरेदी करण्यास सांगतात. पण असा टॉमेटो तुम्ही खरेदी करू नका. कारण असा टॉमेटो आतून पिकलेला नसतो
- हिरव्या टॉमेटोचीही भाजी करण्यात येते. पण लाल टॉमेटोसारखा स्वाद त्याला येत नाही. तसंच हिरवा टॉमेटो वापरणार असाल तर यामध्ये आंबटपणा जास्त असतो हे लक्षात ठेवा
- टॉमेटो हलका लाल आणि हलका हिरवा असेल तर तुम्ही खरेदी करा. हे टॉमेटो दोन ते तीन दिवस ठेवल्यावर पिकतात आणि त्याचा वापर करता येऊ शकतो
भोगीची भाजी अशी करा अधिक चविष्ट, रेसिपी मराठीत (Bhogi Bhaji Recipe)
असे असतील टॉमेटो तर लवकर होतात खराब
Freepik
- जेव्हा टॉमटो खरेदी कराल तेव्हा प्रयत्न करा की दबलेले टॉमेटो तुम्ही निवडणार नाही. कारण असे टॉमेटो आतून खराब असतात. लगेच वापरावे लागतात. त्यांना स्टोअर करून ठेवता येत नाही
- टॉमेटोमधून पाणी निघत आहे असं दिसलं तर असा टॉमेटो घेऊ नका. कारण असे टॉमेटो लवकर सडतात. तसंच दुसऱ्या टॉमेटोसह असे टॉमेटो राहिल्यास इतर टॉमेटोही खराबी होतात
- कोणत्याही टॉमेटोला सफेद रंगाचा फंगस दिसला तर तुम्ही असा टॉमेटो त्वरीत फेकून द्या. असा टॉमेटो चुकूनही खाणं हानिकारक आहे. तसंच याचा स्वादही खराब असतो
- टॉमेटोवर काळे डाग असतील अथवा त्यामध्ये फट आली असेल तरीही खरेदी करू नका. अशा टॉमेटोच्या आत कीड लागली असण्याची शक्यता असते अथवा आतून असे टॉमेटो अधिक खराब असतात
- अधिक मोठ्या आकाराचे टॉमेटो खरेदी करू नका. असे टॉमेटो आर्टिफिशियल फार्मिंगमध्ये तयार होतात. याचा कोणताही स्वाद नसतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठररत नाहीत
कोणत्याही भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी सोप्या कुकिंग टिप्स
कोणता टॉमेटो चांगला असतो
बाजारात दोन पद्धतीचे टॉमेटो येतात आणि यामध्ये अनेक व्हरायटी दिसून येते –
- भारतात पूसा शीतल, पूसा – 120, रूबी, पूसा गौरव, अर्का रक्षक, अर्का सौरभ आणि सोनाली अशा स्वरूपाचे देशी टॉमेटो असतात
- तर हायब्रिडमध्ये पूसा हायब्रिड – 1, पूसा हायब्रिड – 2, पूसा हायब्रिड – 4, रश्मी आणि अविनाश – 2 असे टॉमेटो येतात
- भारतात सर्वात जास्त अर्का रक्षक टॉमेटो वापरला जातो. हा आकाराने गोल, मोठा आणि लाल रंगाचा असतो. तसंच हा सर्व टॉमेटोंमध्ये अधिक चांगला मानण्यात येतो
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक