शनीची बाधा ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वादळ उठवू शकते. अशा शनिचा त्रास होऊ नये असे सगळ्यांना वाटते. काही जणांसाठी शनि हा लाभदायक आहे. मात्र काही जणांसाठी शनि हा त्रासदायक आहे. एकदा का साडेसाती सुरु झाली की, काहींचा त्रास काही केल्या कमी होण्यास तयार नसतो. साडेसाती किंवा शनिची बाधा होऊ नये यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. शनि ग्रहालाही शांत करता येऊ शकते. यासाठी काही उपाय फायदेशीर ठरतात. ज्योतिषशास्त्रातदेखील शनि ग्रहाला शांत करण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. त्यापैकीच काही उपाय नक्की करुन बघा.त्यामुळे शनिचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.
शनि मंत्र
शनिला शांत ठेवण्यासाठी शनिपुढे नतमस्तक होणे फारच जास्त गरजेचे असते.त्यासाठी शनिमंत्र हा एक सोपा आणि योग्य असा उपाय आहे. शनिवारी जाऊन तुम्हाला शनिचे दर्शन घेणे शक्य नसेल तर तुम्ही रोज शनिचे नाम: स्मरण करु शकता. शनिचे नाव घेतल्यामुळे ‘ओम शनि शनिश्चराय नमः’ तुम्हाला शनिच्या दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळेल. त्यामुळे शनिमंत्राचा जाप करायला विसरु नका.
चंदनाची पूजा
शास्त्रानुसार चंदनाची पूजा ही देखील शनिच्या आवडीची सांगितली जाते. शनिला शांत करण्यासाठीच्या उपायामध्ये चंदन हे अगदी आवर्जून येते. असे सांगितेल जाते की, चंदनामध्ये शनिला शांत करण्याची क्षमता असते. त्यामुळे चंदनाची पूजा करावी किंवा चंदनाच्या पाण्यात आंघोळ करावी. त्यामुळेही फायदा होण्यास मदत मिळते. असे म्हणतात की, सलग 41 दिवस आंघोळ केल्यामुळे शनिचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
रक्तचंदनाची पूजा
चंदनाप्रमाणे शनिला रक्तचंदन देखील आवडते. असे सांगितले जाते की, रक्तचंदानाचा लेप लावल्यामुळे शनिदेव शांत होण्यास मदत मिळते. रक्तचंदन हे खूप कमी मिळते. ते फार महाग देखील असते. काही ठिकाणी रक्तचंदनाच्या नावाखाली फसवले जाते. शनिची साडेसाती दूर करण्यासाठी रक्तचंदनाचा लेप लावला तरी देखील चालू शकतो.
गूळ आणि चण्याचा प्रसाद
शनिला शांत करण्यासाठी गूळ आणि चण्याचा प्रसाद द्या असे देखील सांगितले जाते. त्यामुळे शनिदेव शांत होण्यास मदत मिळते. शनिला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अगदी हमखास गूळ आणि चण्याचा प्रसाद वाटावा. शक्य असेल तर तुम्ही दर शनिवारी गूळ आणि चणे मंदिराबाहेर जाऊन दान करावे त्यामुळेही शनिची बाधा दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल.
आता शनि ग्रहाला शांत करण्यासाठी हे काही उपाय नक्की करा.