सणासुदीला घरात वरचेवर मिठाई आणि गोड पदार्थ बनवले जातात. ज्यात घालण्यासाठी सुकामेवा मोठ्या प्रमाणावर विकत घेतला जातो. हेल्दी स्नॅक्स म्हणून मधल्या वेळी खाण्यासाठी अथवा नातेवाईकांना भेट देण्यासाठी सुकामेवा खरेदी केला जातो. मात्र असा सुकामेवा खरेदी करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. कारण सुकामेवा महाग असतो. जर नीट पारख केली नाही तर खराब झालेला भेसळयुक्त सुकामेवा तुमच्या हातात पडू शकतो. यासाठी सुकामेवा खरेदी करताना या गोष्टी अवश्य तपासून पाहा. यासोबतच सर्वांना द्या दिवाळीच्या शुभेच्छा
सुकामेव्याचा रंग
सुकामेवा खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे सुकामेव्याचा रंग… कारण यावरून तुम्हाला तो चांगल्या गुणवत्तेचा आहे की खराब हे समजू शकते. सुकामेव्यामध्ये जास्त म्हणजे बदाम, काजू, अंजीर, खजूर, मनुका, पिस्ता खरेदी केल्या जातात. जर विकत घेताना हे पदार्थ फिके पडलेले अथवा काळपट दिसत असतील तर ते मुळीच फ्रेश नाहीत.
सुकामेवा जास्त दिवस टिकण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स
चव घ्या
सुकामेवा खरेदी करताना तुम्ही एखाद्या होलसेल दुकानात असाल तर तुम्ही सुकामेवा खाऊन त्याची पारख करू शकता. जर मनूका, पिस्ता अथवा खजूर खाताना चिवट लागले तर ते ताजे नसून लवकर खराब होण्याची शक्यता आहे हे ओळखा. भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का
वास घ्या
सुकामेवा खरेदी करण्याची नामी युक्ती म्हणजे त्याचा वास घेणे. जर अशा पदार्थांना कुबट वास येत असेल तर ते बराच दिवस साठवून ठेवलेले असू शकतात. बऱ्याचदा दिवाळी, न्यू एअर दरम्यान चॉकलेट आणि मिठाईसाठी बाजारात साठवून ठेवलेला सुकामेवा विक्रीस काढला जातो. मात्र असा सुकामेवा जास्त दिवस टिकू शकत नसल्यामुळे तो लवकर खराब होऊ शकतो. ह्रदयाचे आरोग्य जपण्यासाठी दररोज खा शेंगदाणे
माहिती वाचा
बाजारात आजकाल सुकामेव्याची तयार पाकिटे मिळतात. विविध ब्रॅंडचा सुकामेवा विक्रीसाठी तयार असतो. मात्र असा पॅक सुकामेवा घेताना तुम्हाला त्याचा रंग, वास अथवा चव घेणं शक्य नसतं. अशा वेळी पाकीटावर दिलेली पॅकिंगची तारीख आणि इतर माहिती तुमच्या फायद्याची ठरू शकते. शक्य असल्यास FSSAI मार्क असलेला सुकामेवाच खरेदी करा. ज्यामुळे तुमची फसगत होण्याची शक्यता कमी आहे.