ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
असं ओळखा बाजारातील भेसळयुक्त बेसन, फॉलो करा या सोप्या टिप्स

असं ओळखा बाजारातील भेसळयुक्त बेसन, फॉलो करा या सोप्या टिप्स

बेसन म्हणजेच चणा डाळीचे पीठ स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. कारण भाजी, भजी, बटाटेवडे, वडी, थालीपीठ, धपाटे, पुऱ्या अशा अनेक गोष्टी करण्यासाठी तुम्हाला बेसन लागू शकते. भाजी करण्याचा कंटाळा आल्यावर पटकन तुम्ही बेसनाची पोळी करून खाऊ शकता. मात्र त्यासाठी तुमच्या घरात मुबलक बेसन असायला हवे. पूर्वी चण्याची डाळ भाजून त्याचे बेसन घरीच केले जात असे. मात्र आजकालच्या धावपळीच्या जगात बाजारातून पटकन बेसन विकत आणता येते. मात्र असं बाजारातून विकत आणलेलं बेसन नेहमी शुद्ध असेलच याची काहिच खात्री देता येत नाही. बऱ्याचदा भेसळयुक्त बेसन बाजारात विकलं जातं. यासाठीच या टिप्स फॉलो करून ओळखा तुम्ही बाजारातून विकत घेतलेलं बेसन खरंच शुद्ध आहे का

कसं ओळखाल शुद्ध बेसन

बाजारातून विकत आणलेलं बेसन शुद्ध आहे की भेसळयुक्त यासाठी काही सोप्या टिप्स

लिंबाचा करा वापर

बेसन शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासण्याचा सोपा मार्ग म्हणजे घरात असलेल्या लिंबाचा रस यासाठी वापरणे. हा उपाय करण्याचं कारण म्हणजे लिंबू तुमच्या घरात तुम्हाला सहज मिळू शकतं. यासाठी एक चमचा बेसन घ्या आणि त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा. पाच ते सात मिनीटे या मिश्रणामध्ये काय बदल होतात ते तपासा. जर तुमचे बेसन लाल रंगाचे अथवा तपकिरी रंगाचे दिसू लागले तर तुम्ही विकत आणलेले बेसन भेसळयुक्त आहे.

हायड्रोक्लोलिक अॅसिड –

बेसनाची शुद्धता तपासण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिड वापरणे. यासाठी एका भांड्यामध्ये थोडं बेसन घ्या आणि त्यात पाणी मिसळून एक छान पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये एक चमचा हायड्रोक्लोरिक अॅसिडड मिळता. काही मिनीटांनंतर जर हे मिश्रण लाल दिलू लागले तर तुमचे बेसन भेसळयुक्त आहे. जर बेसनच्या मिश्रणाचा रंग मुळीच बदलला नाही तर मात्र तुमचे बेसन शुद्ध असून ते स्वयंपाकासाठी अतिशय उत्तम आहे.

ADVERTISEMENT

भेसळयुक्त बेसन खाण्यामुळे काय होतात दुष्परिणाम

स्वयंपाकासाठी खरंतर घरी तयार केलेलं अथवा घरघंटीवर दळुन आणलेलं बेसन वापरणं हाच एक उत्तम मार्ग आहे. कारण अशा प्रकारे तयार केलेलं बेसन शुद्ध स्वरूपाचं असतं. मात्र तुम्हाला जर हे करणं शक्य नसेल तर चांगल्या गुणवत्तेचं बेसन बाजारातून विकत घ्या. आम्ही दिलेल्या चाचण्या करून पाहा आणि बेसनाची शुद्धता तपासून घ्या. कारण आजकाल प्रमाण वाढवण्यासाठी बेसनामध्ये रंग दिलेला भूसा अथवा  इतर भेसळयुक्त् पदार्थ मिसळण्याची शक्यता असते. जर तुम्ही या प्रकारचे भेसळयुक्त बेसन स्वयंपाकासाठी वापरले तर तुमच्या आरोग्यावर त्याचा  परिणाम होऊ शकतो. 

  • भेसळयुक्त बेसनाचे पदार्थ खाण्यामुळे तुमच्या पोटात दुखणे, गॅस पकडणे अशा समस्या जाणवू शकतात.
  • भेसळयुक्त बेसनाच्या पदार्थांमुळे तुमच्या  पोटात इनफेक्शन होऊ शकते.
  • अशा प्रकारच्या पदार्थांमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
  • सतत असे बेसन खाण्यामुळे तुमच्या हाडांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो आणि सांधेदुखी जाणवू शकते. 
  • संपूर्ण शरीरावर या भेसळयुक्त पदार्थांचा परिणाम जाणवण्याची शक्यता असते. 

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

डाळी आणि पिठांमध्ये होणार नाहीत किडे, स्वयंपाकघरातील टिप्स

ADVERTISEMENT

बेसन कढीमुळे मिळतात अफलातून फायदे, जाणून घ्या

सौंदर्य खुलविण्यासाठी असा करा बेसनाचा वापर

18 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT