वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालायला आपल्या सगळ्यांनाच आवडतात. पण काही खास रंग असतात जे आपल्यावर अगदी खुलून दिसतात. स्किनटोन कोणतीही असो प्रत्येक स्किनटोनची एक खासियत असते. त्यामुळे तुमच्या स्किनटोननुसार तुम्हाला कोणता रंग अधिक खुलून दिसतो किंवा काही कपड्यांच्या रंगामुळे तुमची स्किनटोनही उठून दिसते. चला जाणून घेऊया वेगवेगळ्या स्किनटोननुसार तुम्ही कसे निवडायला हवेत रंग
जुन्या साड्यांपासून शिवा ड्रेसचे असे हटके पॅटर्न्स (Dresses Made From Old Sarees In Marathi)
सावली सलोनी तेरी
सगळ्यात सुंदर असा रंग म्हणजे ‘सावळा’ आता काहींना हा रंग उगीचच चुकीचा वाटतो. त्यात तुमचा काही दोष नाही. पण अशा व्यक्ती या फारच आकर्षक असतात. फक्त अशा व्यक्तिंनी योग्य रंगाची निवड केली की, त्यांचा स्किनटोन हा अधिक खुलून दिसतो. सावळ्या रंगाने त्यांच्या शरीरयष्टीनुसार कोणतीही फॅशन करताना त्यांना नेमके कसे दिसायचे आहे याचा विचार करावा. उदा. तुम्हाला ऑफिस लुकसाठी फॉर्मल,ट्रेडिशनल, पार्टी असे कोणते कपडे घालायचे आहेत
हे रंग तुमचा स्किनटोन खुलवतात : पांढरा, अबोली, बदामी, फिक्कट जांभळा,काळा,पेस्टर कलर, फिक्कट पिवळा, फिक्कट केशरी, लाल असे रंग अशी सुंदर स्किनटोन असणाऱ्यांना फारच चांगले दिसतात.
हे रंग टाळा : तुम्हाला फ्लोरोसंट हा रंग कितीही पाहायला बरा वाटत असला तरी तुम्ही तो नाही घातला तर उत्तम कारण हा रंग फारच वेगळ्या पद्धतीने उठून दिसतो. यामध्ये तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसण्यापेक्षा तो कपडा समोरच्या व्यक्तिच्या डोळ्यात जास्त बसतो.
कॉटन पैठणी सध्या ट्रेंडमध्ये, गोल्डन आणि सिल्व्हर दोन्ही काठ दिसतात छान
रंग दे तू मोहे गेरुआ
गव्हाळ रंग ही देखील देवाची सुंदर देणगीच म्हणायला हवी. या स्किनटोनलाही बऱ्यापैकी रंग उठून दिसतात आणि बऱ्याच रंगामुळे त्यांची पर्सनॅलिटीही खुलून येते. गव्हाळ रंगाच्या व्यक्तिंनी अगदी काहीही घातले की, त्यांची तारीफ होते. प्रत्येक रंग छान कॅरी करायचे या स्किनटोनला चांगलेच जमते.
हे रंग खुलवतात स्किनटोन : काळा, निळा, पिवळा, केशरी, लाल, गुलाबी, जांभळा, हिरवा असे बरेच रंग या स्किनटोनला चांगले दिसतात.
हे रंग टाळा : स्किन कलर किंवा मातकट रंग या स्किनटोनला एकरुप झाल्याचे वाटतात. त्यामुळे असे रंग टाळा
रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल
गोरी तेरे आँखे कहे….
आपल्याकडे ज्या त्वचेचे आकर्षण अनेकांना असते असा रंग म्हणजे गोरा…त्वचा गोरी असली की, अगदी काहीही घालता येतं असा तुमचा समज असेल तर हा गैरसमज आहे. कारण हा रंग अनेकांना प्रमाण वाटत असला तरी हा स्किनटोन असलेल्या व्यक्तिंनाही रंगाची निवड करताना त्यांना कुठे जायचे आहे आणि कशासाठी तयार व्हायचे आहे याचा विचार करावाच लागतो.
हे रंग खुलवतात स्किनटोन : पांढरा, फिक्कट निळा, पिवळा, मरुन, करडा, फिक्कट गुलाबी, ऑलिव्ह ग्रीन
हे रंग टाळा : भडक लाल, केशरी (असे रंग चांगले दिसले तरी ते काही फॉर्मल कार्यक्रमांना घालू नका). काळा रंगही हा अनेकदा गोऱ्या त्वचेला भडक दिसतो.
आता स्किनटोननुसार तयार होताना या गोष्टीचा नक्की विचार करा.