लिपस्टिक हा प्रत्येकीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे प्रत्येकीकडे विविध रंगाच्या आणि निरनिराळ्या प्रकारच्या लिपस्टिक शेड्सचं कलेक्शन असतं. पण जेव्हा तुमचं लग्न ठरतं, तेव्हा मात्र तुमचा ब्राईड लुक नेहमीपेक्षा जरा जास्त खास असावा असं तुम्हाला वाटू लागतं. ब्रायडल मेकअपची शॉपिंग करताना त्यात महत्त्वाची असते लिपस्टिक… कारण लिपस्टिकमुळे तुमचा संपूर्ण लुक बदलू शकतो. लग्नातील विविध विधी, लग्नानंतरचे कार्यक्रम यासाठी तुमच्याजवळ परफेक्ट ब्रायडल लिपस्टिक असायलाच हव्या. यासाठी जाणून घ्या स्किनटोननुसार कशी निवडावी ब्रायडल लिपस्टिक तसंच वाचा नववधूला ब्रायडल मेकअप विषयी कोणत्या गोष्टी माहीत असायलाच हव्या (Bridal Makeup Things In Marathi)
कसा ओळखावा अंडरटोन
आजकाल मार्केटमध्ये विविध शेडच्या आणि विविध प्रकारच्या लिपस्टिक मिळतात. मात्र जर तुम्ही नवरी असाल तर तुम्हाला स्किनटोननुसार लिपस्टिकच्या शेड निवडाव्या लागतात. भारतीय महिलांमध्ये साधारणपणे तीन प्रकारचे अंडरटोन असतात. ज्यामध्ये वॉर्म, कूल आणि न्यूट्रल या स्किनटोनचा समावेश असतो. तुम्ही तुमच्या मनगटाजवळील रक्तवाहिनाच्यां रंगानुसार तुमचा स्किन टोन कोणता आहे हे ओळखू शकता. मात्र लक्षात ठेवा, स्किनटोननुसार लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी काही टिप्स जरूर फॉलो करा.जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्ही निवडलेल्या शेडमध्ये फरक जाणवू शकतो. तसंच नवरीने नेहमी क्रुअल्टी फ्री अथवा नैसर्गिक घटक असलेल्या लिपस्टिक निवडाव्या.लिपस्टिक खरेदी करताना त्याचा ब्रॅंड आणि लिपस्टिकवर दिलेली माहिती जरूर वाचा.तसंच नववधूंनी नक्की ट्राय करा ‘खास’ सेलिब्रिटी ब्रायडल मेकअप लुक्स (Celebritry Bridal Makeup Looks In Marathi)
वॉर्म अंडरटोन
जर तुमचा रंग गव्हाळ ते गोल्डन रंगाचा असेल तर तुम्ही वॉर्म अंडरटोनचे आहात. वॉर्म अंडरटोन असेल तर तुमच्या मनगटाजवळील रक्तवाहिन्यांचा बाहेरील रंग हिरवट दिसतो. अशा टोनच्या मुलींनी नेहमी बोल्ड शेडची लिपस्टिक निवडावी. ऑरेंज, ब्राऊन, रेड शेडच्या लिपस्टिक अशा अंडरटोन असलेल्या नवरीवर खुलून दिसतात. पण जर तुम्हाला न्यूड शेड आवडत असतील तर तुम्ही थोड्या रिच शेड असलेल्या न्यूड लिपस्टिक निवडा ज्या तुमच्या त्वचेवर खुलून दिसतील.
नववधूचे रुप खुलवणाऱ्या एअरब्रश मेकअप (Airbrush Makeup) विषयी जाणून घ्या सर्व काही
कूल अंडरटोन
जर तुमच्या मनगटावरील रक्तवाहिन्यांचा रंग निळा असेल तर तु्म्ही कूल अंडरटोनच्या आहात. अशा नवरीने नेहमी निळसर, जांबळट रंगाच्या लिपस्टिक निवडाव्या. रेडमध्ये चेरी शेडही तुमच्यावर खुलून दिसेल. शिवाय जर तुम्हाला न्यूड शेड आवडत असतील तर तुम्ही गुलाबी रंगाच्या शेड तुमच्या ब्रायडल लुकसाठी निवडू शकता.
न्यूट्रल अंडरटोन
तुमचा स्किन टोन न्यूट्रल असेल तर तुम्हाला सर्व ब्राईट शेडच्या लिपस्टिक परफेक्ट शोभतील. बेरी कलरच्या रेड लिपस्टिक अथवा ब्राऊन शेड तुम्ही तुमच्या ब्रायडल कलेक्शनमध्ये नक्कीच ठेवू शकता. या शेड सोन्याचे दागिने अथवा डार्क रंगाच्या आऊटफिटवर शोभून दिसतात.