ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
अशी करा पडद्यांची स्वच्छता

घराचे पडदे असे करा स्वच्छ,जाणून घ्या सोपी पद्धत

घरातील पडदा हा असा भाग आहे. ज्याची स्वच्छता ही फारच महत्वाची आहे.  मळके आणि कळकट्ट पडदे घरात कोणालाच आवडत नाही. त्यातच हल्ली घरी छान इंटेरिअर केले असेल तर सुंदर लांब पडदे अनेक जण निवडतात. लांब पडद्यांमुळे घर अधिक सुंदर दिसते. पण पडदे जितके लांब आणि फिक्कट रंगाचे तितका त्याचा त्रास जास्त. हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे पडदे मिळतात. पण हे पडदे धुवायचे म्हटले की, चांगलेच कंबरडे मोडते. पडदे घरीच धुण्याचा विचार करत असाल तर त्यामागच्या सोप्या ट्रिक्स माहीत असायला हव्यात. जाणून घेऊया पडदा स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती

पडदे ठेवा भिजवून

पडदे खूपच जास्त मळलेले असतील तर त्याचा मळ काढून टाकण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही मस्त गरम पाण्यात पडदे भिजवून ठेवा. त्यामध्ये डिर्जंट घाला. त्यामुळे घाण निघण्यास मदत मिळते. पडदे हे साधारण तासभर भिजवून ठेवले तरी पडदे जास्त घासण्याची गरज भासत नाही. कारण पटकन डाग किंवा घाण  निघून जातात. पडद्यांसाठी कमीत कमी कष्ट घ्यायचे असतील तर तुम्ही किमान 15 दिवसातून एकदा तरी पडदा धुवायला टाका. आठवड्यातून एकदा पडदा धुतल्यामुळे नक्कीच हे पडदे चांगले राहतात.

पडद्यांना द्या स्टीम

Instagram

पडद्यांना स्टीम देऊनही पडदे स्वच्छ करता येतात. पडद्यांना स्टीम देणाऱ्या म्हणजेच साफ करणाऱ्या काही मशीन असतात. त्यामुळे तुम्हाला पडदा काढून टाकावा लागत नाही. तुम्हाला पडदा रॅक वरुन काढायची काहीच गरच नसते. ही मशीन तशीच्या तशी पडद्यांवर फिरवायची असते. त्यामुळे पडदे काढण्याचीही गरज भासत नाही.  अशा प्रकारे पडदे धुतल्यामुळे पडद्यांचे आयुष्यही वाढते. त्यामुळे पडद्यांची स्वच्छता अशाप्रकारे वाफ देऊन म्हणजे स्टीम क्लिनरचा उपयोग करुनही करता येते.

मशीनमध्ये धुवा

खूप जण पडदे हे मशीनमध्ये सुद्धा धुतात. ज्या पडद्यांवर रिंग असते असे पडदे शक्यतो मशीनमध्ये टाकू नका. कारण असे पडदे मशीनमध्ये टाकल्यामळे खूप वेळा आवाज होतो इतकेच नाही तर मशीन त्याचा लोड सहन करु शकत नाही. त्यामुळे असे पडडे मशीनमध्ये मुळीच धुवू नका. जर पडद्यांवर प्लास्टिकच्या रिंग असतील तर असे पडदे धुण्यास काहीच हरकत नाही. अशाप्रकारे तुम्हाला तुमचे पडदे अगदी मस्तपैकी मशीमध्ये धुता येतात. त्यासाठी अजिबात कष्ट लागत नाही. पडदे मशीनमध्ये धुता येणे शक्य असेल तर तुम्हाला हातालाही जास्त कष्ट लागत नाहीत.

ADVERTISEMENT

पडदे निवडताना 

तुमच्या कोणत्याही घरासाठी पडदे निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. पडदे तुम्ही नेमके कसे निवडायला हवेत ते जाणून घेऊया 

  1.  पडदे हे नेहमी पातळ असावेत. ते पातळ असतील तरच ते धुवायला कमी कष्ट पडतात. 
  2. पडद्यांचा रंग हा लाईट असावा. कारण पडदा लाईट असेल तर भींती खराब होत नाही. 
  3. पडदे निवडताना त्याचे मटेरिअल कॉटन किंवा मग सिंथेटीक असावेत कारण ते स्वच्छ पटकन होतात. 

आता पडदे धुताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या.

कपाटातील जुन्या कपड्यांचा असाही करता येऊ शकतो वापर

08 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT