ADVERTISEMENT
home / Mental Health
depression after miscarriage

गर्भपातानंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी हे करा

अचानक गर्भपात झाल्यानंतर किंवा काही कारणांमुळे ठरवून गर्भपात करावा लागल्यानंतर किंवा गर्भधारणा संपुष्टात आणल्यानंतर, ती नियोजित असली किंवा नसली तरीही त्याचे भावनिक दुष्परिणाम स्त्रियांना सहन करावे लागतात. काही स्त्रियांना गर्भपातानंतर नैराश्य येऊ शकते तसेच काही स्त्रियांना एक तीव्र अपराधी भावना ग्रासते. गर्भधारणा संपुष्टात आणण्याचा निर्णय हा कधीच एखाद्या स्त्रीसाठी सोपा नसतो आणि तो निर्णय नेहमीच स्त्रियांच्या संमतीने घेतला जातो किंवा त्यांना तो निर्णय पसंत असतो असे नाही. त्यांनी गर्भपातासाठी मुक्तपणे संमती दिली किंवा नाही दिली तरी त्या प्रक्रियेनंतर त्यांना मानसिक त्रास होतो. 

गर्भपात नियोजित असो व अचानक – मानसिक त्रास होतोच 

जगभरात जवळपास निम्म्या गर्भधारणा या अनियोजित असतात. गर्भपात करण्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. गर्भपाताच्या इतर कारणांमध्ये पालक किंवा गर्भाच्या सामाजिक, आर्थिक किंवा नातेसंबंधातील दबाव आणि शारीरिक किंवा मानसिक आरोग्य समस्यांचा समावेश होतो. तसेच आणखी अनेक कारणे असू शकतात.  गर्भपाताचे कारण काहीही असले तरी त्या स्त्रियांना दुःख, नुकसान आणि पश्चात्ताप वाटण्याची शक्यता खूप जास्त असते. जर नकारात्मक भावना तीव्र आणि सतत असतील तर ते नैराश्याचे लक्षण असू शकते

गर्भपातानंतरच्या नैराश्याची लक्षणे 

नियोजित अथवा अनियोजित गर्भपातानंतर स्त्रियांना जो मानसिक त्रास होतो तो पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) प्रमाणेच असतो. या नैराश्याची लक्षणे ही PTSD प्रमाणेच असतात. गर्भपातानंतर अनेक महिलांना पुढील त्रास होतात. अश्रू अनावर होणे, राग, दुःख, शोक किंवा सुन्नपणा असे मूड स्वीन्ग्स, नैराश्य, अपराधीपणा, खेदाची भावना, फ्लॅशबॅक, दुःस्वप्न आणि विस्कळीत झोप, आत्महत्येचे विचार, नात्यांमध्ये तणाव व समस्या, आत्मसन्मान कमी होणे, भविष्यातील गर्भधारणेची भीती अशी लक्षणे अनेक स्त्रियांना जाणवतात. काही स्त्रियांना रोमँटिक जोडीदाराला प्रतिसाद न देणे, सेक्समधील स्वारस्य गमावणे, सेक्समध्ये जास्तच स्वारस्य वाटणे अशीही लक्षणे जाणवतात. गर्भपाताचे नुकसान भरून काढण्यासाठी” त्वरीत पुन्हा गर्भवती होण्याची इच्छा असल्याने काही स्त्रियांचे सेक्समध्ये स्वारस्य वाढते असे तज्ज्ञांचे मत आहे.  ही लक्षणे गर्भपात झाल्यानंतर लगेच दिसून येतात आणि काही महिने  किंवा काहींच्या बाबतीत अगदी काही वर्षेही राहतात.

गर्भपातानंतरच्या नैराश्यावरील उपाय 

बाळासाठी प्रयत्न करताना दुर्दैवाने जर अचानक गर्भपात झाला असेल तर त्या स्त्रीच्या दुःखाची इतर कुणीही कल्पनाही करू शकत नाही. आणि जर बाळ हवे असेल आणि काही वैद्यकीय कारणांमुळे गर्भपात करावा लागला तरीही हे दुःख खूप मोठे असते. किंवा इतर काही कारणांमुळे जरी गर्भपात करावा लागला तरीही त्या स्त्रियांमध्ये आयुष्यभर अपराधीपणाची भावना घर करून राहते. अशा दुःखाचा अनुभव घेणार्‍या कोणत्याही स्त्रीला कुटुंब, मित्र आणि समाजाचा सपोर्ट मिळणे गरजेचे असते. शारीरिक व व भावनिक सपोर्ट हे दुःख आणि दुःखाच्या भावनांना नैराश्यात विकसित होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. या स्त्रियांना जर नैराश्य आले तर त्यावर उपचार होणार आवश्यक आहे. 

ADVERTISEMENT

नैराश्यावरील उपचारांमध्ये सपोर्ट ग्रुप जॉईन करणे, संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (CBT) सह समुपदेशन घेणे, अँटिडिप्रेसंट औषधे घेणे या सर्वांचा समावेश होतो. तसेच आरोग्यदायी आहार घेणे, नियमित व्यायाम करणे शक्य तितका तणाव कमी करणे, योग किंवा ध्यानधारणा या रिलॅक्सेशन टेक्निक शिकून घेऊन त्या अंमलात आणणे हे ही उपाय करणे आवश्यक असते. 

तुम्ही काही कारणाने गर्भपाताचा विचार करत असाल किंवा गर्भपात झाल्यानंतर तुम्हाला भावनिक त्रास होत असेल तर मदत मागण्यास संकोच करू नका. नैराश्यापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय करा.

Photo credit – istockphoto, dreamstime

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
21 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT