Advertisement

Mental Health

नैराश्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ 10 गोष्टी (How to get rid of depression)

Aaditi DatarAaditi Datar  |  Jan 23, 2019
नैराश्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ 10 गोष्टी  (How to get rid of depression)

Advertisement

आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की, काहीच आवडेनासं होतं. नोकरी आहे, लग्न झालंय, मुलं आहेत, घरसुद्धा आहे आणि बँक बॅलन्सही. पण आनंद नाहीये किंवा लग्न नाही झालं पण आयुष्य ठिकठाक चालंलंय. पण विचित्रशी बैचेनी वाटते, ज्यामुळे तुम्ही चिंतेत आहात. आनंदी का वाटत नाही, याचं कारण ही कळत नाही. फक्त एवढंच कळतंय की, काहीच चांगलं वाटत नाही. जसं करायला काहीच उरलं नाही. अशा काय करावं… काय करू नये… तुमची पण हीच समस्या असेल तर या ‘10’ गोष्टी ज्या तुम्हाला नैराश्यापासून सुटका मिळवून देतील आणि तुमचा आयुष्यातील उत्साह पुन्हा निर्माण होईल.  

1.लव्ह लिस्ट बनवा (Make a list)

get-rid-of-depression-6

डायरी आणि पेन घेऊन एक लिस्ट बनवा. या लिस्टमध्ये त्या सर्व गोष्टी लिहा, ज्या तुम्हाला खूप आवडतात. यामध्ये त्या लोकांच नावंही असू शकतं, ज्यांच्यावर तुमचं खूप प्रेम आहे. असं काम जे तुम्हाला करायला आवडतं. अशा गोष्टी ज्या मूड खराब असला तरी तुम्हाला आनंद देतात. या लिस्टला मर्यादा नाही. स्वतःला थांबवू नका, जे आहे, जेवढं डोक्यात आहे ते सर्व लिहीत जा. शेवटी तुम्हालाच कळेल की, आनंदी होण्याकरिता तुमच्याकडे कितीतरी गोष्टी आहेत, मग उदास का…जिंदगी अभी बाकी है मेरे दोस्त.  

2. सर्व काही उलट (Do the opposite)
या मूडमध्ये नेहमीच असं वाटतं की, घरी बसून रहावं. काहीही करू नये. पण तुम्हाला अगदी याउलट करावं लागेल. म्हणजे जेव्हा वाटेल की, अजिबात एनर्जी नाहीये आणि फक्त घरी बसून टीव्ही बघावा, तेव्हा बाहेर जायची तयारी करा. काहीही प्लान करा – शॉपिंग, मूव्ही, फिरायला जाणं पण तुमच्या डिप्रेस्ड मनाचं अजिबात ऐकू नका. अगदी त्याच्या विरूद्ध करा. मग तुम्हाला कळेल की, आयुष्यात करण्यासारखं बरंच काही आहे. नैराश्याचा ईलाज तुमच्याकडेच आहे. फक्त गरज आहे ती स्वतःला जागं करण्याची.

3. नाचा-गाणं गा आणि धम्माल करा (Have some fun)

get-rid-of-depression-1

जेव्हा वाटतं की, मजा येत नाहीये. काहीचं चांगलं वाटत नाहीये, तेव्हा आपण दुसऱ्यांच्या माध्यमातून आपला आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण याचा खरा उपाय आपल्याकडेच आहे. यासाठी मदत करेल तुमची शारिरीक हालचाल. तुमच्या आवडत्या गाण्यावर डान्स करा. सकाळी फिरायला जा. योगा करा. व्यायाम करा. मग बघा तुमच्या मेंदू आणि मनाचे दरवाजे उघडतील आणि समाधानाची ताजी हवा मिळेल, जी तुमचं आयुष्य अजून सुंदर बनवेल. जे तुम्हाला गवसत नव्हतं ते मिळेल आणि नैराश्यापासून सुटका होईल.

4. जे कधीचं केलं नाही (Try something new)

get-rid-of-depression-4

Also Read 15 तणाव कमी करण्याचे उपाय

जर तुम्हाला चांगलं वाटत नसेल किंवा काही सूचत नसेल. फक्त एकटं बसून विचार करायचा असेल आणि काही उपाय शोधायचा असले. तेव्हा असं काही करा जे तुम्ही आधी केलं नाही. यापेक्षा जास्त रोमांचक काय असू शकतं. कोणत्यातरी नवीन गोष्टीचा आनंद घ्या. मग ते पहिल्यांदा डिस्कोमध्ये जाणं असो जंगल सफारी असो क्रिकेट मॅच पाहणं असो किंवा असा एखादा ड्रेस घालणं ज्याबद्दल तुम्ही कधी विचार केला नसेल. विश्वास ठेवा…फरक पडेल.

5. क्रिएटीव्हीटीचा तडका (Be creative)

get-rid-of-depression-2

जेव्हा तुम्ही चिंतेत असाल तेव्हा काहीतरी क्रिएटीव्ह करणं सोडा… नॉर्मल काही करणं पण कठीण वाटतं. पण क्रिएटीव्हीटीकडे एक पाऊल उचला. सगळी एनर्जी परत येईल. काहीतरी लिहा, क्राफ्टींग करा, जुन्या रेसिपीज शोधून त्यात काहीतरी नवीन करून घरच्यांना खाऊ घाला. घरात काहीतरी बदल करा आणि तुमच्यातील क्रिएटीव्हीटीला पुन्हा एकदा जागृत करा. मग तुम्हाला नक्कीच रिजल्ट मिळेल आणि आनंद परत मिळेल.

6. स्वप्नांच्या दुनियेत (World of dreams)
स्वप्न पूर्ण होवो न होवो, आयुष्य उत्कंठावर्धक बनवण्यासाठी स्वप्नं पाहणं हा सर्वोत्तम उपाय आहे. तुम्ही जेव्हा स्वप्नं बघता तेव्हा ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं संपलंय, काहीच राहीलं नाही, तेव्हा तुमच्या स्वप्नांना आठवा. कारण स्वप्नं तुम्हाला कधी शांतपणे झोपू देत नाहीत. ती स्वप्नं पुन्हा पाहा. त्याबद्दल विचार करा, बोला. विचार करा की कोणती स्वप्नं तुम्हाला पूर्ण करता येतील आणि त्यांच्यामागे लागा आणि नैराश्यापासून सुटका करा.  

7. निसर्गाच्या सानिध्यात (In natures lap)

happy-7

निर्सगाच्या सानिध्यात आपल्या प्रत्येक समस्येच हमखास समाधान मिळतं. जर तुम्हाला काही करावं ते कळत नसेल तर निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. एखाद्या समुद्रकिनारी जाऊन अनवाणी चालून पाहा, नदीकिनारी जाऊन थोडा वेळ घालवा, बागेत जाऊन या, हिरव्यागार गवतावर चालून पाहा. तुम्हालाच फरक जाणवेल.

8. कधीही नाही म्हणू नका (Never say no)
जेव्हा आपल्याला काही आवडत नाही, तेव्हा आपण नेहमी म्हणतो. मला काही मजा येत नाहीये, मला कधीच आंनदी राहता येणार नाही, सगळंच वाईट आहे, काहीच आवडत नाहीये, माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. आता या शब्दांकडे लक्ष द्या. कधी नाही, कोणी नाही, काहीच नाही… हे शब्द तुमच्या डिक्शनरीमधून काढून टाका. मग बघा.

9. स्वीकार करा (Acceptance)

get-rid-of-depression-3

जे आहे ते आहे. जर तुमच्या सध्या असलेल्या परिस्थितीत बदल करणे शक्य नसेल तर स्वतःमध्ये बदल करा. परिस्थितीचा स्वीकार करा.नेहमीच वाईट परिस्थितीला बोल लावण्यापेक्षा हे चांगलं आहे. जी आहे तशी परिस्थिती स्वीकार करा आणि नैराश्यापासून स्वतःची सुटका करा. आंनदी राहा.  

10. चेकअप करून घ्या (Go for checkup)
जर या नऊ गोष्टींमुळेही काही फरक जाणवला नाहीतर. तर ही समस्या गंभीर असू शकते. कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे, काही करण्याची ईच्छा न होणे, नेहमी थकल्यासारखं वाटणं, निरूत्साही वाटणं ही नैराश्याची लक्षण असू शकतात. त्यामुळे वेळीच चेकअप करून औषधं घ्या आणि मेडिटेशन करा. यात काहीच वाईट नाही. त्यामुळे नैराश्यापासून सुटकेसाठी लवकरात लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे. वेळीच लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका.

Gifs: giphy.com

हेही वाचा :

कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी – टीप्स

#10yearchallenge क्रिकेटर युवराज सिंगची बायको हेजल कीचने शेअर केली भावनिक पोस्ट

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे