ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
how-to-deal-with-menstrual-acne

पाळीदरम्यान का येतात चेहऱ्यावर मुरूमं, करा सोपे उपाय

मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग्ज, क्रॅम्प्स येणे अथवा ब्लोटिंग होणे ही अत्यंत सामाईक समस्या आहे. काही महिलांना तर पाळीदरम्यान चेहऱ्यावर मुरूमं येतात. मासिक पाळीच्या दरम्यान अशा पद्धतीने मुरूमं येणं हे सामाईक असलं तरीही त्रासदायक आहे. ज्या महिलांना अथवा मुलींना याचा त्रास होतो त्याला मेन्स्ट्रूअल अॅक्ने (Menstrual Acne) असं म्हटलं जातं.  मेन्स्ट्रूअल अॅक्ने म्हणजे नेमकं काय आणि यापासून सुटका कशी मिळवायची याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. 

मेन्स्ट्रूअल अॅक्ने म्हणजे काय?

Home Remedies For Acne Scars In Marathi

मासिक पाळीदरम्यान शरीरामध्ये हार्मोनल बदल होत असतात, ज्याचा परिणाम हा चेहऱ्यावर मुरूमांच्या स्वरूपात होतो. मासिक पाळीदरम्यान मासिक पाळीच्या आधी चेहऱ्यावर मुरूमं येऊ लागण्याचा त्रास सुरू होतो. यालाच मेन्स्ट्रूअल अॅक्ने असं म्हणतात. काही महिलांच्या चेहऱ्यावर हे जास्त प्रमाणात येतात. तर काही जणींना याचा त्रास होत नाही. 

मेन्स्ट्रूअल अॅक्ने होण्याची कारणे 

1. मेन्स्ट्रूअल अॅक्ने होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल. मासिक पाळीदरम्यान टेस्टोस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉनच्या संरचना बदलत असतात. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही अधिक तेलकट होते आणि त्यामुळेच चेहऱ्यावर मुरूमं येतात

2. ओव्ह्युलेशननंतर शरीराचे तापमान हे अधिक उष्ण होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर अथवा अंगावरही मुरूमं येतात

ADVERTISEMENT

3. तुम्हाला पीसीओएस असेल तर तुम्हाला याचा अधिक त्रास होतो. पीसीओएसमुळे शरीरातील उष्णता लवकर बाहेर येत नाही आणि याचा परिणाम हा चेहऱ्यावर मुरूमं येण्यामध्ये होताना दिसून येतो

मेन्स्ट्रूअल अॅक्नेपासून कशी मिळेल सुटका 

मेन्स्ट्रूअल अॅक्नेपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेऊन करणे गरजेचे आहे. या नक्की कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घ्या. 

पोर्स करा स्वच्छ 

दिवसातून दोन वेळा चेहरा माईल्ड फेसवॉशने स्वच्छ करा. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर टोनरचा वापर करा. टोनरचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूमं निघून जाण्यास मदत मिळते. तसंच चेहरा अधिक चांगला राहातो. पोअर्स स्वच्छ करणे आवश्यक आहे.

हेल्दी डाएट 

मुरूमं आणि मेन्स्ट्रूअल अॅक्नेपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही कायम आपल्या आहारामध्ये व्यवस्थित भाजी आणि फळांचा समावेश करायला हवा. तेलकट पदार्थ खाणे टाळायला हवे. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी तर याबाबत अधिक काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. यामुळे मुरूमांपासून दूर राहण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

साखरेचा वापर कमी करा

जास्त मीठ आणि जास्त साखर खाण्यामुळेही चेहऱ्यावर मुरूमं येतात. मेन्स्ट्रूअल अॅक्ने कमी करण्यासाठी तुम्ही कमी साखर खा. तसंच रिफाईंड फूड्सचा वापर करा. जास्त मीठ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. 

तणावपासून दूर राहा

कोरोनाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण, काय करायला हवं

काही जणांना सतत सगळ्या गोष्टींची चिंता करत बसायची सवय असते. चिंता करत राहणे अर्थात तणाव घेणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत वाईट ठरते. याचा त्वचेवरही परिणाम होताना दिसून येतो. तणाव सतत असल्याने चेहऱ्यावर मासिक पाळीच्या दिवसात अधिक प्रमाणात मुरूमं येतात. तणाव आल्याने अनेक हार्मोन्स रिलीज होतात आणि चेहऱ्यावर मुरूमं येऊन त्याचा परिणाम दिसू लागतो. त्यामुळे शक्यतो तणावांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 

चेहऱ्याला सतत हात लाऊ नका 

चेहऱ्याला सतत हात लावणे चुकीचे आहे. सतत चेहऱ्याला हात लावल्याने चेहऱ्यावर मुरूमं आणि अॅक्ने येतात. यापासून सुटका हवी असेल तर हिरव्या भाजी आणि फळांचा आहारात समावेश करून घ्या. तसंच वर्कआऊट केल्यानंतर आपला चेहरा व्यवस्थित धुवा. 

या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही मेन्स्ट्रूअल अॅक्नेपासून सुटका मिळवू शकता. अगदी सहजसोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घ्या. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT