कोरफडाचा वापर त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. कोरफड एक औषधी वनस्पती तर आहेच शिवाय तिचा वापर तुम्ही घरच्या घरी क्लिन अप करण्यासाठी करू शकता. पार्लरमध्ये केले जाणारे क्लिन अप महाग आणि केमिकलयुक्त असतात. त्यापेक्षा कोरफडीने तुमची त्वचा खोलवर स्वच्छ तर होतेच शिवाय तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. कारण जर तुमची त्वचा हायड्रेट नसेल तर ती लवकर कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशा कोरड्या त्वचेवर काळे डाग, सुरकुत्या, फाईन लाईन्स अशा अनेक समस्या जाणवतात. शिवाय आजकाल कोणत्याही ऋतूत त्वचा टॅन होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र कोरफडीच्या क्लिन अपमुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डागही कमी होतात. यासाठी जाणून घ्या घरच्या घरी कसं करावं कोरफडचं क्लिनअप
कोरफडीचे क्लिन अप करण्याची पद्धत
कोरफडचा वापर करून तुम्ही फक्त तीन स्टेप्समध्ये क्लिन अप करू शकता. शिवाय कोरफड औषधी असल्यामुळे त्याचे दुष्परिणामही होत नाहीत.
साहित्य –
- कोरफडचा गर
- ओट्स
- गुलाबपाणी
- मध
क्लिन करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
एक चमचा ओट्स मिक्सरमध्ये वाटून त्याचे पीठ करा आणि त्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळा.
स्टेप १ – कोरफड आणि ओट्सचे मिश्रण एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा. हळूवार हाताने चेहऱ्यावर मसाज करा. पाच मिनीटे मसाज केल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
स्टेप २ – एका भांड्यात एक चमचा कोरफडीचा गर, गुलाब जल एकत्र करा आणि स्प्रे बॉटलने हे मिश्रण चेहऱ्यावर स्प्रे करा. या मिश्रणाचा वापर तुम्ही नियमित होममेड टोनर प्रमाणे करू शकता. जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर कॉटन पॅडने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
स्टेप ३ – एका भांड्याच कोरफडीचा गर आणि मध एकत्र करा. या मिश्रणाचा वापर तुम्ही मसाज क्रिमसारखा करू शकता. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा आणि वीस ते पंचवीस मिनीटे अपवर्ड दिशेने चेहऱ्यावर सक्युलर मोशनमध्ये मसाज करा. कॉटनने मिश्रण पुसून टाका आणि पाण्याने चेहरा धुवून टाका.
कोरफडाचे क्लिन केल्यामुळे काय होतो फायदा
चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. कारण कोरफडीमध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो. कोरफडीमध्ये अमिनो अॅसिड असल्यामुळे तुमची त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावर इन्संट चमक येते. कोरफड जेल स्वरूपात असल्यामुळे त्वचा खेचली जाते. ज्यामुळे स्वच्छ झाल्यावर मोकळे झालेले पोअर्स पुन्हा बंद होतात आणि त्वचा सैल पडत नाही. यासाठीच महिन्यातून एकदा हे घरच्या घरी करता येणारे क्लिन अप अवश्य करा. ज्यामुळे तुमची त्वचा राहिल कायम मऊ आणि निरोगी. शिवाय चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येत असल्यामुळे बाहेर जाण्यासाठी अथवा एखाद्या कार्यक्रमाआधी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही.
वापरा देशी पद्धत आणि मिळवा घनदाट केस, एका आठवड्यात होतील केस जाड