ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
केस गळत असतील तर वापरा भृंगराज तेल, जाणून घ्या फायदे

केस गळत असतील तर वापरा भृंगराज तेल, जाणून घ्या फायदे

आयुर्वेदामध्ये अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांचे फायदे आधुनिक युगातही अनेकांना थक्क करतात. प्राचीन काळापासून केसांची निगा राखण्यासाठी आयुर्वेदात भृंगराज तेलाचा वापर केला जात आहे.  या तेलाचा वापर केल्यामुळे फक्त केस गळणेच थांबत नाही तर स्काल्प निरोगी आणि केस मजबूत होतात. या तेलामध्ये भृंगराज वनस्पतीचा अर्क, नारळाचे तेल आणि तिळाचे तेल असते. या सर्व मिश्रणापासून तयार झालेल्या महाभृंगराज तेलामुळे तुमच्या केसांचे आरोग्य अधिक वाढते. महाभृंगराज तेलामध्ये कडूलिंब, आवळ्यासारखे अनेक आयुर्वेदिक घटक असतात. शिवाय लोह, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे या तेलाचा वापर केसांवर परिणामकारक ठरतो. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी , केसांमध्ये नैसर्गिक चमक आणण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांना भृंगराज तेलाने मसाज करू शकता. यासाठी जाणून घ्या या तेलाचे फायदे

केसांची वाढ चांगली होते

भृंगराज वनस्पतीमुळे तुमच्या स्काल्पचा रक्तप्रवाह सुधारतो. ज्याचा परिणाम तुमच्या केसांच्या वाढीवर होतो. या तेलातील अर्क् तुमच्या केसांच्या वाढीला अधिक प्रोत्साहन देतात. केसांची वाढ जलद गतीने व्हावी असं वाटत असेल तर  नियमित केसांना महाभृगंराज तेलाने मालिश करा. कारण  या तेलामुळे तुमचे हेअर फॉलिकल्स अधिक सक्रिय होतात. ज्यामुळे केस वेगाने वाढतात.

स्काल्प निरोगी होतो 

जर केसांमधील त्वचा कोरडी झाली अथवा फार चिकट झाली तर केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता वाढते. मात्र महाभृंगराज तेल तुमच्या केसांच्या मुळांमध्ये चांगले मुरते आणि स्काल्पचे पोषण करते. केसांमधील त्वचा मऊ आणि स्वच्छ झाल्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारते. या तेलामध्ये अॅंटि इफ्लैमटरी गुणधर्म असल्यामुळे केसांचा दाह कमी होतो  आणि  इनफेक्शनचा धोका टळतो. यासाठीच केसांना नियमित भृंगराज तेल लावून मसाज करावा आणि थोडावेळ स्टीम द्यावी. हेअर प्रॉडक्ट वापरताना मुळीच चुकवू नका हा क्रम

केस गळणे कमी होते

महाभृंगराज तेलात त्वचेला थंडावा देणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो. शिवाय या तेलामुळे केसांच्या  पुन्हा वाढ होण्यास चालना मिळते. जर तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर नियमित केसांना भृंगराज तेल लावण्यामुळे केस गळणे कमी होऊ शकते. लांब केस असतील तर अशी घ्या काळजी, या चुका पडतील महागात

ADVERTISEMENT

केस  पांढरे होणे थांबते 

आजकाल अनेकांना अकाली केस पांढरे होण्याची समस्या सतावत असते. केस पांढरे  होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ताणतणाव हा त्याचे मुख्य कारण असू शकतो. मात्र जर तुम्ही नियमित केसांना भृंगराज तेल लावले तर तुमचम्या केसांना चांगला आराम मिळतो आणि केस पांढरे होणे कमी होते. घरगुती उपाय करून तुमचे केस करा डिटॉक्स, जाणून घ्या पद्धत

09 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT