ADVERTISEMENT
home / आरोग्य
how-to-get-rid-of-bitter-taste-in-mouth

तापामुळे तोंड झाले असेल कडू, करा सोपे उपाय

ताप आल्यानंतर अथवा ताप येऊन गेल्यानंतर नेहमीच तक्रार असते की, तोंड कडू झालंय अथवा तोंडाला चव (bitter taste after fever) राहिली नाहीये. कोणत्याही जेवणाची अथवा पदार्थाची चव लागत नाही. तसंच काहीही खाताना कडवटपणा जाणवत राहोत. तापामुळे अथवा कोणत्याही आजारामुळे तुम्ही जर सतत औषधे घेत असाल तर तुम्हाला असा अनुभव येतो. औषधांमुळे तोंडीला कडवटपणा येतो. इतर आजारांपेक्षाही हा अनुभव ताप आल्यावर जास्त येतो. कितीतरी वेळा अगदी पाण्याचाही स्वाद कडू येतो. अशावेळी तुम्ही जर तुमच्या डाएटकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. ताप कमी करण्यासाठीही आपण अनेक घरगुती उपाय करतो. तापामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजमचा रेट कमी जास्त होतो आणि मेटाबॉलिजम नीट काम करत नाही. त्यामुळे तोंडाची चव बिघडते. तापामुळे तोंड कडू झाले असेल तर त्यासाठी नक्की काय डाएट अथवा उपाय (home remedies after bitter taste in fever) करायला हवेत ते आपण पाहूया.

शहाळ्याचे पाणी 

Tender coconut for bitter taste removal

तापामुळे तोंड कडू झाले तर तुम्ही सकाळी उपाशीपोटी शहाळ्याचे पाणी प्यावे. यामध्ये विटामिन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर याचे चांगले प्रमाण असते. त्यामुळे कोणत्याही आजारात शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम समजण्यात येते. पोटासाठी शहाळ्याचे पाणी चांगले आहे. पचनक्रिया चांगली राहते. तसंच तापात काहीही जेवण जात नाही अशावेळी शरीरातील उर्जा वाढविण्याचे कामही हे पाणी करते ज्यामुळे मेटाबॉलिजम रेट सुधारण्यास मदत मिळते. 

लिंबू पाणी 

lemon_water
lemon water

लिंबू पाण्यामुळेदेखील तुमच्या तोंडाला चव यायला मदत मिळते. मात्र तुम्ही लिंबू पाण्यात साखरेऐवजी मध मिक्स केला तर अधिक फायदा मिळतो. लिंबू पाण्यात विटामिन सी चे अधिक प्रमाण असते, ज्यामुळे शरीराला प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे मेटाबॉलिजम वाढते. मात्र दिवसातून केवळ एक ग्लास लिंबू पाणीच प्यावे. त्यापेक्षा अधिक पिऊ नये. दिवसभर हायड्रेट राहण्यासाठीही याची मदत मिळते. तसंच तुम्ही दिवसभरात पाणी जास्त प्या. यामुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते. लिंबूपाण्याचे फायदे अनेक आहेत.

पुदीना चटणी 

Mint Chutney

तापानंतर तुम्हाला तोंडाला स्वाद यायला हवा असेल तर तुम्ही पुदिन्याच्या चटणीचे सेवन नक्की करायला हवे. इतकंच नाही तर तुम्ही तुळशीची पानेही खाऊ शकता. पुदिन्याची चटणी ही स्वादिष्ट असते आणि तोंडाला चव आणून देण्यासाठी याचा फायदा मिळतो. तसंच पुदीना ही औषधी वनस्पती असल्याने त्याचा तोटा होत नाही. आरोग्यासाठी पुदीना चांगला फायदेशीर ठरतो आणि तोंडाला चव आणण्यासाठीही मदत मिळते. 

ADVERTISEMENT

नैसर्गिक पदार्थांचे करा सेवन 

ताप आला असेल तेव्हा तुम्ही पूर्ण बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही फॅक्टरीमधील कोणतेही पदार्थ खाण्यापेक्षा प्लांट बेस्ड पदार्थांचे सेवन करावे. तसंच किवी, सफरचंद यासारख्या फळांचा आपल्या आहारात समावेश करून घ्यावा. विटामिन सी युक्त फळं अशावेळी तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतात. तसंच तुमच्या तोंडाचा स्वाद परत आणण्यासाठी याचा उपयोग होतो. 

काय खाऊ नये 

तापामुळे तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर तुम्ही पेरू कधीही खाऊ नये. तसंच तळलेले पदार्थ, दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थही यावेळी खाऊ नये. कारण हे पदार्थ अशावेळी पचण्यास जड असते. या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. 

सूचना – तुमच्या तोंडाचा स्वाद जास्त दिवस गेला असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. वर दिलेल्या पदार्थांपैकी तुम्हाला कोणत्याही पदार्थांची अलर्जी असेल तर तुम्ही अजिबात त्याचे सेवन करू नये. तसंच याने तुमची समस्या जाईलच असा आमचा कोणताही दावा नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
28 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT