ताप येणे ही अत्यंत कॉमन समस्या आहे. वातावरणामध्ये फरक पडला अथवा थोडं काही इन्फेक्शन झालं तरीही ताप येतो. पण ताप आल्यावर लगेच घाबरून जायची गरज नाही. ताप आल्यावर आपण सर्वात पहिल्यांदा नक्कीच डॉक्टरकडे धावत जात नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण तापावर घरगुती उपाय करण्याकडे लक्ष देतो. ताप आल्यावर घरगुती उपाय (fever home remedies in marathi) काय करायचे हे साधारण घरामध्ये मोठ्या माणसांना माहीत असतं. पण काही वेळा आपल्याला नक्की काय घरगुती उपाय करायचे अथवा ताप येण्याची कारणे काय आहेत याची कल्पना नसते. मग अशावेळी आपल्याला सल्ला द्यायलादेखील आजूबाजूला कोणी नसलं की आपोआप आपण गुगल सर्च करायला घेतो. पण व्हायरल ताप असेल तर आपल्याला घरगुती उपाय करून नक्कीच बरं वाटतं. तापामुळे अचानक आलेला थकवा जाण्यासाठीही हे उपाय उत्तम ठरतात. या लेखातून आपण ताप आल्यावर घरगुती उपाय काय काय करता येतील ते पाहूया. त्याआधी ताप येण्याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.
Shutterstock
ताप येण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे वातावरणातील बदल. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना त्वरीत तापाची लक्षणे जाणवू लागतात. ज्या व्यक्तींची प्रतिकारकशक्ती कमी असते त्यांना तापाचा जास्त फटका बसतो. वातावरणामध्ये जरा जरी बदल झाला तरी अशा व्यक्तींना लगेच ताप येतो. सर्वात पहिले सर्दी आणि खोकला होतो आणि मग ताप येणे सुरू होतो. मात्र हा ताप काही काळापुरताच असतो. सर्दी आणि कोरडा खोकला यावर घरगुती उपाय केल्यास हा ताप बरा होतो. यामध्ये डोके दुखणे, अंग दुखणे, घशाला त्रास होणे, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून येतात. पण हा ताप गंभीर नसला तरीही तुम्हाला योग्य वेळी यावर औषधोपचार करणेही गरजेचे आहे. जर छातीत जास्त दुखत असेल अथवा ताप उतरत नसेल तर मात्र तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जावे.
ताप आल्यावर काही घरगुती उपचार इतके परिणामकारक असतात की तुम्हाला त्याने बरे वाटते. अगदी पूर्वपरंपरागत हे उपाय करण्यात येत आहेत. याचा फायदाही तुम्हाला होतो. असे कोणते घरगुती उपाय आहेत ते आपण पाहूया.
वाचा – मलेरिया ची लक्षणे मराठी
Freepik.com
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
ताप आल्यावर सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे. यामुळे शरीरातील उष्णता शोषून घेतली जाते आणि ताप कमी करण्यास याचा फायदा मिळतो. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने ताप डोक्यात शिरण्यापासून बचाव होतो. ताप आल्यावर तो नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्याचा मेंदूवर परिणाम झाल्यास परिस्थिती गंभीर होते. त्यावर अत्यंत गुणकारी ठरते ते थंड पाण्याची पट्टी. खरं तर संपूर्ण शरीरावर पट्ट्या ठेवाव्या. पण तसे शक्य नसल्यास, किमान कपाळ आणि तळपायावर या पट्ट्या ठेऊन ताप काढता येईल याची काळजी घ्यावी.
वाचा – गुळवेलाचा कसा वापर कराल
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
ताप आलेल्या व्यक्तीसाठी तुळस हा उत्तम घरगुती रामबाण उपाय आहे. कोणतीही व्यक्ती रोज सकाळी किमान तुळशीची पाच पाने खाईल तर आयुष्यात त्या व्यक्तीला ताप, सर्दी यासारख्या व्हायरल गोष्टींची भीती बाळगण्याची गरज नाही. तुळशीने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्या व्यक्तींना ताप, व्हायरल ताप अथवा ताप सतत येत असेल त्यांनी तुळशीचे रोज सेवन करावे. तुळस हा उत्तम आयुर्वेदिक उपचार आहे. तसंच यामुळे शरीराला कोणतेही नुकसान पोहचत नाही.
वाचा – क्षयरोगाची लक्षणे
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुण असतात. तसंच आल्यामध्ये आणि पुदिन्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता असल्याने आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता असल्याने हे मिश्रण ताप उतरविण्यासाठी हे मिश्रण योग्य उपाय ठरते. मधाचे फायदे अनेक आहेत.
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
तापामध्ये आल्याचा भरपूर फायदा होतो. तापामुळे होणारी सर्दी अथवा खोकला संपविण्यासाठी आल्याचा फायदा होतो. यातील अँटिइन्फ्लेमेटरी घटक तापापासून सुटका मिळविण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच आल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत मिळते. आले टिकवूनही ठेवता येते. तापात घसा दुखत असल्यास आल्याचा चहा त्यावर अत्यंत परिणामकारक घरगुती उपाय आहे.
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
ताप आल्यावर सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे. त्यामध्ये अॅपल साईड व्हिनेगर घातल्यास, तुम्हाला अधिक चांगला परिणाम मिळतो. ताप पटकन उतरायाला मदत मिळते. यामुळे शरीरातील उष्णता शोषून घेतली जाते आणि ताप कमी करण्यास याचा फायदा मिळतो. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने ताप डोक्यात शिरण्यापासून बचाव होतो. व्हिनेगरमुळे अंगातली उष्णता बाहेर येण्यास मदत मिळते.
Shutterstock
साहित्य
लसणीच्या पाकळ्या
वापरण्याची पद्धत
फायदा
लसणामध्ये डायफोरेटिक गुणधर्म असतात जे ताप आल्यावर अंगातील घाम काढण्यास फायदेशीर ठरते. ताप आल्यावर अंगाला घाम येणे अत्यंत गरजेचे असते. अंगात घाम आणण्यासाठी लसणीचा फायदा करून घेता येतो. याशिवाय लसणामध्ये अँटिटॉक्झिक, अँटिफंगल, अँटिबॅक्टेरियल गुणधर्मही आढळतात. ज्याचा तुमच्या शरीराला अत्यंत फायदा होतो. प्रतिकारशक्ती वाढून ताप पटकन कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे घरगुती उपाय करताना तुम्हाला ताप आला तर तुम्ही लसूण चघळा.
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
पाणी उकळवा आणि त्यात पुदिन्याची पाने, आल्याचे तुकडे, मेथी दाणे घाला
हे पाणी उकळल्यावर गाळून घ्या
त्यामध्ये मध मिक्स करून प्या
फायदा
कोणत्याही तापावर उत्तम उपाय म्हणजे पुदिना आणि आल्याचा काढा. हा काढा प्यायल्यानंतर तुमचा ताप पटकन उतरण्यास मदत मिळते. शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी पुदिना हा उत्तम उपाय आहे. तसंच आले आणि मेथी, मधाची साथ यामध्ये अधिक उपयोगी ठरते.
वाचा – Health Benefits Of Fenugreek Seeds In Marathi
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
हळदीमध्ये क्युरक्युमिन घटक अधिक प्रमाणात असतात. यामधील अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म हे प्रतिकारकशक्ती सुधारण्यास फायदेशीर ठरतात. हळदीमुळे तापात झालेला कफ, घशातील खवखव पटकन कमी होण्यास मदत मिळते. तसंच हळदीने सर्दी आणि खोकलाही पटकन निघून जातो. त्यामुळे उत्तम घरगुती उपाय म्हणून तापावर याचा उपयोग करून घेता येतो. हळद ही ताप, सर्दी आणि खोकला या तिन्हीवर रामबाण इलाज आहे. याशिवाय तुम्ही मीठ, हळद आणि मधाचं चाटण करून खाल्लं तरीही त्याचा फायदा होतो.
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
ग्रीन टी मध्ये अनेक नैसर्गिक वनस्पतींचा भरणा असतो. जे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. सर्दी, थंडी, ताप आणि अंग दुखत असेल तर तुम्ही ग्रीन टी मधील आल्याचा आणि लवंगचा स्वाद असणारा ग्रीन टी पिऊ शकता. दिवसातून दोन वेळा याचे सेवन केल्यानेही ताप कमी होतो. यामधील अँटिबॅक्टेरियल गुण तुम्हाला अधिक प्रतिकारशक्ती मिळवून देण्यास कारणीभूत ठरतात.
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
व्हायरल तापामध्ये थकवा पटकन येतो. हा थकवा कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मुलेठीचा हा काढा अत्यंत उपायकारक ठरतो. मुलेठी हा नैसर्गिक घटक असल्याने याचा उपयोग करून घेता येतो. तसंच मुलेठी हा आयुर्वेदिक उपाय आहे. यामुळे नुकसान होत नाही.
Shutterstock
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदा
तापामध्ये बऱ्याचदा सर्दी आणि खोकल्याचाही त्रास होत असतो. अशावेळी घशाला आराम देण्यासाठी आणि ताप पटकन घालविण्यासाठी दालिचिनीचा काढा हा घरगुती उपाय चांगला फायदेशीर ठरतो. दालचिनी, लवंग यामधील अँटिऑक्सिडंट्स तापावर उपयोगी ठरतात. दालचिनीचे अनेक फायदे आहेत. व्हायरल ताप उतरविण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.
आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाला ताप येतच असतो. पण ताप आल्यावर लगेच आपण नक्कीच डॉक्टर्सकडे जात नाही. साधारण 98-100 पर्यंत ताप असेल तर आपण नक्कीच घरगुती उपाय करून ताप घालविण्याचा प्रयत्न करतो. थंड पाण्याच्या घड्या, आल्याचा चहा, एखादी तापाची गोळी अथवा वर दिलेले उपाय तुम्ही करू शकता. पण इतके करूनही संपूर्ण दिवस जर ताप उतरला नाही आणि सतत कणकण जाणवत असेल अथवा सतत अंगदुखी आणि डोकेदुखी, घसादुखी होत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांकडे जाणे योग्य ठरते. कोणती लक्षणे असतील तर तापाची तर डॉक्टरांकडे जावे हे लक्षात घ्या.
ताप आल्यावर सर्वात महत्वाचे म्हणजे आराम करणे. यावेळी अजिबात घरातून बाहेर पडू नये. तुम्हाला कोणतेही इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
आपल्यामुळे इतरांनाही तापाचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसंच ताप आल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
ताप आल्यावर साधा चहा पिण्यापेक्षा तुम्ही आल्याचा, पुदिन्याचा चहा अथवा ग्रीन टी प्यायल्यास, ताप उतरण्यास मदत मिळते. लवकर बरे होण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होतो. त्यामुळे ताप आल्यावर चहा प्यायचा असेल तर शक्यतो आल्याचा चहा प्या.
ताप आल्यावर घाम येणे अत्यंत चांगले आहे. घाम आला म्हणजे तुम्ही बरे होत आहात हे कळून येते. तापामध्ये अजिबात घाम येत नाही म्हणूनच अंग अधिक गरम होते.
अलर्जीमुळे सहसा ताप येत नाही. अंगावर पुरळ येणे अथवा अन्य त्रास अलर्जीमुळे होतात पण ताप येत नाही. लोक सहसा याची गल्लत करतात.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक