शुद्ध देशी तूप (Desi Ghee) हे शरीर आणि सौंदर्या या दोन्हीसाठी नेहमीच फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदात देशी तुपाचे आयुर्वेदिक महत्त्व सांगण्यात आले आहे. त्वचेसाठी तुपाचे खूपच फायदे होतात. आयपी जनरल ऑफ न्यूट्रिशन, मेटाबॉलिज्म अँड हेल्थ सायन्सद्वारे करण्यात आलेल्या एका शोधानुसार, तुपामध्ये फॅटी अॅसिड, सॅच्युरेडेट फॅट, विटामिन ए, बी, डी, के आणि ई इत्यादी तत्व समाविष्ट आहेत. त्यासह देशी तुपामध्ये एखादी जखम भरण्याचेदेखील गुण असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. इतकंच नाही तर, तुपात कमी प्रमाणात पाणीही असते. तुपामध्ये असणारे वेगवेगळे घटक त्वचेला वेगवेगळे फायदे मिळवून देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? चेहऱ्यावरील कोरडेपणा घालविण्यासाठीही (use of ghee for dry skin) देशी शुद्ध तुपाचा फायदा होतो. अगदी अनादी काळापासून तुपाचा वापर करण्यात येतो. तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही अगदी डायरेक्ट याचा वापर केलात तरीही त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. कोरड्या त्वचेसाठी तुपाचा कसा वापर करायचा ते आपण जाणून घेऊया.
बेसन आणि तुपाचे उटणे
साहित्य
- 1 लहान चमचा शुद्ध तूप
- 1 मोठा चमचा बेसन
- आवश्यकतेनुसार गुलाबपाणी
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले एका बाऊलमध्ये देशी शुद्ध तूप घ्या आणि त्यात बेसन मिक्स करा
- तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही यात गुलाबपाणी मिक्स करू शकता
- यानंतर हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा आणि हळू हळू आपल्या हाताच्या बोटांनी चेहऱ्यावर मसाज करत संपूर्ण चेहऱ्याला लावा
- 15 मिनिट्स झाल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने तुम्ही धुवा
घ्यायची काळजी – तुम्हाला बेसनची अलर्जी असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर त्याऐवजी करू शकता. यापैकी कोणत्याही गोष्टी अलर्जी असल्यास वापरू नये.
तूप, कच्चे दूध आणि साखरेचा स्क्रब
साहित्य
- 1 लहान चमचा शुद्ध तूप
- 1 लहान चमचा कच्चे दूध
- एक मोठा चमचा साखर
बनविण्याची पद्धत
- एका भांड्यात तूप, दूध आणि साखर मिक्स करा
- आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि स्क्रब करा
- केवळ 2 मिनिट्स हलक्या हाताने तुम्ही स्क्रब करा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा
घ्यायची काळजी – तुम्हाला लहान आकाराच्या साखरेचा यासाठी वापर करणे आवश्यक आहे. तुमच्या चेहऱ्यावर मुरूम आले असतील अथवा तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर या स्क्रबचा वापर करू नका. पिंपल्स गेल्यानंतर तुम्ही याचा वापर करून पाहू शकता.
तूप, हळद आणि कोरफड
साहित्य
- 1 लहान चमचा कोरफड जेल
- अर्धा चमचा देशी शुद्ध तूप
- चिमूटभर हळद
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले एका भांड्यात कोरफड जेल, देशी शुद्ध तूप आणि हळद मिक्स करा
- हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिट्स तसंच राहू द्या
- यानंतर चेहऱ्याला हळूहळू मसाज करा आणि मग काही वेळात कोमट पाण्याने चेहरा धुवा
घ्यायची काळजी – तुम्हाला कोरफड जेलची अलर्जी असेल तर तुम्ही त्याऐवजी आळशीच्या तेलाचा वापर करू शकता.
महत्त्वाची सूचना – तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांशी बोलून घ्या आणि नंतरच चेहऱ्यावर तुपाचा उपयोग करा. वर देण्यात आलेल्या गोष्टींचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून पाहा. पॅच टेस्ट केल्यानंतर 24-48 तासनंतर जर त्वचेवर कोणते दुष्परिणाम दिसून आले नाहीत तरच याचा वापर करा. याचा वापर करताना तुम्ही काळजी घ्या. अन्यथा नुसत्या तुपाचादेखील तुम्ही वापर करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक