केसांमध्ये स्काल्प आणि कोंडा ही अतिशय कॉमन समस्या आहे. तेलकट स्काल्पमुळे (oily scalp) तुमचे केस नेहमी ओले दिसतात आणि त्याला योग्य फ्लोट येत नाही. त्यामुळे अशा केसांची हेअरस्टाईल करणंही कठीण होतं. हो ना? तसंच बऱ्याचदा तेलकट स्काल्प असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही पाहिलंत तर त्यांच्या अशा दिसण्यामुळे त्यांना आत्मविश्वासही कमी असतो. पण नक्की अशी स्थिती का उद्भवते. तेलकट स्काल्प म्हणजे नक्की काय? याची कारणं काय आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी नक्की काय करायला हवं, सतत हेअर सलोनचा आधार घेण्याची गरज भासते का असे असंख्य प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. यातून बाहेर पडण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही ऑईली स्काल्प आणि कोंड्यापासून सुटका करून घेऊ शकता.
तेलकट स्काल्प म्हणजे नेमकं काय? (What Is Oily Scalp)
Shutterstock
बऱ्याचदा लोक कोरड्या स्काल्पच्या कारणांसाठी डॅंड्रफ शँपूचा वापर करतात. पण यामुळे अधिक समस्या निर्माण होतात. यामुळे त्वचेवरील ग्रंथी या तेल अधिक प्रमाणात निर्माण करतात आणि स्काल्प अधिक ऑईली अर्थात तेलकट बनत जातो त्याला ऑईली स्काल्प असं म्हणतात. यामुळे डोक्यात खाज येणं, जळजळ होणं अशी समस्याही निर्माण होते. ऑईली स्काल्पमुळे तुमचे केस सतत तेलकट दिसतात. तर यामुळे केसांची गळती अधिक प्रमाणात होऊन केसांमध्ये जास्त प्रमाणात कोंडा निर्माण होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलकट स्काल्प हा महिलांपेक्षाही अधिक प्रमाणात पुरुषांना होतो.
तसेच चहा वृक्ष तेल काय आहे ते वाचा
तेलकट स्काल्प नक्की का होतो? (Causes Of Oily Scalp)
Shutterstock
स्काल्पची समस्या सर्वांनाच असते. त्यातही ऑईली स्काल्पची समस्या असेल तर ती त्रासदायक ठरते. पण स्काल्प होण्यामागची नक्की कारणं काय असतात हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारणं कळली तर त्यावर योग्य उपाय करू शकता. त्यामुळे याची मुख्य कारणं काय आहेत ते जाणून घेऊया
शरीरातील बदल (Body Changes)
Shutterstock
तुमच्या वयानुसार शरीरामध्ये बदल होत जातात. मुख्यत्वे महिलांमध्ये मासिक पाळी चालू झाल्यानंतर होणारा बदल हा ऑईली स्काल्प निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. या वेळेत त्यांचे चालू असणारे विचार ग्रंथीमधून अधिक तेल निर्माण करतात. तसंच गरोदरपणातही ऑईली स्काल्प जास्त प्रमाणात निर्माण होतो. या काळात सर्वात जास्त मूड स्विंग्ज होत असल्याने ग्रंथी जास्त तेल स्काल्पमध्ये निर्माण करतात.
ताणतणाव (Stress)
Shutterstock
आजकालच्या आयुष्यात प्रत्येकालाच घरी आणि अगदी ऑफिसमध्येही प्रचंड कामाचा तणाव असतो. तसंच आजकाल नात्यांमध्येही प्रचंड तणाव असतो. या सगळ्यामुळे तुमचा शरीरातील रक्तप्रवाह कमी होऊन स्काल्पमध्ये तेल निर्माण होतं आणि त्यामुळे कोंड्याची स्काल्पची समस्या सुरु होते. तसंच या समस्या सुरु झाल्यानंतर आपोआपच केसगळतीचं प्रमाणही वाढतं.
अनुवंशिकता (Genetic Factors)
काही जणांना हा त्रास अनुवंशिक असतो. तुमच्या आईवडिलांना स्काल्पचा त्रास असेल तर अनुवंशिकतेने हा त्रास तुम्हाला येतो. जर हा त्रास अनुवंशिक असेल तर त्यावर उपचार होऊ शकणं मात्र कठीण होतं. त्यामुळे जर स्काल्प आणि कोंड्याचं कारण हे अनुवंशिक असेल तर तुम्हाला उपचार मिळणं शक्यतो कठीण आहे.
स्निग्ध पदार्थांची अतिशयोक्ती (Excessive Lipid)
ऑईली स्काल्प होण्याच्या कारणांमध्ये शरीरामध्ये फॅटी, गोड आणि फास्ट फूड असे स्निग्धजन्य पदार्थ अतिप्रमाणात जाणं हेदेखील एक कारण आहे. यामुळे तुमच्या केसांमध्ये अधिक प्रमाणात तेल निर्माण होतं आणि त्याचा परिणाम ऑईली स्काल्पमध्ये होतो.
वातावरणातील बदल (Environmental Factor)
Shutterstock
हल्ली वातावरणामध्ये सतत बदल होत असतो. त्याव्यतिरिक्त धूळ, प्रदूषण आणि अन्य कारणांमुळे केसांना इजा पोहचते. ती धूळ आणि प्रदूषण तसंच केसांमध्ये चिकटून राहिल्यानेदेखील स्काल्प आणि कोंडा निर्माण होत असतो. हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे. यापासून कोणीच वाचू शकत नाही. कारण शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि प्रदूषणाचीही.
केसांची व्यवस्थित काळजी न घेणे (Improper Hair Care)
Shutterstock
केसांची व्यवस्थित आणि नियमित काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला नियमित केसांवरून आंघोळ करून शँपू आणि कंडिशनरचा वापर करायला हवा. तसंच तुमच्या केसांना कोणतं तेल सूट करतं हेदेखील पाहायला हवं. केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास, तुमच्या केसांमध्ये प्रदूषण आणि अन्य गोष्टींनी कोंडा आणि ऑईली स्काल्प निर्माण होणं साहजिकच आहे.
ऑईली स्काल्पकरिता नैसर्गिक घरगुती उपाय (12 Natural Home Remedies For Oily Scalp)
ऑईली स्काल्प होऊ नये म्हणून आणि जरी झाला तरी तो काढून टाकण्यासाठी म्हणून सतत पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेंट घेणं प्रत्येकाला परवडतं असं नाही. त्यासाठी तुम्हाला घरच्या घरीही अनेक उपाय करता येतात. आम्ही तुम्हाला इथे तुमच्यासाठी उपयोगी उपाय सांगणार आहोत.
केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स
अॅप्पल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
Shutterstock
अॅप्पल साईड व्हिनेगर हे एक प्रकारचं माईल्ड डिचर्जंट आहे. हे तुमच्या केसातील घाण आणि स्काल्प काढून टाकण्यास मदत करतं. तुमच्या केसांमध्ये तेल अधिक प्रमाणात येत असेल तर ते साफ करण्यासाठी तुम्हाला अॅप्पल साईड व्हिनेगरचा खूपच फायदा होतो. तसंच यामुळे त्वचेला इजा पोहचत नाही. यातील अॅसेटिक अॅसिड हे तुमचे पोअर्स अधिक टाईट करायला फायदेशीर ठरतात.
याचा वापर कसा करावा?
- 1 लीटर पाण्यामध्ये साधारण 60 मिली अॅप्पल साईड व्हिनेगर मिक्स करा
- हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि तुमच्या स्काल्प आणि केसावर उडवा
- काही मिनिट्स केस तसेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा
- ही पद्धत तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा वापरू शकता
बेकिंग सोडा (Baking Soda)
Shutterstock
कोणत्याही महाग उत्पादनापेक्षा बेकिंग सोडा हा पर्याय अप्रतिम आहे. बेकिंग सोड्याने तुमच्या केसातील घाण आणि स्काल्प काही काळातच निघून जाण्यास मदत होते. केसातील अधिक तेल शोषून घेण्यासाठी बेकिंग सोड्याची मदत होते.
याचा वापर कसा करावा?
- 1:3 या रेशोप्रमाणे पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा
- तुमच्या केसांना हे मिश्रण लावून साधारण एक मिनिट केसांना मसाज करा
- त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा
- केस धुवून झाल्यावर पुन्हा 1:4 या रेशोप्रमाणे पाण्यात व्हिनेगर घालून पुन्हा केसांना शँपू लावून केस धुवा
अंडी (Eggs)
Shutterstock
स्काल्पच्या समस्येवरील सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे अंडी. अंड्यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे केसांना पोषण मिळतं. केसांची वाढ चांगली होण्यासाठी यामध्ये जास्त प्रमाणात असलेलं प्रोटीन फायदेशीर ठरतं. तसंच अंड्यामध्ये विटामिन ए, विटामिन ई आणि विटामिन बी देखील असतं. जे तुमच्या केसांच्या पोषणासाठी अत्यंत उपयुक्त असतं.
याचा वापर कसा करावा?
- अंडी फोडून त्यातील बल्क काढावा
- हा बल्क त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करून फेटावा
- हे मिश्रण केसांना लावून अर्धा तास ठेवावं
- नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाकावे
मेंथॉल (Menthol)
Shutterstock
मेंथॉलमध्ये असणारे घटक हे केसांसाठी पोषक ठरतात. तसंच केसांमध्ये निर्माण झालेल्या स्काल्पसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरतात. केसांमध्ये निर्माण झालेलं अतिरिक्त तेल काढण्यासाठीही याचा चांगला उपयोग करून घेता येतो.
याचा वापर कसा करावा?
- 3 अंडी फोडून त्यामध्ये साधारण 1 ते 2 थेंब मेंथॉल टाकावं
- हे नीट फेटून घ्यावं आणि त्यानंतर अतिशय हळूवारपणे स्काल्पला लावावं
- साधारण 20 मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवा
- चांगल्या परिणामासाठी ही पद्धत तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा वापरू शकता
वाईन आणि नारळाचं तेल (Wine And Coconut Oil)
Shutterstock
हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण केसांसाठी बीअरच्या शँपूचा नेहमी वापर केला जातो. तसंच स्काल्पसाठी वाईनही उत्तम उपाय आहे. यामध्ये वाईनचं प्रमाण कमी ठेऊन तुम्ही ग्रीन टी चा वापरही करा. त्यामुळे तुमच्या केसांना चांगलं पोषण मिळतं.
याचा वापर कसा करावा?
- 1 चमचा वाईन, 1 चमचा नारळाचं तेल हे साधारण 200 मिली. तयार केलेल्या ग्रीन टी मध्ये घालावं
- हे नीट मिक्स करून तुमच्या स्काल्पवर लावा
- त्यानंतर व्यवस्थित मसाज करून एक तास हे तसंच ठेवा आणि मग धुवा
- चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता
ग्रीन टी (Green Tea)
Shutterstock
ग्रीन टी मध्ये असणारे पॉलिथिन्स, अँटिऑक्सिडंट्स तुमच्या केसातील स्काल्प काढून टाकायला मदत करतात. तसंच यामध्ये असणारं विटामिन बी, फोलेट, मँगनीज, पोटॅशियम आणि कॅफेनही केसांना चांगलं राखण्यासाठी मदत करतात. यातील टॅनिन अॅसिड हे केसातील स्काल्प नियंत्रणात राखण्यास मदत होते.
याचा वापर कसा करावा?
- 200 मिली. ग्रीन टी अर्धा लीटर पाण्यात घालून त्यातील पानं काढून नीट उकळून घ्या
- हे मिश्रण नीट तुमच्या स्काल्पवर लावा आणि साधारण 20 मिनिट्स ठेवा
- नंतर 10 मिनिट्स टॉवेलने तुमचा स्काल्प कव्हर करून ठेवा आणि मग गार कोमट पाण्याने केस धुवा
लिंबू (Lemon)
Shutterstock
स्काल्पच्या बाबतीत लिंबू हे अतिशय परिणामकारक ठरतं. लिंबामध्ये विटामिन सी चं प्रमाण अधिक असतं. नैसर्गिक अॅसिड असल्याने तुमच्या स्काल्पसाठी हे उपयुक्त ठरतं. तसंच यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
याचा वापर कसा करावा
- 4 लिंबू घ्या आणि लिंबाच्या सालासकट वाटून घ्या आणि नंतर ही पावडर पाण्यात मिक्स करा
- हे मिश्रण स्काल्पला लावून साधारण पाच मिनिट्स तसंच ठेवा
- नंतर केस पाण्याने धुवा
- तुम्ही हे आठवड्यातून किमान 4 वेळा करू शकता
कोरफड (Aleo Vera)
Shutterstock
कोरफड ही केसांसाठी उपयुक्त अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. तसंच तुमचा स्काल्प काढून टाकण्यासाठीही हे फायदेशीर ठरतं. यामुळे तुमच्या केसांची चांगली वाढ होते. तसंच तुमच्या केसातील अतिरिक्त तेल काढून टाकून त्वचा आणि केस चांगले राखण्यास मदत होते.
याचा वापर कसा करावा?
- कोरफडची काही पानं घेऊन ती वाटून घ्या आणि त्याची पेस्ट स्काल्पला लावून मसाज करा
- त्यानंतर काही वेळ तसंच ठेऊन गार पाण्याने धुवा
- चांगल्या परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा उपचार करू शकता
दही आणि लिंबू (Yogurt And Lemon)
Shutterstock
दहीदेखील तुमच्या केसांमधील स्काल्प काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतं. दह्यातील असणारं अॅसिड केसांचा स्काल्प कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसंच हा अतिशय सोपा उपाय आहे.
याचा वापर कसा करावा?
- 1 चमचा दही आणि 1 लिंबू मिक्स करून त्याचं मिश्रण बनवा
- हे मिश्रण केसांना लावून साधारण 20 मिनिट्सने थंड पाण्याने केस धुवा
- चांगल्या परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा उपचार करू शकता
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
लिंबू आणि वाईन (Lemon And Wine)
Shutterstock
लिंबू आणि वाईन हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. लिंबामध्ये असणारं विटामिन सी आणि वाईनमधील असणारे गुणधर्म केसांमधील स्काल्प आणि कोंड्यासाठी उपयुक्त ठरतं. याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर स्काल्पपासून सुटका मिळवू शकता.
याचा वापर कसा करावा?
- 200 मिली वाईनमध्ये साधारण 2 ते 3 लिंबाची पावडर मिक्स करा
- हे मिक्स्चर तुम्ही तुमच्या स्काल्पला लावून मसाज करा
- साधारण दहा मिनिट्स ठेवून पाण्याने धुवा
- आठवड्यातून दोन वेळा तुम्ही याचा वापर करू शकता
शँपू आणि बेकिंग सोडा (Shampoo And Baking Soda)
Shutterstock
बेकिंग सोडा केसातील पाणी शोषून घ्यायला उपयोगी ठरतो. नुसता शँपू वापरण्यापेक्षा शँपू बेकिंग सोड्याबरोबर मिक्स करून वापरल्यास, तुमच्या केसातील स्काल्प कमी होण्यास मदत होते. याचा तुमच्या केसांवर विपरित परिणादेखील होत नाही.
याचा वापर कसा करावा?
- 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा शँपू मिक्स करून घ्या
- केसांना लावल्यावर तुम्ही लगेच नेहमीप्रमाणे केस धुवा
- याचा वापर केल्यावर तुम्हाला त्वरीत योग्य परिणाम केसांवर आणि स्काल्पवर दिसून येतो आणि याचा वापर तुम्ही
- आठवड्यातून दोन वेळा नक्कीच करू शकता
अंडी आणि लिंबू (Eggs And Lemon)
Shutterstock
लिंबू हे नैसर्गिक अँटिमायक्रोबायल असा ऑईली स्काल्पसाठी उपाय आहे आणि अंड्यामुळे केसांना चांगलं पोषण मिळतं. त्यामुळे याचं कॉम्बिनेशन हे केसांमधील स्काल्पसाठी योग्य ठरतं.
याचा वापर कसा करावा?
- 1 अंड आणि 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्या आणि नीट फेटा
- तुमच्या स्काल्पवर हे मिश्रण लावून व्यवस्थित मसाज करा
- त्यानंतर साधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग केस धुवा
- चांगल्या परिणामासाठी तुम्ही हे आठवड्यातून दोन वेळा करू शकता
ऑईली स्काल्पकरिता लक्षात ठेवायच्या गोष्टी (Do’s And Don’ts For Oily Scalp)
ऑईली स्काल्पसाठी काय करायला हवं आणि काय नको हे तुम्हाला माहीत आहे का? काही महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
1. शँपूचा जास्त वापर करू नका
Shutterstock
तुम्ही जर रोज शँपूने आंघोळ करत असाल तर ते तुमच्या स्काल्पसाठी योग्य नाही. रोज शँपू केल्याने स्काल्प निघून जातो ही चुकीची गोष्ट आहे. रोज शँपू केल्यास, केसामध्ये जास्त तेल निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही साधारण एक दिवस आड केसांना शँपू करणं योग्य आहे. तसंच नेहमी शँपू केल्याने तुमचे केसही लवकर पांढरे होतात.
2. केसांना कंडिशनरने जास्त मॉईस्चराईज करू नका
Shutterstock
कोरड्या केसांसाठी कंडिशनर चांगलं असलं तरीही तेलकट केसांसाठी नुकसानदायी ठरतं. त्यामुळे ऑईली स्काल्पसाठी केसांना कंडिशनरने जास्त मॉईस्चराईज करू नका. यामुळे तुमचे केस अधिक पांढरे होतात आणि त्यावर जास्त धूळ जमा होते. तसंच तुमचे केस अधिक तेलकट होऊन अधिक घाण होतात.
3. ड्राय शँपू तुमच्या केसांसाठी योग्य
Shutterstock
तुम्हाला ऑईली स्काल्पचा त्रास जास्त प्रमाणात असल्यास, ड्राय शँपूचा वापर करण्यात येतो. ऑईली स्काल्पमुळे केस अतिशय अस्ताव्यस्त दिसतात. पण ड्राय शँपूचा वापर करून तुम्ही त्यावर नियंत्रण आणू शकता. त्यासाठी तुम्ही तुमचे केस व्यवस्थित विंचरून घ्या आणि नंतर केवळ तुमच्या मुळांवर ड्राय शँपू लावा. मग पुन्हा केस विंचरा.
4. तुमच्या केसांसाठी तुरट पदार्थांचा वापर करा
Shutterstock
तुम्हाला स्काल्पचा त्रास असल्यास, तुम्ही तुरट पदार्थांचा वापर करा. यासाठी अॅप्पल साईड व्हिनेगर हा उत्तम पर्याय आहे. तुमचे केस धुण्यासाठी याचा वापर केल्यास, तुम्हाला त्याचा फायदा होतो. तुमचा ऑईली स्काल्प निघून जातो. तुम्ही नियमित अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापर केल्यास, काळानुसार तुमच्या ऑईली स्काल्पची समस्या कायमची निघून जाते.
5. मेडिकेटेड शँपू
तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून ऑईली स्काल्पने सुटका मिळत नसेल तर तुम्ही मेडिकेटेड शँपू वापरा. नैसर्गिक घटक असणारे हे शँपू तुमच्या केसांमधील ही समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या शँपूमध्ये असणारं सॅलिसिलिक अॅसिड आणि सेलेनियम हे तुमच्या ऑईली स्काल्पची समस्या नष्ट करण्यासाठी मदत करतात. हे शँपू अतिशय स्ट्राँग असून त्यांचा वापर करताना खूप काळजी घ्यावी लागते.
कोरड्या केसांची काळजी घेणं आता अजून सोपं
ऑईली स्काल्पसंदर्भात प्रश्नोत्तरं (FAQs)
1. नक्की ऑईली स्काल्प का निर्माण होतो?
सततची धूळ आणि प्रदूषणातून फिरणं आणि शँपूचा अथवा केमिकलयुक्त गोष्टींचा केसांवर अति वापर केल्यास, ऑईली स्काल्प निर्माण होतात. यामुळे केसगळती आणि केसांच्या अधिक समस्या होतात.
2. वेगळ्या तेलांचा वापर करणं गरजेचं आहे का?
ऑईली स्काल्पमध्ये मुळातच त्वचेवर जास्त तेल निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करताना तुमच्या स्काल्पला त्रास होणार नाही आणि तुमच्या त्वचेला सूट होऊ शकेल असंच तेल वापरा.
3. घरच्या घरी उपाय करणं जास्त सोपं आहे का?
पार्लरमध्ये जाऊन सतत उपचार करून घेण्यापेक्षा या लेखामध्ये दिलेले उपाय करणं हे तुमच्यासाठी जास्त सोपं आहे. तुम्हाला जास्त खर्चही होणार नाही आणि तुम्ही वेळच्या वेळी उपचारही करू शकाल.