ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आयब्रोजनंतर तुम्हालाही येतात का पिंपल्स

आयब्रोजनंतर तुम्हालाही येतात का पिंपल्स

पिंपल्स येण्याची वेगवेगळी कारणं असतात. तेलकट त्वचा, चुकीचे खाणे, अपुरी स्वच्छता या सगळ्या कारणांमुळे त्वचेवर अगदी हमखास पिंपल्स येऊ शकतात. पण काही जणांना शरीरावरील केस काढले तरी देखील पिंपल्स येण्याचा त्रास होतो. शरीराच्या इतर भागावरील पिंपल्स हे लपवता येतात. पण चेहऱ्यावर आलेले पिंपल्स हे लपवणे फार कठीण असते आणि ते  दिसायलाही वाईट दिसतात.  विशेष: आयब्रोजनंतर खूप जणांना पिंपल्स येण्याचा त्रास होतो. आयब्रोज केल्यानंतर तुम्हालाही पिंपल्स येण्याचा त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी. हे पिंपल्स येण्याआधीच तुम्ही काळजी घेतली तर तुमचा चेहरा खराब होणार नाही.

आयब्रोज थ्रेडींग करताना तुम्ही घेता का काळजी, वाचा टीप्स

लावा बर्फ

त्वचा संवेदनशील असेल तर आयब्रोज केल्यानंतर पिंपल्स अगदी हमखास येतात. असे पिंपल्स केस ओढल्यामुळे येतात. अशावेळी तुम्ही आयब्रोज केल्यानंतर आयब्रोजच्या वर आणि बर्फ लावा. बर्फ लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच थोडे थंड वाटेल. त्यामुळे होणारा पिंपल्सचा त्रासही टाळता येईल. पण असे करुनही जर तुम्हाला पिंपल्स आले तरी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही पिंपल्स आले त्यावरही जर बर्फ लावले तरी देखील चालू शकेल. त्यामुळेही तुम्हाला आराम मिळेल.

तुम्हालाही हवेत *जाड* आयब्रोज?,मग हे नक्की वाचा

ADVERTISEMENT

अॅलोवेरा जेल

अॅलोवेरा जेल ही देखील थंडाव्याचे काम करते. आयब्रोज केल्यानंतर जर चुरचुरत असेल तर तुम्ही त्यावर अॅलोवेरा जेल लावा. ही जेल लावल्यामुळे थंडावा मिळतो. शिवाय या जेलमुळे येणाऱ्या पिंपल्सचा परिणामही कमी होऊ लागतो. जर तुम्हाला खूप पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही त्यावर अॅलोवेरा जेल लावा. त्यामुळे नक्कीच थंडावा मिळेल. बाजारात मिळणारी रेडिमेड अॅलोवेरा जेलही यावर उत्तम काम करते. 

मेंदी लावल्यावर केस होत असतील कोरडे, तर वापरा सोप्या टिप्स

चंदन

चंदन हे देखील त्वचेला थंड करण्याचे काम करते. चंदन है नैसर्गिक थंडावा देणारी पावडर असून ती भिजवून तुम्ही आयब्रोजवर लावा. त्यामुळे नक्की तुम्हाला थंड वाटेल. या शिवाय चंदनामधील घटक पिंपल्स येण्यासाठी त्वचेखाली तयार होणारे घटक असतात. त्यामुळे तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत नाही. त्यामुळे तुम्ही पिंपल्स आल्यानंतर त्यावर चंदन लावले तरी चालू शकेल. 

गुलाबपाणी

खूप जणांना गुलाबपाण्याने आराम मिळतो. त्यामुळे आयब्रोज केल्यानंतर केस ओढल्यामुळे होणारी जळजळ आणि त्यामुळे होणारा पिंपल्सचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याचा उपयोग केल्यास काहीच हरकत नाही. गुलाबपाण्याचा उपयोग केल्यामुळे आयब्रोजच्या वर ओपन झालेले पोअर्स बंद होण्यास मदत मिळते. गुलाबपाणी हे नैसर्गिक टोनर असल्यामुळे पोअर्स बंद होतात. त्यामुळे पिंपल्सचा त्रास होत नाही. आयब्रोज केल्यानंतर थेट गुलाबपाणी चेहऱ्यावर लावले तरी चालू शकते. 

ADVERTISEMENT

आता जर तुम्ही आयब्रोज करत असाल आणि तुम्हालाही असा त्रास होत असेल तर या गोष्टीची काळजी नक्कीच घ्यायला हवी. 

01 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT