आयब्रोज शेपमध्ये असतील तर चेहरा अधिक सुंदर आणि फ्रेश दिसतो. यासाठी महिन्यातून अथवा पंधरा दिवसांतून एकदा आयब्रोज केल्या जातात. मात्र आयब्रोजला परफेक्ट शेप देण्यासाठी थ्रेडिंग केलं जातं. असं थ्रेडिंग केल्यावर अनेकींना त्वचेला जळजळ आणि दाह जाणवत असेल तर त्यामुळे आयब्रोज करणं नकोसं वाटतं. अनेकींना तर थ्रेडिंग केल्यावर त्वचेवर रॅशेसदेखील येतात. तु्म्हालाही असा त्रास होत असेल तर करा हे घरगुती उपाय. ज्यामुळे त्वचेला मिळेल आराम आणि थंडावा
आयब्रोज केल्यावर लगेच करा हे घरगुती उपाय
त्वचा अती संवेदनशील असेल तर साधे आयब्रोज केल्यावरही तुमच्या कपाळाची त्वचा लाल होते. बऱ्याचदा या ठिकाणी रॅशेसही येतात यासाठी हे उपाय तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतील.
कोरफडाचे जेल लावा
आयब्रोज केल्यावर बऱ्याचदा ब्युटिशिअन जेलने भुवया आणि कपाळावर मसाज करतात. मात्र तुम्हाला जर केमिकल्सची अलर्जी असेल तर तुम्ही घरी गेल्यावर त्वचेवर कोरफडाचे जेल अथवा गर लावू शकता. कारण कोरफड त्वचेसाठी चांगला परिणाम करते. त्वचेला त्वरित थंडावा मिळाल्यामुळे तुमच्या त्वचेवर रॅशेस येत नाहीत.
दाट आणि रेखीव भुवयांसाठी असं वापरा आयब्रोज जेल
बर्फ लावा
त्वचेवर आलेल्या रॅशेसचा दाह कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्वचेवर बर्फ लावणे. आपल्या घरी बर्फ असतोच पटकन एखादी आईस क्युब त्वचेवर लावल्यास तुमच्या त्वचेचा दाह पटकन कमी होतो. शिवाय यामुळे रॅशेस कमी होतात.

कच्चे दूध वापरा
आयब्रोज केल्यावर त्वचेवर उठणारे रॅशेस आणि दाह यामुळे जर तुम्ही थ्रेडिंग करण्यास घाबरत असाल तर हा उपाय तुमच्या नक्कीच फायद्याचा आहे. यासाठी थोडं कच्चं दूध त्वचेवर लावा. दुधात असलेल्या पोषक घटकांमुळे तुमच्या त्वचेला थंडावा आणि पोषण मिळतं. ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.
आयब्रोजची अशी राखा निगा, फक्त थ्रेडिंग करणं पुरसं नाही
हॉट टॉवेलने शेक द्या
त्वचेला आराम मिळावा आणि आयब्रोज केल्यावर जळजळ होऊ नये यासाठी हा आणखी एक उपाय तुम्ही करू शकता. यासाठी गरम पाण्यात एक छोटा टॉवेल बुडवा आणि घट्ट पिळून त्याचा शेक तुमच्या आयब्रोजच्या जवळ द्या. ज्यामुळे थ्रेडिंग केल्यावर होणारी जळजळ कमी होण्यास मदत होईल.
आयब्रोजचा आकार सतत बदलत असाल तर मग एकदा वाचाच
लक्षात ठेवा जर आयब्रोज केल्यानंतर चेहऱ्यावर ब्लीच करणं आवर्जून टाळा. कारण यामुळे तुमच्या त्वचेची समस्या अधिक वाढू शकते. थ्रेडिंग केल्यावर तुमची त्वचा नाजूक होते अशा त्वचेला दाह आणि जळजळ होईल अशी कोणतीही ब्युटी ट्रिटमेंट त्यानंतर करू नका. आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करा आणि त्वचेला थंडावा आणि आराम मिळेल याची काळजी घ्या. त्यासोबत हे उपाय तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.