ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आयब्रोजचा आकार सतत बदलत असाल तर मग एकदा वाचाच

आयब्रोजचा आकार सतत बदलत असाल तर मग एकदा वाचाच

आयब्रोज हा प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हल्ली दागिने जितके प्रिय नसतील त्याहून काकणभर अधिक आयब्रोज प्रिय असतात. हल्लीच्या ट्रेंडनुसार आयब्रोज जाड आणि दाट असणे म्हणजे सुंदर दिसणे असे काहीसे समीकरण झाले आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यांचेच लक्ष इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आयब्रोजकडे जास्त असते. अनेक जण आयब्रोज जाड दिसण्यासाठी किंवा आताचा ideal आकार मिळवण्यासाठी जो काही प्रयत्न करतात ते पाहता तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया या महत्वाच्या गोष्टी

आयब्रोज शेप आणि प्रयोग

आयब्रोज थ्रेडींग

Instagram

प्रत्येकाच्या चेहऱ्याची रचना ही एकसारखी नसते. त्यामुळेच त्याच्या आयब्रोजचा आकारही एकसारखा नसतो. काहींच्या आयब्रोज या धनुष्याकृती तर काहींच्या गोलाकार काहींच्या सरळ अशा आकारात असतात. त्यांचा आकार तुम्हाला बदलता येऊ शकतो. म्हणजे तुमच्या चेहऱ्याला काय अधिक शोभते या नुसार तुम्हाला त्यात बदल करता येतात. पण हा बदल म्हणजे तुमच्या पातळ आयब्रोज जाड करणे आणि धनुष्याकृती आयब्रोजला गोलाकार करणे किंवा सरळ करणे शक्य असते. पण असे प्रयोग तुमच्या आयब्रोजच्या वाढीसाठी हानिकारक असतात त्यामुळे तुम्ही हा प्रयोग करत असाल तर थोडे सावध राहा.

ADVERTISEMENT

आयब्रोज थ्रेडींग करताना तुम्ही घेता का काळजी, वाचा टीप्स

आयब्रोज वाढीवर होऊ शकतो परिणाम

एक्स्ट्रा काढताना

Instagram

ज्या वेळी तुम्ही आयब्रोज करता त्यावेळी तुम्ही दोऱ्याचा उपयोग करुन केसांना मुळापासून काढत असता. आता हे केस मुळापासून काढत जरी असाल तरी कालांतराने त्याची वाढ होतेच. पण जर तुम्ही नीट लक्ष दिले तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की, तुमचे एक्स्ट्रा वाढलेले केस इतर केसांच्या तुलनेत फारच कमजोर असतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विसंबून राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही तुमचे आयब्रोज अगदीच पातळ केले आणि तुम्हाला पुढच्यावेळी ते जाड हवे असतील तर ते मिळवणे फारच कठीण होऊन जाते.

ADVERTISEMENT

पातळ आयब्रोज ठरतात त्रासदायक

मध्यंतरीच्या काळात एक ट्रेंड होता. अनेकांच्या आयब्रोज पातळ होत्या. त्यावेळी अनेकांनी आयब्रोजचा आकार पातळ केला होता. तुम्हालाही कधी असे पातळ आयब्रोज करुन पाहण्याचा मोह होत असेल तर हा प्रयोग अजिबात करुन पाहू नका. कारण आयब्रोज पातळ केल्यानंतर त्यांची वाढ व्हायला फारच वेळ लागतो. शिवाय तुमचे आय़ब्रोजचे केस वाढल्यानंतर त्यांच्या वाढीची दिशाही बदलते त्यामुळे तुमचा जुना आकार तुम्हाला पुन्हा मिळणे फारच कठीण होऊन जाते. 

आयब्रोज एकाच ठिकाणी करा

आता तुम्ही अनेकदा हा सल्ला देताना ऐकला असेल की, आयब्रोज वेगवेगळ्या ठिकाणी करु नका. याचे कारण असे की, तुम्ही ज्या ठिकाणी आयब्रोज नेहमी करता त्यांचा हात तुमच्या आयब्रोजवर बसलेला असतो. तुम्हाला सतत पाहण्याची सवय असल्यामुळे तुम्हाला काय चांगले दिसते हे देखील त्यांना कळते. जर तुम्ही सतत आयब्रोज वेगवेगळ्या ठिकाणी करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आयब्रोजवर दिसू लागतो. 

एकूणच आयब्रोजवर कोणाताही प्रयत्न करताना तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. कारण आयब्रोजचा सतत बदलणारा आकार तुमचे सौंदर्य बिघडवू शकतो. 

https://www.popxo.com/shop/zodiac-collection/#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

ADVERTISEMENT
28 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT