ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
how-to-hide-lower-belly-fat-in-suit-kurti-or-saree-in-marathi

साडी वा कुरतीमध्ये वाढलेले पोट कसे लपवावे, सोपे हॅक्स

प्रत्येकाचे शरीर हे वेगळे असते आणि युनिक असते. त्यामुळे जाड असणे अथवा बारीक असणे यावरून कोणालाही बोलणे अथवा मस्करी करणे हे खरं तर चुकीचे आहे. प्रत्येक जण आपल्या शरीराप्रमाणे आपण आकर्षक कसे दिसू याचा प्रयत्न करत असतो. तुमचे शरीर जाड असल्यास, तुम्ही कसे कपडे घालता आणि स्वतःला कसे सादर करता यावर सर्व काही अवलंबून आहे. आपण अनेकदा स्टायलिंग करताना आधुनिक आणि वेस्टर्न कपड्यांच्या टिप्स वाचल्या आहेत. पण भारतीय कपडे ज्याप्रमाणे साडी, पंजाबी ड्रेस अथवा कुरती यामध्ये तुमच्या लोअर बेली फॅट (Lower Belly Fat) अर्थात पोटाचा भाग अधिक जाडा दिसत असेल तर त्यासाठी नक्की काय करायला हवं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या भारतीय कपड्यांची स्टायलिंग (Fashion Styling) व्यवस्थित केली तर तुम्ही तुमचे जाडसर पोट नक्कीच लपवू शकता. यासाठी काय सोपे हॅक्स (Easy Hacks) करायचे हे जाणून घ्या. 

लांबसडक सूट (पंजाबी ड्रेस) बनविण्यासाठी वापरा अंब्रेला कट

सर्वात पहिल्यांदा आणि सर्वाधिक बेसिक टिप म्हणजे तुम्ही कोणत्याही भारतीय कपड्यांच्या बाबतीत घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही खालच्या बाजूने घेर असणारा अथवा अंब्रेला कट (Umbrella Cut) असणारा बनवून घ्या. असा ड्रेस अधिक जाडसर दिसत नाही आणि यामुळे तुम्ही तुमचे पोट आणि वाढलेला कमरेचा भाग अथवा तुमचा खालचा ढुंगणाचा भाग मोठा असल्यास, व्यवस्थित लपवू शकता. यासह तुम्ही वेस्ट लाईनमध्ये थोडासा वाईड बेल्ट एरिया (Wide Belt Area) ठेवा. ज्याप्रमाणे हाय वेस्ट जीन्समध्ये तुमचे पोट लपले जाते त्याचप्रमाणे या कपड्यांमध्येही तुमचे जाडसर पोट लपले जाते आणि तुम्ही बारीक दिसता. 

पंजाबी ड्रेसमध्ये कसे लपवाल वाढलेले पोट 

तुम्ही केवळ पंजाबी ड्रेस घालणार असाल आणि तुम्हाला वाढलेले पोट लपवायचे असेल तर तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स – 

  • तुमचे पोट मोठे असेल आणि तुमचे शरीर जाडसर असेल तर तुम्ही अनारकली ड्रेसचा अधिक वापर करावा. यामुळे बेली फॅट लपले जाते
  • तुमचे पोट बाहेर आले असेल तर तुम्ही तुमच्या सूटसह बेल्ट लावा. यामुळे जाड पोट लपले जाते 
  • प्रत्येक ठिकाणी अनारकली अथवा बेल्टचा वापर करू शकत नाही. त्यामुळे अशावेळी तुम्ही ए लाईन कुर्त्याचा वापर करा 
  • याशिवाय तुम्ही पंजाबी ड्रेससह ओढणीची स्टाईल करू शकता. तुम्ही साईड फ्लो स्टाईल केल्यास, पोट दिसून येत नाही. तुम्ही गळ्याजवळ दोन्ही बाजूला ओढणी घेऊ नका. कारण यामुळे तुमचे पोट झाकण्यास मदत मिळणार नाही 
  • चुणीदार अथवा एकदम स्किनी लेगिंग्ज (Skinni Leggings) घाला जी तुम्हाला पँट स्टाईलमध्ये अधिक चांगली दिसेल. पायजमा घाला. पटियाला अथवा भरपूर मोठा पायघोळ कपडे घालणे टाळा

साडीमध्ये कसे लपवावे पोट 

How to Hide Lower Belly Fat in Saree – Instagram

साडी ही अत्यंत  आरामदायी अशी स्टाईल आहे. तुम्हाला ही व्यवस्थित कॅरी करता यायला हवी. साडीमध्ये कोणतीही स्त्री ही सुंदरच दिसते. तुम्हाला साडी नेसणे आवडत असेल आणि तुमचे पोट मोठे असेल तर त्यासाठी काही सोप्या टिप्स – 

ADVERTISEMENT
  • तुमचा लुक नक्की कसा दिसेल हे तुमच्या साडीच्या फॅब्रिकवर अवलंबून असते. तुम्ही नेहमी हलकी साडी निवडण्याचा प्रयत्न करा 
  • कॉटन अथवा ऑर्गेंझा साडी तुम्हाला दिसायला अधिक आकर्षक दिसते, पण ही साडी तुम्हाला कमरेचा खालचा भाग मोठा दर्शविण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही साडी निवडणे तुमच्या आवडीप्रमाणे आहे
  • यासह जाड्या बॉर्डरच्या जागी पातळ आणि लहान बॉर्डरची साडी निवडा जी तुम्हाला नेसायला सोपी होईल. यामुळे तुम्ही जाड्या दिसणार नाही 
  • निऱ्यांवर तुम्ही साडी पिनच्या ऐवजी एक लहानशी सेफ्टी पिन साडीच्या खालच्या बाजूने लावा. यामुळे निऱ्याही व्यवस्थित राहतात आणि त्यासह तुमचा पेल्विग एरियादेखील अधिक जाडसर दिसणार नाही 
  • नेहमी गडद रंग निवडा. हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. काळा, लाल, पांढरा या रंगामध्ये तुमची पोटाची जाडी लपली जाते
  • हेव्ही नेक डिझाईनच्या ऐवजी तुम्ही हेव्ही बॅक डिझाईन्सचे ब्लाऊज घातल्यास तुम्ही बारीक असल्याचा भ्रम निर्माण करण्यास उपयोगी ठरतात 
  • तसंच तुम्ही जॅकेट स्टाईल ब्लाऊज, पेपमल ब्लाऊज इत्यादीदेखील वापरू शकता जे तुम्हाला साडीमध्ये पोट अधिक जाड दर्शवू देणार नाही
  • ¾ स्लीव्ह्ज अथवा फुल स्लिव्ह्ज अधिक चांगले दिसतात. यामुळे तुमच्या वाढलेल्या पोटाकडे लक्ष जात नाही

कुरतीमध्ये कसे दिसाल अधिक बारीक 

पंजाबी ड्रेस आणि साडीमध्ये वाढलेले पोट कसे लपवायचे याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगितल्या. याशिवाय कुर्ती घालणार असाल तर कशा पद्धतीने तुम्ही वापरल्यास, बारीक दिसाल याबाबतही काही सोप्या टिप्स – 

  • आपल्या कुर्तीसह तुम्ही श्रग घाला ज्यामुळे तुम्हाला ट्रेंडी लुकही मिळेल आणि त्याशिवाय तुम्हाला पोट लपविण्यास मदतही मिळेल. पोट लपविण्याचा हा सोपा उपाय आहे
  • श्रगच्या ऐवजी तुम्ही डेनिम जॅकेट्सचाही वापर करू शकता 
  • तुम्हला कुरती स्टाईल करण्यासाठी जीन्ससह फ्लेअर्ड स्कर्टचाही वापर करता येऊ शकतो. तसंच अंब्रेला कट स्कर्ट (Umbrella Cut Skirt) घातल्यास, तुमचे पोट दिसून येणार नाही
  • शरारा पँटसह तुम्ही कुर्ती वापरू शकता, जेणेकरून बेली फॅट दिसणार नाही  
  • ए वाईन, अनारकली अथवा जास्त घेर असणारी कुरती तुमचे वाढलेले पोट लपविण्यासाठी मदत करू शकते

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही वाढलेले पोट कमी दाखवू शकता अथवा स्वतःला अधिक बारीक दाखवू शकता. त्यामुळे बाहेर जाताना तुम्ही या टिप्सचा वापर करून स्टायलिंग करा. 

16 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT