कॉफीची तल्लफ काय असते ते फक्त कॉफी लव्हर्सनाच कळू शकते. कॉफीचा नुसता वास जरी आजुबाजूला आला तरी देखील कॉफी लव्हर्सचा त्याची पटकन जाणीव होते. आता कोणत्या चांगल्या कॅफेमध्ये मिळणाऱ्या कॉफीची तुलना कुठेही होऊ शकत नाही आणि सतत रोज जाऊन कॉफीही पिऊ शकत नाही. कारण कॉफीची किंमत साधारण 150 रुपयांपुढे असते. पण बेस्ट कॉफी घरी करायची असेल तर काही खास रेसिपी तुम्ही फॉलो केली तर तुम्हालाही अगदी तशीच कॉफी करता येईल. चला जाणून घेऊया कशी करायची बेस्ट कॉफी
Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक
घरी केलेली कॉफी आवडत नाही?
घरी केलेली कॉफी खूप जणांना आवडत नाही यामागे बरीच कारणं असू शकतात. त्यापैकी कारीह कारणं पुढील प्रमाणे
- घरी केलेल्या कॉफीला दुधाचा खूप वास येतो. ज्याला दुधाचा वास आवडत नाही. त्याला घरी केलेल्या कॉफीमध्ये दुधाचा वास येतो त्यामुळे घरची कॉफी प्यायली जात नाही.
- घरी केलेल्या कॉफीमध्ये दुधावर तवंग दिसत राहतो. त्यावर तेल आल्यासारखे दिसते. अशी तवंग आलेली कॉफीही खूप जणांना आवडत नाही. त्यामुळे घरी बनवलेली कॉफी खूप जणांना प्यायला कंटाळा येतो
- घरी केलेल्या कॉफीला फ्रोथ म्हणजेच फेस येत नाही. जो कॅफेमध्ये देण्यास येणाऱ्या कॉफीला येतो. त्यामुळेसुद्धा घरी केलेली कॉफी ही फ्रोथ न आल्यामुळे आवडत नाही.
या 5 पदार्थांच्या अतिसेवनामुळे सुटू शकतं तुमचं पोट
अशी करा बेस्ट कॉफी
कॉफी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. तुम्ही कोणत्याही पद्धतीने कॉफी केली तरी देखील ती परफेक्ट होऊ शकते.
कॉफी पद्धत1
डल्गोना कॉफी करण्यासाठी तुम्हाला मेहनत खूप लागते. पण ही कॉफीची चव मस्त लागते.
साहित्य: कॉफी पावडर, साखर, पाणी, गरम किंवा थंड दूध (दूध हे कार्टनमधील असावे. कारण ते थेट वापरता येते ते गरम केले तरी चालते त्याला पिशवीतल्या दुधासारखे तेल सुटत नाही)
कृती: एका कपमध्ये 1 चमचा कॉफी किंवा तुम्हाला स्ट्राँग लागेल इतकी कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये साखर आणि साधारण कॉफी भिजेल इतकेच पाणी घाला. आता चमचा किंवा फोर्क घेऊन कॉफीचा रंग बदलेपर्यंत फेटत राहा. कॉफी चांगली स्मुथ झाली की त्यामध्ये थंड किंवा गरम दूध घाला. तुमची कॉफी तयार
कॉफी पद्धत 2
कॉफी झटपट बनवायची असेल तर तुम्ही काही सोपी ट्रिकही वापरु शकता. यामध्ये तुम्हाला कॉफीचे कॉनसट्रेंटेड पाणी बनवून ठेवायचे असते. यासाठी फार मेहनत लागत नाही.
साहित्य : कॉफी, पाणी, साखर, कार्टनचे दूध
तुम्हाला कॉफी रोज पिण्याची सवय असेल तर तुम्ही कॉफीची एक अख्खी बॉटल घेतली तरी देखील चालेल. आता कॉफी एका मोठ्या पातेल्यात ओतून ती कोरडी असतानाच त्यामध्ये साखर घाला. तुम्हाला किती गोड आवडतं या नुसार साखर घाला. आता त्यामध्ये साधारण कॉफीच्या दुप्पट पाणी घालून कॉफी चांगली फेस येईपर्यंत फेटा.आता हे तयार कॉफी पाणी फ्रिजमध्ये एका एअर टाईट बॉटलमध्ये ठेवा. हे पाणी तुम्हाला हवे तेव्हा काढून थेट दुधात घालून तुम्हाला ही कॉफी पिता येईल
आता बेस्ट कॉफी प्यायची असेल तर या पद्धती अवलंबा तुम्हाला नक्कीच ही कॉफी आवडेल.
एखाद्या पार्टीसाठी मेनू सेट करताना… पैसे नाही जाणार वाया