ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
आपल्या प्रियजनांसाठी बनवा खास ऑनलाईन शुभेच्छा कार्ड्स

आपल्या प्रियजनांसाठी बनवा खास ऑनलाईन शुभेच्छा कार्ड्स

आपल्या प्रियजनांपैकी कोणाचा वाढदिवस असो किंवा त्यांचा एखादा खास दिवस असो आपल्याकडून दिवसभरात त्यांना आवर्जून शुभेच्छा दिल्या जातातच. मग ते वयस्कर असो वा तरूण असो. एक छोटासा शुभेच्छा संदेशही त्यांना नक्कीच आनंद देऊन जातो. खरंतर त्यांचा वाढदिवस किंवा इतर खास दिवस ही आपल्यासाठी संधी असते, त्यांना आपलं त्यांच्यावरील प्रेम जतवण्याची. नाही का? आणि त्यात जर तुम्ही स्वतः डिझाईन केलेलं किंवा तयार केलेलं शुभेच्छा कार्ड जर त्यांना दिलं. तर आनंद द्विगुणित होणं साहजिक आहे.

पूर्वी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बरेचदा दुकानात जाऊन ग्रीटींग्ज कार्ड्स घेतली जायची. पण सध्या डिजीटलचा जमाना असल्यामुळे ऑनलाईन मेल किंवा मोबाईलवरून सर्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे आता चलती आहे ती ऑनलाईन कार्ड्सची. जर तुम्ही ऑनलाईन कार्ड्सबाबत जाणत नसाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा लेख. ज्यामुळे तुम्हाला खास तुमचा पर्सनल टच असलेलं कस्टमाईज्ड ऑनलाईन कार्ड बनवून आपल्या प्रियजनांना देता येईल. 

ऑनलाईन कार्डची निवड (Choosing Online Card)

वाढदिवसाला पाठवा ऑनलाईन कार्ड्स

Canva

ADVERTISEMENT

सर्वात आधी तुम्हाला ज्या व्यक्तीला आणि ज्या स्पेशल ओकेजनसाठी हे कार्ड द्यायचं आहे. ते ठरवून घ्या. यामुळे कार्डची निवड करणं सोपं जाईल. जसं ग्रीटींग कार्ड, आमंत्रण पत्रिका किंवा थँक्यू कार्ड इ. ऑनलाईन सर्च केल्यावर तुम्हाला अनेक वेबसाईट्स आढळतील. ज्यावर तुम्ही फ्रीमध्ये ग्रीटींग कार्ड्सची निवड करू शकता. ज्यामध्ये विविध ओकेजन्सप्रमाणे टेंपलेट्स असतात. smilebox.com, greetingsisland.com, paperlesspost.com, designwizard.com या काही वेबसाईट्स आहेत. ज्यावर तुम्ही कस्टमाईज्ड ऑनलाईन कार्ड्स अगदी सहज बनवू शकता. 

माहिती आणि कस्टमाईज्ड डिझाईन (Customized Designs)

एकदा तुम्हाला हवं असलेलं कार्ड निवडल्यावर पुढील स्टेप म्हणजे त्यात माहिती भरणे. जसं आमंत्रण असल्यास नाव, पार्टीची तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती जी आमंत्रितांसाठी महत्त्वाची आहे. जसं पार्टीची थीम इ. तर ग्रीटींग कार्ड असल्यास तुम्हाला हवा असलेला शुभेच्छा संदेश. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला रंग किंवा कार्डवरील डिझाईनची निवड करा. तुम्ही कार्ड पर्सनलाईज्ड करण्यासाठी फोटोसुद्धा एड करू शकता. फोटोज एड करण्यासाठी तुम्हाला ते वेबसाईटवर अपलोड करावे लागतील. तुमच्या प्रियजनांचे किंवा तुमचे त्यांच्यासोबतच्या फोटोजची निवड तुम्ही करू शकता. जर ते नको असल्यास एखादा बर्थडे केकचा फोटो किंवा इतर पर्याय निवडू शकता. तसंच तुम्ही आवडतं म्युझिकही कार्ड्ससाठी निवडू शकता. कारण यात बरेचदा म्युझिकल कार्ड्सचाही समावेश असतो.

कार्ड पाठवणे (Sending Card)

ऑनलाईन द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Unsplash

ADVERTISEMENT

एकदा तुमचं कार्ड बनवून झाल्यावर तुम्ही त्यासाठी सूटेबल एन्व्हलपसुद्धा निवडू शकता. ज्यामुळे तुमचं कार्ड अजून उठावदार दिसेल. यावर ज्या व्यक्तीला ते कार्ड पाठवायचं आहे त्याचं नाव आणि इतर आवश्यक माहिती तुम्ही टाकू शकता. हे कार्ड तुम्ही ई-मेल किंवा डाऊनलोड करून मोबाईलवरही पाठवू शकता. आहे की नाही सोपं आणि झटपट होणार ऑनलाईन कार्ड.

वाढदिवसासाठी ऑनलाईन शुभेच्छा

Canva

सर्वात शेवटी सांगायची गोष्ट म्हणजे अनेक वर्ष आपण बर्थडे कार्ड्स पाठवून किंवा स्वतः देऊन आपल्या प्रियजनांचा खास दिवस साजरा करत आहोत. बाजारातील रेडीमेड कार्ड्स खास माणसांच्या खास दिवशी देण्यापेक्षा आपण स्वतः तयार केलेलं कार्ड कधीही स्पेशलच नाही का? मग भले ती ऑनलाईन का असे ना. तुम्हीही नक्की ऑनलाईन कार्डचा पर्याय पाहा आणि भेट घेणं शक्य नसल्यास या कार्डचा वापर नक्कीच करा. आपल्या दूरच्या प्रियजनांनाही जवळ असल्याचं फिलींग या निमित्ताने नक्की द्या.

ADVERTISEMENT
22 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT