ADVERTISEMENT
home / पालकत्व
लहान मुलांना भाज्या खाऊ घालताना

पालेभाजी खायला मुलं नकार देतात?, पालकांनो एकदा वाचा

 पालेभाजी मुलांना खाऊ घालणे हे पालकांसाठी नेहमीच कसरतीचे काम असते. काही मुलं काही केल्या भाज्या खायला पाहात नाही. विशेषत: पालेभाज्या. चावाव्या लागतात, थोड्याशा कडू लागतात यामुळेच की काय लहान मुलांना त्या पानात अजिबात वाढू नये असेत वाटतो. पण लहान मुलांसाठी पालेभाज्या या फारच महत्वाच्या असतात. त्यांना पानात पालेभाजी वाढायची असेल तर ती कशी वाढायला हवी त्यासाठी आम्ही काही ट्रिक सांगणार आहोत. इतकेच नाही तर जे पालक याकडे दुर्लक्ष करतात त्यांना देखील हे वाचणे आज महत्वाचे ठरणार आहे.

पालेभाजी न खाण्याची कारणं 

मुलं लहान असतानाच पालेभाजी करण्याचा कंटाळा करत असतील आणि त्या ऐवजी त्यांना चटपटीत काहीतरी खायची सवय तुम्ही लावत असाल तर तुम्ही आताच ही सवय सोडून द्या. कारण खूप पालक मुलं खातच नाही असे म्हणून त्यांच्या हातात, त्यांना हवे ते देतात. म्हणजे त्यांना भाज्या खाण्याऐवजी बटाटा दे किंवा तळलेला एखादा पदार्थ दे. पानात त्यांच्या आवडीची भाजी नाही. म्हणून पोळीशी खायला चीझ किंवा बेफर्स दे. अशा सवयी मुळात आपणच लहानपणी त्यांना लावतो. मुलांनी जरा का कू करायला घेतले की, कटकट नको म्हणून अनेक पालक थोडासा आळशीपणा करतात आणि त्यानंतर मग मुलं पालेभाजी खात नाही. 

उदा. तुमच्या आजुबाजूला अशी अनेक मोठी मुलंसुद्धा असतील. त्यांना पालक मेथी, मुळ्याची भाजी आवडत नाही म्हणून पटकन काहीतरी वेगळं करुन देण्याचा घाट घालतात. तोच अधिक त्रासदायक ठरतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी या गोष्टीचे भान आवर्जून ठेवा. 

खायलाच लावा

खायलाच लावा भाज्या

भाजी खायला लावणे हे सर्वस्वी आपल्या हातात असते. कोणतीही भाजी खायला घालताना त्याची चव काय आहे याचे विशेष मुलांना सांगू नका. काही पालक एखादी भाजी आपल्याला आवडत नसेल तर त्यासाठी चित्र विचित्र तोंड करतात. ज्यामुळे मुलांना असे वाटते की अशा भाज्या अजिबात खाऊ नये. मुलांना त्यांची चव कळू द्या. तुम्ही त्यांना आधीच काही चवींचे विशेष सांगाल तर त्यांना नकोच असते.
उदा. अरेरे कारले कडू असे म्हटले की, ते ती भाजी खयला बघणार नाही. त्या उलट त्यंना कधीतरी ती भाजी स्वत: अनुभवू द्या. याचे कारण असे की, असे केल्यामुळे त्यांना काय आवडते त्यांचे टेस्टबड काय आहे. हे त्यांना कळते. त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट खायलाच लावा. 

ADVERTISEMENT

झोपेत लहान मुलं का रडतात, जाणून घ्या अधिक

आवर्जून करा भाज्या

मुलांना सवय लावायची म्हणजे त्यामध्ये साततत्य असायला हवे. एखादी पालेभाजी तुम्ही एकदाच कराल आणि अपेक्षा कराल की मुलांनी ती खावी तर तसे अजिबात शक्य नसते. मुलांना ती भाजी त्यांच्या चवीत बसवण्यासाठी काही काळ तरी त्यांना सतत भरवावी लागते. असे केले तरच मुलांन ती भाजी माहितीची होती. सरावाने तुम्ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे खाऊ घातली तरी देखील ते आवडीने भाजी खायला सुरुवात करतात. आता आठवणीने एक गोष्ट करा.  आठवड्यातून किमान तीनवेळा भाज्या मुलांना मिळतील याची विशेष काळजी घ्या. मग फरक बघा. कंटाळत का असेना मुलांना पालेभाज्या खाण्याची सवय नक्की लागेल. 

आता पालेभाज्या न खाणाऱ्या मुलांच्या पालकांनो ही काळजी नक्की घ्यायला सुरुवात करा.

स्वयंपाक करताना अशा शिजवा भाज्या, राहाल नेहमी निरोगी

ADVERTISEMENT
05 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT