ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Balachi Shi Honyasathi Upay

बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय | Balachi Shi Honyasathi Upay

लहान बाळ नक्की का रडते याची कारणं पाहायला गेलं तर सर्वात पहिल्यांदा घरातील मोठे बाळाचे पोट तर फुगले नाही ना? अथवा बाळाचे पोट आज साफ झाले आहे की नाही, बाळाला शी झाली की नाही हे आधी तपासतात. बाळाचे पोट साफ न होण्याची कारणे अनेक आहेत. बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय (Balachi Shi Honyasathi Upay) आपण या लेखातून पाहणार आहोत. बाळ किती वेळा शी करते हेदेखील पाहावे लागते. बाळाला शी होत नसेल तर उपाय काय आहेत आणि बाळाची बद्धकोष्ठता कशी रोखावी हेदेखील आपण पाहणार आहोत.

बाळाचे पोट साफ न होण्याची कारणे | Baby Constipation Reason In Marathi

Balachi Shi Honyasathi Upay
Balachi Shi Honyasathi Upay

बाळाला जर शी झाली नाही तर बाळाला पोटात दुखायला लागते. बद्धकोष्ठता बोलता येत नसल्यामुळे आणि आई अथवा बाबांनाही याचा अनुभव नसल्यामुळे बद्धकोष्ठता (Baby Constipation In Marathi) कळून येत नाही. पण शी होताना बाळ जर खूपच किरकिर करू लागले अथवा रडू लागले तर बाळाचे पोट साफ नाही असे समजावे.  बाळाची शी घट्ट आहे की पातळ आहे यावरून त्याची बद्धकोष्ठता कळून येते. बाळ किती वेळा शी करते यावरून बाळाचे पोट साफ होते आहे की नाही हे समजते. पण बाळाचे पोट साफ न होण्याची मुळात काय कारणे आहेत, ते आपण पाहूया. 

पदार्थांचा अथवा दुधाचा त्रास 

पहिले सहा महिने बाळ हे केवळ आईच्या दुधावर असते. त्यानंतर त्याला अन्य घन पदार्थांची चव दिली जाते. पण मग अचानक असे पदार्थ देणे बाळाला त्रासदायकदेखील ठरू शकते. बाळाला तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात द्यावे जेणेकरून बाळाच्या पोटात दुखणार नाही. अन्य पदार्थांमुळे बाळाचे पोट साफ होत नाही आणि मग पोटात दुखून शी होण्यासही त्रास होतो. 

बदललेले दूध 

काही वेळा आईचे दूध पुरत नाही म्हणून वेगवेगळ्या ब्रँड्सचे दूध बाळाला पाजले जाते. मात्र एकदा सुरू केलेला ब्रँड सारखा सारखा बदलू नका. यामुळे बाळाच्या पोटाला त्रास होतो आणि बाळाला शी होण्यासही त्रास होतो. सगळ्या प्रकारचे अथवा सगळ्या ब्रँड्सचे दूध बाळाला पचतेच असे नाही. तसंच काही ठिकाणी बाळाला दुधाची पावडरदेखील दिली जाते. जर याने त्रास होत असेल तर तुम्ही वेळीच याची काळजी घ्यायला हवी. 

ADVERTISEMENT

पचनाचा त्रास 

बाळाला पचनाचा त्रास होत असेल तरीही बाळाचे पोट साफ होत नाही. त्यामुळे आपण बाळाला कोणत्या वेळेला कोणते पदार्थ खायला देत आहोत आणि बाळाला ते पदार्थ पचत आहेत की नाही याकडेदेखील त्याच्या पालकांनी योग्यरित्या लक्ष द्यायला हवे. त्यासाठी आधी साधारणतः बाळ किती वेळा शी करते हे तुम्हाला जाणून घ्यायला हवे. 

बाळ किती वेळा शी करते?

बाळाला शी होण्यासाठी उपाय
बाळाला शी होण्यासाठी उपाय

बाळाचा जन्म झाल्यावर सुरुवातीच्या दिवसामध्ये बाळ कधी आणि किती वेळा शी करते हे कोणालाच कळत नाही. बाळाचे शी करणे सुरूच राहते. काही दिवसानंतर बाळाची शी करण्याचा अंदाज आणि त्याची वेळ आपण जाणून घेऊ शकतो. बाळ किती वेळा शी करते यापेक्षा बाळ साधारण कधी शी करते याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. काही बाळ दूध प्यायल्यानंतर लगेच त्वरीत शी करतात. तर काही बाळांना काही ठराविक वेळेमध्येच शी होते. त्यामुळे काही दिवसानंतर तुम्हाला बाळ किती वेळा शी करते याचा अंदाज नक्कीच येतो. तुम्ही जर स्तनपान आणि बाटलीचे दूध असा बदल बाळाच्या खाण्यापिण्यामध्ये करत असाल तर बाळाच्या शी ची वारंवारता, शी चा वास आणि बाळाच्या शौचाचा पोत यामध्ये बदल होत राहतात. त्यामुळे तुम्हाला माहीत नसेल तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. 

बाळाला जेव्हा तुम्ही घन पदार्थ द्यायला सुरूवात करता तेव्हाही बाळाची शी करण्याची वेळ बदलू शकते. तसंच बाळाच्या शी चा पोतही बदलतो. पदार्थ खायला लागल्यानंतर बाळाच्या पचनक्रियेमध्ये बदल होत असतो. त्याप्रमाणे बाळाच्या शी करण्याची वेळदेखील बदलते. बाळांना अधिक घट्ट शी होऊ लागते. काही बाळांना अशा वेळी बद्धकोष्ठतेचा त्रासही होतो. त्यामुळे बाळ किती वेळा शी करते आणि बाळाचे पोट साफ होत आहे की नाही याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. बाळाला किमान बोलायला यायला लागेपर्यंत तरी त्याच्या पाल्याने त्याच्या तब्बेतीकडे विशेषतः पोट साफ होत आहे की नाही (balache pot saf honyasathi upay) याकडे लक्ष द्यायला हवे. 

बाळाची बद्धकोष्ठता कशी रोखावी ?

Baby Constipation In Marathi

बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय (Balachi Shi Honyasathi Upay) अनेक आहेत. पण बाळाची बद्धकोष्ठता कशी रोखावी यासाठी (Baby Constipation Home Remedy In Marathi) काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. 

ADVERTISEMENT
 • बाळाला तुम्ही योग्य प्रमाणात आणि पोषक आहार द्या. या आहारामध्ये नाचणी सत्व, फळे, पालेभाज्या, डाळी या सर्वांचा समावेश असावा
 • बाळ जसे मोठे होते त्याप्रमाणे त्याचा व्यायाम आणि त्याच्या हालचाली होतील याकडे पालक म्हणून तुम्ही वेळीच लक्ष द्या
 • बाळाला काही वेळ मुद्दाम पोटावर उपडी झोपवा जेणेकरून त्याच्या पोटावर दबाव येईल आणि शी होण्यास मदत होईल
 • एका ठराविक वेळेनंतर शौचाला जाण्याच्या सवयी लावायला हव्यात. यामुळे बाळाच्या शरीराला वेळीच शी करण्याची सवय लागते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही 
 • बाळाला शौचाला त्रास होत असल्यास, बाळ वेळेवर कंटाळा न करता शी करण्यासाठी जाईल यासाठी बाळाला वेळोवेळी पालक म्हणून तुम्ही प्रवृत्त करायला हवा
 • बाळाला त्रास होईल असे खाण्याचे पदार्थ देणे टाळा 

बाळाची शी होण्यासाठी उपाय | Balachi Shi Honyasathi Upay

Balachi Shi Honyasathi Upay

बाळाची शी होण्यासाठी उपाय ( Balachi Shi Honyasathi Upay) नक्की काय आहेत याबाबत या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बाळाच्या बद्धकोष्ठतेवर नक्की काय उपाय आहेत (Baby Constipation Home Remedy In Marathi) याबाबत जाणून घ्या. 

अधिक प्रमाणात आईचे दूध देणे

बाळाला जर शी होत नसेल तर आईचे दूध बाळाला अधिक प्रमाणात देऊ शकतात. बाळ नेहमी आईचेच दूध पित असेल तर तुम्ही बाळाला वेगळे दूध देऊन पाहा. बाळाच्या आहारात बदल करून पाहा. जेणेकरून फॉर्म्युला बदलल्यास, बाळाला व्यवस्थित शी होऊ शकते. मात्र याचे प्रमाण अति ठेऊ नका. बाळाच्या तब्बेतीप्रमाणे आणि त्याच्या वयाप्रमाणेच तुम्ही त्याला दूध द्या. जेणेकरून बाळाचे पोट साफ होऊ शकेल.

तरल पदार्थ देणे

बाळाची शी होण्यासाठी उपाय करताना बाळाला तुम्ही अधिक प्रमाणात द्रव पदार्थ द्या. सफरचंद, पेर अथवा मोसंबीचा ताजा रस काढून बाळाला द्या. बाळाला याची चव आवडत नसेल तर त्यात अधिक साखर घाला आणि थोडे पाणी घालून अधिक पातळ करून त्याचा रस द्या. यामध्ये अजिबात फळांचा गर येऊ देऊ नका. तसंच याशिवाय तुम्ही बाळाला नियमित दूध पाजता तसंच द्या. यामुळे बाळाची शी होण्यास मदत मिळेल. 

तूप घातलेला मऊ भात 

Lahan Mulana Kay Khayla Dyave

तुमचे बाळ जर सहा महिन्यांपेक्षा अधिक मोठे असेल आणि बाळाला पोट साफ होण्यासाठी उपाय तुम्ही शोधत असाल तर तुम्ही तूप घातलेला अत्यंत मऊ भात बाळाला योग्य प्रमाणात भरवू शकता. तूप हे पोटासाठी अत्यंत उत्तम ठरते. बाळाला शी होण्यासाठी काहीही त्रास होत असेल तर तुपामुळे बाळाचे पोट साफ होण्यासाठी मदत मिळते. तूप घातलेल्या मऊ भातामुळे बाळाची शी व्यवस्थित होते. बाळाचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

दूध बदलून पाहणे 

साधारण सहा महिने बाळ आईचेच दूध पित असते. पण तरीही काही वेळा पोटात गॅस होण्याचा त्रास बाळांना होतो. त्यामुळे तुम्ही सहा महिन्यानंतर बाळाचे दूध बदलून पाहा. यामुळे बाळाला बद्धकोष्ठतेचा होणारा त्रास कमी होतो. तसंच बाळाला व्यवस्थित शी देखील होते. 

व्यायाम

तुमच्या बाळाने जर आता रांगून पुढे जाण्यास सुरूवात केली असेल तर त्याला पचनसाठी चांगलीच याची मदत होते. पण तरीही बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल आणि बाळाचे पोट साफ होत नसेल बाळ पाठीवर झोपलेले असेल तेव्हा त्याचे पाय वर घेऊन सायकलिंग सारखी हालचाल करा. त्याला व्यवस्थित पोटाची हालचाल केल्यामुळे बाळाची शी होण्यास मदत होते. तसंच तुम्ही पाय पोटाजवळ आणून बाळाचा व्यायाम करून घ्या

मसाज

पोट साफ न झाल्यामुळे बाळाला खूपच अस्वस्थ वाटते आणि त्यामुळे बाळ खूपच किरकिर करते. बाळाची ही अस्वस्थता कमी करण्यासाठी बाळाला नियमित मसाज करणेही अत्यंत गरजेचे आहे. बाळाला पोटावर झोपवा आणि पाठीवर तेलाने मसाज करा. जेणेकरून पोटातील गॅस निघून जाण्यासही मदत होते. तसंच बाळाला नियमित शी होऊन पोट साफ राहण्यास मदत मिळते. 

घन पदार्थांमध्ये करा बदल

बाळाला तुम्ही जे घन पदार्थ देत आहात त्यामध्येदेखील बदल करून तुम्ही पाहू शकता. बाळाची शी होण्यासाठी उपाय करताना हादेखील घरगुती उपाय (baby constipation home remedy in marathi) तुम्ही करून पाहू शकता. बाळाच्या आहारामध्ये तुम्ही दोन भाग फळांचा आणि तीन भाग भाज्यांचा समावेश करून पाहा. यामुळे बाळाला शी होणे सहजसोपे होते. बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही हा बदल करायलाच हवा. 

ADVERTISEMENT

सपोसिटरी

बाळाला शी व्हावी म्हणून तुम्ही आपल्या बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सपोसिटरीदेखील वापरू शकता. आपल्या बाळाचे नक्की वय किती आहे आणि त्याची कशी स्थिती आहे. बाळाला किती शी होत आहे या सगळ्याचा अभ्यास करून डॉक्टर व्यवस्थित डोस लिहून देतात. हे तुम्ही बाळाच्या गुदाशयामध्ये घालू शकता आणि त्यानंतर साधारण अर्ध्या तासाच बाळाला शी होते. पण हे तुम्ही डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये करणे आवश्यक आहे. बाळाचे अवयव हे अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे अधिकाधिक नैसर्गिक उपायांचा वापर करावा. 

रेचक 

जेव्हा तुम्हाला घरातील नैसर्गिक रेचक बाळाला शी होण्यासाठी उपयोगी ठरत नसतील तेव्हा तुम्ही दुकानातील रेचक वापरू शकता. मात्र यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. बाळाची तब्बेत अत्यंत नाजूक असते. त्यामुळे काळजी घ्यावी. या रेचकमुळे बाळाची त्वचा डिहायड्रेट होण्याचा धोक असतो. म्हणूनच डॉक्टरांच्या देखरेखीखालीच रेचक द्यावे. 

बाळाला शी न होणे केव्हा ठरते काळजीचे कारण ?

Balache Pot Saf Honyasathi Upay

आम्ही दिलेले उपाय बाळाचे पोट साफ होण्यासाठी योग्य ठरू शकतात. पण जर नैसर्गिक उपायांनीदेखील बाळाला शी होत नसेल अथवा बाळाच्या पोटात दुखत असेल तर तुम्ही वेळीच बालरोगतज्ज्ञांकडे जायला हवे. काही लक्षणे दिसत असतील तर बाळाला शी न होणे हे काळजीचे कारण ठरते. अशी नक्की कोणती लक्षणे आहेत घ्या जाणून. 

 • शी करताना लहान बाळाला त्रास होत असेल आणि बाळ रडत असेल.
 • बाळ अधिक जोर देऊन शी करत असेल आणि तरीही होत नसल्यास
 • बाळाच्या शी मधून रक्त येत असल्यास अथवा तुम्हाला बाळाच्या फिशरजवळ त्वचा फाटल्यासारखी वाटत असेल तर बाळासाठी हे खूपच वेदनादायी ठरू शकते 
 • डायपर सतत शौचाने भरत असल्यास
 • पोटात सतत गॅस होत असल्यास 

प्रश्नोत्तरे | FAQ’s

1. बाळामधील बद्धकोष्ठतेची लक्षणे नक्की काय आहेत ?
बाळांना कमी वेळा शी होते. पण दोन तीन दिवस शी होतच नसेल आणि असं वारंवार होत असेल तर बाळाकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. ही बाळामधील बद्धकोष्ठतेची सुरूवात असू शकते. 

ADVERTISEMENT

2. बाळाला शी होत नाही म्हणजे नक्की काय होते ?
योग्य आहाराचा अभाव, बाळाच्या रोजच्या खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष न दिल्यास, बाळाला वेळीच सवय न लावल्यास, बाळाला शी होत नाही आणि याचा परिणाम म्हणजे बाळाच्या पोटात गॅस होणे अथवा बाळाला बद्धकोष्ठता होणे असा होतो. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष द्यावे. 

3. बाळाची शी साफ होण्यासाठी पोटावर ओवा भाजून लावणे योग्य आहे का ?
बऱ्याचदा लहान मुलांना ओवा भाजून पोटावर लावला जातो. जेणेकरून पोटातील गॅस निघून जातो. त्यामुळे तुम्ही अगदी हलक्या हाताने हा उपाय नक्कीच करू शकता. 

15 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT