जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय अनेकांना असते. बडीशेपेमुळे खाल्लेले अन्न पचायला नक्कीच मदत होते. पण आता केवळ पचनासाठी म्हणून नाही. तर तोंडाची चव बदलावी. तोंडाचा वास जावा म्हणून हा मुखवास खाल्ला जातो. यामध्ये हल्ली इतके प्रकार मिळतात की, त्यातील प्रत्येकाचीच नाव आपल्या लक्षात सुद्धा राहात नाही. तुम्ही जर मुखवास घेण्यासाठी गेला असाल तर तुम्ही तेथे मिळणाऱ्या आंबट- गोड चिंचेच्या गोळ्याही नक्की पाहिल्या असतील. चिंच म्हटली की, तोंडाला पाणी आल्यावाचून राहात नाही. पण बाजारात मिळणारी या चिंचेच्या पाचक गोळ्या घरीच करता आल्या तर…? म्हणूनच आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ही खास रेसिपी
हिवाळ्यात बनवा सोप्या सूप रेसिपीज
आंबट गोड चिंचेच्या पाचक गोळ्यांची रेसिपी
shutterstock
साहित्य:
200 ग्रॅम सीडलेस चिंच (बाजारात सहज उपलब्ध), 200 ग्रॅम गूळ ,½ चमचा लाल तिखट,½ चमचा सैंधव, ½ चमचा जीरे पावडर, बारीक दाणेदार दळलेली साखर
कृती:
- चिंच घेऊन ती स्वच्छ करुन घ्या. त्यातील धागे आणि कडकं सालं काढून घ्या. (धुण्यासाठी पाण्याचा उपयोग अजिबात करु नका.
- एका मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ केलेली चिंच घेऊन ती हळूहळू वाटून घ्या. जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटताना अडथळा येत असेल तर ती कुटून घेतली तरी चालतील. पण पाण्याचा उपयोग अजिबात करु नका.
- वाटलेली चिंच एका भांड्यात काढून घ्या.
- एक सॉसपॅन मंद आचेवर ठेवून तो तापल्यानंतर त्यात गूळ घाला. गूळ मंद गॅसवर वितळू द्या. वितळायला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घाला.
- गूळ चांगले वितळले की, त्यामध्ये तुम्ही भाजलेली जिरे पूड, सैंधव आणि लाल तिखट घाला.चांगले एकजीव करा
- तयार मिश्रणात चिंचेचा गोळा टाका. गूळ चिंचेत मुरेपर्यंत चांगले ढवळत राहा.
- पाण्याचा उपयोग करु नका. चिंच शिजायला सुरु झाल्यानंतर ती आपोआपच शिजू लागते. त्याचा लगदा होतो.
- गूळ चांगलं मुरल्यानंतर मिश्रण वाटीमध्ये काढून घ्या आणि थंड होऊ द्या.
- चार ते पाच तासानंतर तयार चिंचेचे बारीक बारीक गोळे करुन त्याला छान कणीदार साखरेत घोळवा. तुमच्या आंबट-गोड चिंचेच्या गोळ्या तयार
- या गोळ्या एअरटाईट डब्यात भरुन ठेवा.
चिंच खाण्याचे फायदे
shutterstock
चिंच खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. पण जेवणानंतर चिंचेच्या या गोळ्या खाल्ल्यानंतर अन्न पचण्यास मदत करते. तुमच्या पचनाची क्रिया सुरळीत झाल्यामुळे तुमच्या घशाशी तिखट किंवा करपट ढेकर येत नाही. चिंचाचे फायदे अनेक असले तरी त्याचे अति प्रमाणात सेवन करु नये. या गोळ्या दोन ते तीन खाणेच योग्य आहे. त्यापलीकडे खाल्ल्यास घसा खवखवू शकतो किंवा सर्दीदेखील होऊ शकते.
खिचडीचे 5 चविष्ट आणि पौष्टिक प्रकार नक्की करुन पाहा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.