केसांची वाढ होण्यासाठी किंवा केसांची वाढ जोमाने होण्यासाठी अनेक नैसर्गिक घटक फायदेशीर असतात. केसांच्या स्वच्छतेसाठी आजही खूप ठिकाणी शिकेकाई ( shikakai powder) चा उपयोग केला जातो. शिकेकाई ही एकप्रकारे नैसर्गिक साबण आहे. केसांची आयुर्वेदिक काळजी घेताना याचा समावेश होतो पण जर तुम्हाला त्याचा वापर करायचा असेल तर केसांसाठी त्याचा वापर करताना तुम्हाला शिकेकाईच्या पावडरमध्ये आणखी काही गोष्टींचा समावेश करावा लागतो. शिकेकाई पावडर घरी बनवण्यासाठी त्याच्याध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा वापर करावा आणि त्याचे प्रमाण कसे असावे ते जाणून घेऊया.
सुंदर केसांसाठी ट्राय करा रेडिमेड पण नॅचरल सप्लिमेंट्स
घरी अशी तयार करा शिकेकाई पावडर
शिकेकाई पावडर नुसती बनवण्यापेक्षा त्यामध्ये आणखी काही गोष्टी तुम्ही घातल्या तर तुम्हाला नक्कीच केसांच्या स्वच्छतेसोबत अन्य काही फायदे मिळतात. जाणून घेऊया ही पावडर नेमकी कशी बनवावी.
साहित्य : १ मोठी वाटी शिकेकाई पावडर, ½ वाटी आवळा, रिठा,कडीपत्ता पावडर
कृती :
बाजारात हल्ली या सगळ्या पावडर रेडिमेड मिळतात. पण जर तुम्हाला घरीच राहून या पावडर तयार करायच्या असतील तर तुम्ही ते घरीही बनवू शकता.
शिकेकाई घरात आणून चांगले वाळून घ्या. ती चांगली कडक झाली की,त्याची पूड करुन घ्या. अशाप्रकारे तुम्हाला आवळा, रिठा आणि कडीपत्त्याची पावडरही तुम्हाला अशीच पावडर सुकवून घरी करता येऊ शकते.
या सगळ्या पावडर एकत्र करुन तुम्हाला ही पावडर एअर टाईट कंडेनरमध्ये भरुन ठेवायची आहे. ज्यावेळी तुम्हाला केस धुवायचे असतील तर त्यावेळी कोरड्या हाताने तुम्हाला ते काढायचे आहे. ओल्या हातामुळे त्याचा गोळा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे ती खराब होईल.
केसांसाठी अशी वापरा शिकेकाई
केसांसाठी शिकेकाई वापरण्याचा विचा करत असाल तर तुम्हाला त्याचा वापर ही माहीत असायला हवा.
- एका भांड्यात दोन चमचे किंवा तुमच्या केसांना आवश्यक इतकी शिकेकाई पावडर घ्या. त्यात पाणी घालून केसांच्या स्काल्पला लावा.त्याचा चांगला मसाज करा. पाण्याने मस्त धुवून टाका. केस मोकळे होतील.
- केसांसाठी शिकेकाई वापरण्याआधी तुम्ही केसांना तेल लावा. केसांना तेल लावून मसाज केल्यानंतर मग वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे केस धुवा. त्यामुळेही केसांचे चांगले पोषण होईल.
शिकाकाईचे फायदे
शिकेकाईचे फायदे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. शिकेकाईचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला याचा फायगा कसा होतो ते जाणून घेऊया.
- केसांच्या वाढीला देते चालना
- केसांतून काढून टाते कोंडा
- केसांना देते चमक
- केसांना मिळते मजबूती
- केसगळती थांबवते
आता घरीच तयार करा केसांसाठी अशी शिकाकाई पावडर