नाश्त्यासाठी पराठा हा नेहमीच बेस्ट पर्याय असतो. कारण त्यामुळे तुमचे पोटही भरते आणि शरीराचे योग्य पोषणही होते. स्टफ बराठा करण्यासाठी बऱ्याचदा आपण आलू, पनीर, चीझ अथवा मिक्स व्हेजचा वापर करतो. ज्यामुळे शरीराला निरनिराळ्या भाज्या आणि त्यातील पोषकमुल्य मिळतात. ज्या भाज्या घरात खाल्ल्या जात नाहीत अशा भाज्या स्मॅश करून पराठ्यामध्ये स्टफ करता येतात. पण जेव्हा असा स्टफ पराठा तुम्ही लाटू लागता तेव्हा त्यातून सारण बाहेर पडून तुमचा पराठा तुटतो अथवा फुटतो. यासाठी पराठा योग्य पद्धतीने बनवण्याचे कौशल्य तुम्हाला माहीत असायला हवे. जर तुम्हाला परफेक्ट पराठा लाटायचा असेल तर यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा. ज्यामुळे तुमचा पराठा कधीच तुटणार नाही.
घरच्या घरी बनवा मऊ लुसलुशीत इडलीचे वेगवेगळे प्रकार (Idli Recipe In Marathi)
स्टफ पराठा बनवण्यासाठी सोपी टेक्निक
स्वयंपाक ही एक कला आहे. त्यामुळे या कलेत पारंगत होण्यासाठी काही कौशल्य आणि तंत्र तुम्हाला माहीत असायला हवीत. शांतपणे, कुशलतेने आणि काही सोप्या टेकनिकचा वापर करून तुम्ही कोणत्याही घटकांपासून अप्रतिम स्टफ पराठा बनवू शकता. मात्र पराठा तुटू अथवा फुटू नये यासाठी या काही टेक्निक तुम्हाला नक्कीच माहीत असायला हव्या. यासाठी जाणून घ्या स्टफ पराठा कसा बनवावा.
- पराठ्यासाठी तुम्ही जे कणीक मळणार आहात ते नेहमी ना घट्ट ना पातळ असे असावे. कारण फार घट्ट अथवा फारच पातळ कणीक मळलं तर त्यामुळे तुमचा पराठा तुटू शकतो. पराठा बनवण्यासाठी कणीक व्यवस्थित मळावे आणि अर्धा तास ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावे.
- पराठ्यासाठी कणीक मळताना फक्त गव्हाच्या पीठाचा वापर करू नये त्यामध्ये थोड्या प्रमाणात मैदादेखील मिसळावा. ज्यामुळे कणीक लवचिक बनते आणि पराठा फुटत नाही.
- पराठ्यासाठी मळलेल्या कणकेत थोडं मीठ मिसळावं. ज्यामुळे स्टफिंगमधील मिठाचे प्रमाण कमी होईल. स्टफिंगमध्ये जास्त मीठ झालं तर त्याला पाणी सुटून पराठा तुटण्याची शक्यता वाढेल. यासोबत वाचा चटपटीत आणि स्वादिष्ट राजमा रेसिपीज (Rajma Recipe In Marathi)
- पराठ्यासाठी पीठाची गोळी करून त्यात स्टफिंग भरताच पराठा लाटण्यास सुरूवात करू नये. आधी हाताने त्या पीठाच्या गोळ्याला थापून घ्यावे गोलाकार आकार आणि स्टफिंग आतमध्ये व्यवस्थित पसरले आहे याची खात्री झाल्यावर पीठावर पराठा लाटण्यास घ्यावा.
- पराठा लाटताना तो आधी काठाकडील भागाकडून मध्यभागाकडे लाटण्यास सुरूवात करावी. ज्यामुळे काठाकडील भाग व्यवस्थित लाटला जाईल. जर तुम्ही मधून पराठा लाटण्यास सुरूवात केली तर पराठ्यामधील सारण काठाकडे सरकून पराठा फुटू शकतो.
पनीरपासून बनवा चटपटीत पदार्थ, पनीर रेसिपी मराठीमध्ये (Paneer Recipes In Marathi)
आम्ही शेअर केलेल्या या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा स्टफ पराठा कधीच तुटणार अथवा फुटणार नाही. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट मध्ये जरूर कळवा.