ADVERTISEMENT
home / आरोग्य
शौचाला होत नसेल तर

शौचाला जाण्याची वेळ सतत बदलत असेल तर … असा करा बदल

पोटाचे आरोग्य बिघडले की, आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. पोट साफ होणे हे सर्वस्वी आपल्या खाण्यावर अवलंबून असते. पण काही जणांना पोट साफ होण्याचा त्रास असतो. खूप जणांना शौचाला रोजच्या रोज होत नाही. त्यांना आठवड्यातून दोन वेळा किंवा तीनवेळा शौचाला होते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल यात काहीही शंका नाही. कारण शौचाला रोज जायला हवे हे आपण जाणतो. पण काही जणांना शौचाला रोजच्या रोज होत नाही.तर सतत शौचाला जाण्याच्या त्यांच्या वेळा या देखील वेगळ्या असतात. पण जर वेळा बदलत राहिल्या तर पोट खराब होऊ लागते. तुमच्याही शौचाला जाण्याच्या वेळा बदलत असतील तर तुम्ही असे सोपे उपाय करा.

भरपेट नाश्ता

सकाळचा आहार उत्तम असेल तर तुम्हाला सकाळीच पोट साफ होण्यास मदत मिळते. खूप जण घरातून उपाशी पोटी बाहेर पडतात. त्यामुळे पोटात असलेला मल: बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो. जर तुम्हाला सकाळीच शौचाला जाऊन दिवस चांगला करायचा असेल तर तुम्ही भरपेट नाश्ता करायला हवा. सकाळच्या नाश्त्यामध्ये चपाती- भाजी किंवा पोहे-उपमा असे असेल तर तुम्हाला पोट भरण्यास मदत मिळते. म्हणून सकाळी उठल्यानंतर दररोज नाश्ता करा. त्यामुळे तुम्हाला उर्जा मिळते शिवाय तुमचे पोट साफ होण्यास मदत मिळते.

केळ्याचे सेवन

केळ्याचे सेवन

केळी ही पोट साफ होण्यासाठी उत्तम असा उपाय आहे. केळ्यामुळे पोट लवकर भरते आणि त्यामुळे पोटातून घाण सहज बाहेर फेकली जाते. जर तुम्हाला एक दिवस आड शौचाला होत असेल तर तुम्ही केळी खा. एक केळे खाल्ले तरी देखील तुम्हाला पोटावर ताण आल्यासारखा जाणवेल. तुमचे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळेल. तुम्हाला केळी आवडत नसतील तरी देखील तुम्ही एखादे केळे दिवसातून एकदातरी खाण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे तुमच्यामध्ये झालेला हा बदल तुम्हाला नक्की जाणवेल.

भरपूर पाणी प्या

पाणी हे शरीरासाठी खूपच उत्तम असते काही जणांना काही केल्याशौचाला होत नसेल तर अशांनी पाण्यायचे सेवन करायला हवे. पोट साफ करुन मगच तुम्हाला बाहेर पडायल आवडत असेल तर तुम्ही पाणी प्या. पाणी जितके जास्त पिता येईल तितके पाणी तुम्ही प्यायला हवे. असे केल्यामुळे शौचाला होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला दोन ते तीन दिवस शौचाला होत नसेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुमच्या शौचाला घाण वास येतो. तसेच शौचास जोर काढून जावे लागते. पाणी प्यायल्यामुळे शौचाला पटकन होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला तरीही काही होत नसेल तर तुम्ही गरम पाणी प्यायले तरी देखील चालू शकेल.

ADVERTISEMENT

चाला

चाला

 सौचाला होण्यासाठी तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही चालायला हवे. कधी कधी तुम्ही चालण्यामुळेही पोटात चिकटून राहिलेली घाण बाहेर पडण्यासही मदत मिळते. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही थोड्यावेळासाठी पाणी पिऊन किंवा खाऊन चालायला घ्या. त्यामुळे तुमचे पोट हलके होण्यास मदत मिळेल. रात्री जेवल्यानंतर शतपावली फायदे देणारी असते. कारण त्यामुळेही जेवण पचून ते खाली जातेचाला

आता शौचाला जाण्याची वेळ सतत बदलत असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करु शकता.

15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT