ADVERTISEMENT
home / आरोग्य
health benefits of shatpavli in Marathi

रात्री जेवल्यानंतर चालण्याचे फायदे, यासाठी करावी शतपावली

माणसाने दैनंदिन जीवनात कसे आचरण करावे याबद्दल आयुर्वेदात योग्य मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. मात्र आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात ही जीवनशैली आचरणात आणणं काहिसं कठीण नक्कीच आहे. यात निरोगी आरोग्यासाठी दुपारी जेवल्यानंतर थोड्यावेळ वामकुक्षी आणि रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. शतपावली म्हणजे कमीत कमी शंभर पावले चालणे… रात्री असं शतपावली करण्याचे अनेक चांगले फायदे शरीरावर होतात. यासाठीच जाणून घ्या का करावी शतपावली.

शतपावली करण्याचे महत्त्व

health benefits of shatpavli in Marathi

काही संशोधनानुसार रात्री शतपावली करणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असल्याचं आढळून आलेलं आहे. कारण रात्री जेवल्यानंतर थोडावेळ चालण्यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यात मदत होते. शिवाय शतपावली केल्यामुळे रात्री शांत आणि चांगली झोप लागते. ह्रदयाच्या आरोौग्यासाठी रात्री जेवल्यानंतर चालणे फायदेशीर ठरू शकते. 

सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi)

मानसिक स्वास्थ सुधारते 

रात्री जेवल्यानंतर चालणे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कारण चालण्यामुळे तुमच्या शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि मनाला आराम मिळतो. जर तुम्हाला सतत कामाची चिंता सतावत असेल, मूड चेंज होत असेल, नात्यातील ताणतणाव वाढला असेल तर रात्री जेवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट्स चालण्याचा सराव करा आणि मगच झोपी जा.

ADVERTISEMENT

जाणून घ्या सकाळी लवकर उठण्याचे फायदे – Sakali Lavkar Uthane Ke Fayde

मधुमेहींसाठी उत्तम 

मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक उपाय करावे लागतात. पण जर तुम्ही रात्री जेवल्यानंतर चालण्याची सवय स्वतःला लावली तर तुमच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहू शकते. मात्र याचा अर्थ इन्शुलीन बंद करणे असा होत नाही. योग्य औषधोपचारांसोबत चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमच्या औषधांचे प्रमाण कालांतराने नक्कीच कमी होऊ शकते.

शांत झोप लागते 

आजकालची आधुनिक जीवनशैली इतक्या धावपळीची आहे की त्यामुळे माणसाला पुरेशी झोप घेण्यासही वेळ मिळत नाही. ज्याचा परिणाम हळूहळू झोप न येणे, अनिद्रा असे त्रास वाढू लागतात. जर तुम्हाला शांत झोप मिळावी असं वाटत असेल तर कमीत कमी रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्याची सवय लावा. सकाळच्या घाईत जरी तुम्हाला वॉकला वेळ नसेल तरी रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे शरीराला आराम आणि मनाला शांतता मिळू शकते. 

वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling In Marathi)

ADVERTISEMENT

पचनशक्ती सुधारते

आजकाल बऱ्याच जणांना उशीरा जेवायची आणि जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय असते. या जीवनशैलीमुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात. पोटात गॅस होणे, खाल्लेले अन्न न पचणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता हे त्रास यामुळे वाढू लागतात. पण जर तुम्ही रात्री जेवल्यानंतर वॉक करत असाल तर तुमच्या या समस्या नक्कीच कमी होतात.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना रात्री जेवल्यानंतर, झोपल्यावर अनेकांना बीपी शूट झाल्याचा त्रास होतो. अशा वेळी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी शतपावली करणे लाभदायक ठरू शकते. कारण रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.  

22 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT