ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
दूध उकळताना उतू जाऊ नये यासाठी सोप्या टिप्स

दूध उकळताना उतू जाऊ नये यासाठी सोप्या टिप्स

दूध गरम करून ठेवले की ते जास्त वेळ टिकते. यासाठीच स्वयंपाक घर आवरताना सर्वात महत्त्वाचं असतं की दूध गरम करून मग ते थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवणे. दूध गरम करताना गॅसजवळ थांबून ते उकळू लागताच लगेच गॅस बंद करावा लागतो. मात्र कामाच्या गडबडीत बऱ्याचदा गॅसवर उकळत ठेवलेले दूध उतू जाते आणि मग गॅस स्वच्छ करण्याचे आणखी एक काम करावे लागते. शिवाय या सर्वात दूध उतू गेल्याने नुकसान तर होतेच. थोडक्यात काय तर दूध गरम करणे ही एक मोठे जोखमीचे काम असते. जे प्रत्येकाला दिवसभरात एक ते दोनवेळा पार पाडावे लागते. दूध उतू जाऊ नये यासाठी महिलांना नेहमी काही ना काहीतरी शक्कल लढवावी लागते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्ही गॅसवर दूध गरम करताना निश्चिंत राहू शकता.

दूध उतू जाऊ नये यासाठी सोप्या टिप्स

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात दूध गरम करण्याचे कुकर मिळतात. ज्यामध्ये पाणी भरण्याची व्यवस्था असते. अशा कुकरमध्ये पाणी भरून दूध उकळत ठेवल्यास दूध कधीच उतू जात नाही. कुकरच्या शिटीचा आवाज तुम्हाला नकोसा असेल तर तुम्ही स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध गरम करू शकता. मात्र पातेल्यात दूध गरम करताना काही गोष्टी तुम्हाला पाळायला हव्या.

  • पातेल्यात दूध गरम करण्यापूर्वी त्यात थोडे थंड पाणी टाका. कारण पाणी टाकल्यामुळे दूधाचा थेट संबध भांड्यासोबत येत नाही आणि भांड्याला दूध चिकटत नाही.
  • दूध गरम करताना कधीच गॅस हाय फ्लेमवर ठेवू नये कारण त्यामुळे दूध पटकन उकळून बाहेर पडते. त्याऐवजी गॅस कमी फ्लेमवर असेल तर दूध उकळण्यास वेळ लागतो आणि दूध उतू जात नाही.
  • दूध गरम करताना ते काठोकाठ भरून गॅसवर ठेवू नये. जर दूध अर्धा लीटर असेल तर ते गरम करण्याचे भांडे  कमीत कमी एक लीटरचे असावे.
  • दूधाच्या भांड्याच्या कडांना तूपाचा अथवा बटरचा  हात लावावा ज्यामुळे दूध उतू जाणार नाही आणि भांड्याच्या कडेला लागणार नाही. 
  • दूध गरम होताना ते उकळू लागताच त्यावर काही थेंब पाणी शिंपडा ज्यामुळे दूध भांड्यांच्या बाहेर उतू जाणार नाही.
  • धातू हा उर्जेचे उत्तम वाहक असते मात्र लाकूड उर्जेचे वाहक नाही. त्यामुळे दूध गरम होत असताना भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा. ज्यामुळे दूध भांड्यातून उतू जाणार नाही.
  • दूधाच्या भांड्यात दूध उकळत असताना एखादी वाटी ठेवावी. वाटी दूध उकळत असताना गोल गोल फिरू लागते. ज्यामुळे दुध त्या दिशेने प्रवाहित होते आणि भांड्यातून बाहेर पडत नाही.
  • दूध मोठ्या प्रमाणावर गरम करायचे असेल तर दोन भांड्यात गरम करा. यासाठी मोठ्या उथळ भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि त्यात एक छोटे आणि उभट भांडे  ठेवून त्यात दूध गरम करा
  • दूध गरम करताना त्यामध्ये चमचा अथवा पळी ठेवल्यास दूध पटकन उकळून वर येत नाही आणि उतू जात नाही. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

मिरची कापल्यावर हाताची जळजळ होऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स

लोणच्याला बुरशी येते, जाणून घ्या लोणचं टिकवण्याच्या टिप्स

इडली स्पॉंजी होण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Soft and Spongy Idli Recipe In Marathi)

09 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT