रवा आणि मैदा असे पदार्थ गोड पदार्थ, फराळाच्या पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. दिवाळीआधी यासाठी सर्वांनी वाणसामानामध्ये रवा, मैदा, बेसन नक्कीच जास्त प्रमाणात विकत घेतलं असेल. फराळ केल्यानंतर आता उरलेलं साहित्य तुम्ही नाश्ता अथवा स्वयंपाकासाठी नक्कीच वापरू शकता. मात्र त्यासाठी ते व्यवस्थित टिकवणं गरजेचं आहे. कारण हे पदार्थ असे आहेत की ते काही दिवस तसेच पडून राहिले तर त्यामध्ये कीड लागण्याची शक्यता असते. यासाठी रवा, मैद्याला कीड लागू नये यासाठी या टिप्स करा फॉलो
पॅकेजिंग बदला
फराळ केल्यावर वापरलेला रवा, मैदा अथवा बेसन त्याच पाकीटात गुंडाळून ठेवण्याची काहींना सवय असते. असं केल्यास असे पदार्थ बाहेरील हवेच्या संपर्कात येऊन नरम पडतात. ओलाव्यामुळे अशा पदार्थांना लगेच कीड लागू शकते. यासाठीच वापर झाल्यावर रवा, मैदा पाकीटातून बाहेर काढा आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा.
डबा असावा हवाबंद
तुम्ही ज्या डब्यात रवा, मैदा भरून ठेवला आहे. तो डबा हवाबंद असणं खूप गरजेचं आहे. कारण जर त्याला हवा लागली तर डब्यातदेखील कीडे होऊ शकतात. यासाठी शक्य असल्यास रवा, मैद्यासाठी काचेच्या घट्ट झाकणाच्या बरण्या वापरा.
खुसखुसशीत शंकरपाळे कसे करावे, सोप्या टीप्स
तेजपत्ताचा करा वापर
रवा आणि मैदा जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही ही युक्ती वापरू शकता. तुम्ही रवा अथवा मैदा ठेवलेल्या डब्ब्यामध्ये तेजपत्ताचे पान वापरू शकता. ज्यामुळे त्या पदार्थांना कीड लागणार नाही. कडूलिंबाच्या पानांनीदेखील कीड लागत नाही. पण कडुलिंबाच्या पानांमुळे रवा अथवा मैदा कडू होईल असं तुम्हाला वाटत असेल तर डब्याच्या बाजूने कडुलिंबाची पाने ठेवा. रवा भाजून डब्यात भरून ठेवल्याने तो लवकर खराब होत नाही.
दिवाळीचा फराळ करण्यापूर्वी कसा ओळखाल भेसळयुक्त मैदा
फ्रीजमध्ये ठेवा
जर तुम्हाला सतत रवा, मैदा स्वच्छ करणं अथवा त्याची काळजी घेणं जमणार नसेल. तर सोपा उपाय म्हणजे रवा, मैदा असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे. कारण फ्रीजमध्ये ठेवल्याने अशा पदार्थांना लवकर कीड लागत नाही. तुम्ही अनेक महिने अशा पद्धतीने रवा, मैदा टिकवून ठेवू शकता. मात्र आरोग्याच्या दृष्टीने असं करणं योग्य नाही त्यामुळे शक्य असल्यास लवकर रवा आणि मैदा संपेल याची काळजी घ्या.
स्टफ पराठा फुटत असेल तर लाटताना हे टेक्निक करा फॉलो