लग्नकार्य अथवा सणासुदीला हातावर मेंदी काढण्याची प्रथा आहे. नववधूच्या हातावर खास डिझाईनची मेंदी काढली जाते. मेंदी आवडत नाही असं म्हणणारी महिला दुर्मिळच असू शकते. कारण किशोरवयीन मुलगी असो वा साठीच्या वयातील आजी प्रत्येकीला हातावर मेंदी काढायला आवडतं. मेंदीचा रंग जितका गडद तितकं नवऱ्याचं प्रेम जास्त अशी मान्यतादेखील भारतात आहे. त्यामुळे प्रत्येक सणासुदीला महिला हातावर मेंदी काढतात. पण मेंदी काढताना ती बऱ्याचदा नखांवर लागते आणि त्यामुळे नखांवर केशरी रंग चढतो. मेंदीमुळे नखांवर लागलेले डाग काढायचे असतील तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. यासोबतच वाचा हातावरील मेंदी गडद रंगण्यासाठी घरगुतीपण परिणामकारक उपाय
मीठाचा करा वापर
मीठामुळे अन्नपदार्थांना जशी चव मिळते तसंच ते स्वच्छतेचा घटक म्हणूनही लोकप्रिय आहे. अनेक गोष्टी स्वच्छ आणि निर्जंतूक करण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. जर तुम्हाला तुमच्या नखांवर लागलेले मेंदीचे डाग काढायचे असतील तर काही वेळ मीठाच्या पाण्यात हात बुडवून ठेवा. वीस मिनीटे हात मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्यास नखे आणि हातावरील मेंदीचे डाग कमी होतात. मात्र लक्षात ठेवा त्यानंतर हातांना चांगले मॉइस्चराईझर लावण्यास विसरू नका. मेंदी लावल्यावर केस होत असतील कोरडे, तर वापरा सोप्या टिप्स
ऑलिव्ह ऑईल आणि मीठ
हातावर मेंदी काही दिवसांनी निघून जाते. मेंदी निघताना ती एकसाथ न निघाल्यामुळे हात आणि नखांवर मेंदीचे विचित्र डाग दिसू लागतात. जर तुम्हाला मेंदी पूर्ण स्वच्छ करायची असेल आणि नखांवरील मेंदीचे डाग काढायचे असतील तर दोन चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडं मी मिसळा आणि कापसाच्या मदतीने हातावर चोळा. या पद्धतीने हातावर मसाज केल्यास तुमच्या हात आणि नखांवरील मेंदीचे डाग नक्कीच निघतील.
या कारणासाठी लग्नात नववधूच्या हातावर काढली जाते मेंदी
गरम पाणी
नखांवरील मेंदीचे डाग काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे गरम पाणी वापरणे. तुम्ही गरम पाण्याने हात आणि नखांवरील मेंदी काढून टाकू शकता. मात्र लक्षात ठेवा यासाठी कडक गरम पाण्यात हात बूडवू नका. कोमट पाण्यात वीस मिनीटे हात बुडवून ठेवा. ज्यामुळे तुमच्या हात आणि नखांवरील मेंदीचे डाग कमी होतील.
टुथपेस्ट आहे उत्तम
टुथपेस्टने नखांवरील मेंदी काढायची हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण हा उपाय मेंदी काढण्यासाठी अगदी बेस्ट आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री तुम्ही दात घासताना थोडी टुथपेस्ट तुम्ही तुमच्या नखांवर लावू शकता. टुथपेस्टमध्ये क्लिझिंग घटक असल्यामुळे नखांवरील मेंदीचे डाग यामुळे नक्कीच कमी होतात.