चेहऱ्यावर एखाद दुसरा तीळ ब्युटी स्पॉट म्हणून असेल तर तो सौंदर्याचा एक भाग ठरतो. पण त्यापेक्षा जास्त तीळ अथवा चामखीळ जर तुमच्या चेहऱ्यावर असतील तर तुम्हाला नक्कीच ते चांगले वाटत नाहीत. पार्टी अथवा कोणत्याही कार्यक्रमात जाण्यापूर्वी तुम्ही हे तीळ मेकअपने लपवू तर शकता पण यापासून तुमची सुटका मात्र होत नाही. काळ्या आणि ब्राऊन रंगाचे दिसणारे हे तीळ मऊ तसेच टणक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. तसंच काही तीळ लहान तर काही तीळ मोठ्या आकाराचेही असतात. वयानुसार तुमच्या शरीरावरील काही तीळ आपोआप निघून जातात तर काही तीळ तसेच राहतात अथवा वाढतातदेखील. काही मुलींना अशा स्वरूपाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा डॉक्टर्स तीळ आणि चामखीळ काढण्यासाठी सर्जरी करण्याचा सल्ला देतात. पण तुम्ही यासंदर्भात घाबरण्याची गरज नाही. कारण सर्जरी न करतादेखील तुम्हाला घरच्या घरी उपाय करून तुम्हाला नको असणारे हे तीळ घालवता येतात. पण त्याआधी जाणून घेऊया नक्की आपल्या शरीरावरील तीळ असतात तरी कसे? या लेखातून चेहऱ्यावरील तीळ घालवण्यासाठी उपाय (chamkhil upay) जाणून घ्या.
शरीरावर तीळ आणि चामखीळ येण्याची कारणे | Causes Of Moles And Warts In Marathi
आपल्याला नक्की प्रश्न सतावतो की, तीळ अंगावर येण्याची नक्की कारणं काय आहेत? (chamkhil ka yetat) आपण कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर आता जाणून घेऊया –
शरीरावर तीळ अथवा चामखील असण्यामागे अनेक कारणं आहेत. वास्तविक जेव्हा त्वचेची छिद्रं पसरण्याऐवजी एकत्र येतात तेव्हा त्या जागी तीळ तयार होतात. मेलनोसाईट्ससारख्या पेशी असतात त्या मेलनिनचे पिगमेंट्स तयार करतात. आपण जन्माला येतो तेव्हापासूनच काही तीळ आणि चामखीळ हे आपल्या शरीरावर असतात. तर काही काही वेळा चेहरा अथवा शरीरावर येणारे तीळ हे अनुवंशिक अथवा तुमच्या शरीरातील हार्मोनल बदलामुळे येतात. हे तीळ कोणत्याही प्रकारचा त्रास शरीराला होऊ देत नाहीत. पण कधी कधी सौंदर्यामध्ये यामुळे बाधा नक्कीच येते. तुम्हाला जर शरीरावर जास्त प्रमाणात अचानक तीळ येऊ लागले तर यावर कोणताही उपाय करायचा असेल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डर्मेटॉलॉडिस्टचा सल्ला घ्या. कारण हे एखाद्या मोठ्या आजाराचंदेखील लक्षण असू शकतं. यावर घरच्या घरी काय उपाय करता येईल पाहूया.
चेहऱ्यावरील तीळ जाण्यासाठी उपाय | Til Ghalvnyache Upay In Marathi
बऱ्याचदा तुम्हाला डॉक्टर तीळ आणि चामखीळ काढून टाकण्यासाठी सर्जरीचा सल्ला देतात. पण त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्ही हे तीळ घरच्या घरी उपचार करूनदेखील काढू शकता. काही जण मेणबत्ती अथवा अगरबत्ती हे काढण्याचा प्रयत्न करतात. तर असं काहीतरी भयानक करण्याची खरंच गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात असणाऱ्या पदार्थांचा वापर करूनही तुम्ही हे तीळ काढून टाकू शकता. पाहूया कोणते आहेत हे पदार्थ –
लसूण चेहऱ्यावरील तीळ घालवते
लसूण ही केवळ खाण्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे. लसणीच्या पाकळ्या तुम्हाला नेहमीच तुमच्या सौंदर्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
कसा वापर करावा –
- लसणीच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करा
- तुमच्या तीळ अथवा चामखीळावर लावून रात्रभर त्यावर कॉटनचा कपडा टाकून तसंच राहू द्या
- सकाळी आंघोळ करून धुवा
- चांगल्या परिणामांसाठी हे आठवड्यातून तीन वेळा तुम्ही करू शकता
कांद्याचा रस लावून चेहऱ्यावरील तीळ जाते
कांद्याच्या रसाचा उपयोग खाण्यात होतो. त्याचप्रमाणे तुमचे केस अतिशय मऊ आणि मुलायम राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. पण तुम्ही तुमच्या अंगावरील तीळ काढून टाकण्यासाठीही याचा सोप्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकता.
कसा वापर करावा –
- कांदा कापून त्याचा रस काढून घ्या
- तीळ असणाऱ्या ठिकाणी किमान एक तास लावून ठेवा
- थंड पाण्याने धुवा
- दिवसातून तुम्ही हा प्रयोग 2-3 वेळा करू शकता
कोरफड लावल्याने चेहऱ्यावरील तीळ जाते
कोरफड ही अनेक आजारांवर उपयोगी औषध आहे. यामध्ये त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार ठेवण्याचे पोषक तत्व असतात. त्याचप्रमाणे तीळ आणि चामखीळ घालवण्याची किमयादेखील कोरफड करतं.
कसा वापर करावा –
- सर्वात पहिले तीळ असणारी त्वचा साफ करून घ्या
- नंतर ताजी कोरफड जेल तीळ आणि चामखीळावर लावा आणि किमान एक तासासाठी बँडएडने बांधून ठेवा
- दिवसातून दोन वेळा तुम्ही असं केल्यास, तुम्हाला लवकरच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल
एप्पल साईड व्हिनेगर तीळ घालवण्याचा उत्तम उपाय
कोणत्याही घरगुती उपायामध्ये अॅप्पल साईड व्हिनेगरचं नाव येणार नाही असं शक्यच नाही. व्हिनेगरमधील अॅसिडिटी तुमच्या शरीरावर तीळ सुकवून टाकण्याचं काम करते. त्यामुळे याचा परिणाम तीळ काढून टाकण्यासाठी लवकर होतो.
कसा करावा वापर –
- व्हिनेगरमध्ये कापूस भिजवून ठेवा
- नंतर तो पिळून तुमच्या तीळ असणाऱ्या ठिकाणी लावा
- 5-6 तास बँडएडने होल्ड करा आणि नंतर धुवा
केळं (Banana) तीळ घालवण्यासाठी उपाय
केळ्याचेदेखील खाण्याशिवाय अनेक फायदे आहेत. विशेषतः त्वचेसाठी केळ्याचे अधिक उपयोग करण्यात येतात. त्वचा उजळण्यासाठी केसांची चमक वाढवण्यासाठीही याचा उपयोग करण्यात येतो.
कसा करावा वापर –
- केळ्याचा भाग स्मॅश करून तीळाच्या भागावर लावा
- रोज असं केल्यास लवकरच अंगावरील तीळ निघून जातील
कॅस्टर ऑईल चेहेर्यावरील तीळ घालवण्यासाठी उपाय
अनेक तेलांमधून कॅस्टर ऑईलचा त्वचेसाठी खूपच चांगला उपयोग होत असतो. नैसर्गिक स्वरूपात पटकन तीळ घालवण्यासाठी याची मदत होते. तसंच तीळ तर निघून जातातच पण त्याचा कोणताही डाग या तेलामुळे राहिलेला दिसून येत नाही.
कसा करावा वापर –
- 2 चमचे बेकिंग सोड्यामध्ये साधारण 2-3 थेंब कॅस्टर ऑईल मिसळून पेस्ट तयार करून घ्या
- कापसाच्या मदतीने ही पेस्ट तुम्ही तीळ असणाऱ्या ठिकाणी लावा आणि रात्रभर बँडएडने झाकून ठेवा
- सकाळी तुम्ही आंघोळ करताना धुवा
अननसाचा रस तीळ वर लावल्याने फरक पडतो
अननसामध्ये जास्त प्रमाणात अॅसिड असतं जे तुमच्या शरीरावर तीळ काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतं. तुम्ही अननसाच्या रसाचा नियमित वापर केल्यास, तुम्हाला तीळाची समस्या नक्कीच पुढे त्रासदायक ठरणार नाही.
कसा करावा वापर –
- अननसाचे काप घ्या आणि तीळ असणाऱ्या ठिकाणी काही वेळ घासा अथवा अननसाचा रस कापसाच्या मदतीने तुमच्या तीळ असणाऱ्या ठिकाणी घासा
- काही काळ तसंच ठेवून थोड्या वेळाने पाण्याने धुवा
फ्लॉवरचे तुकड्यांचा रस तीळ घालवण्यासाठी फायदेशीर
तुम्हाला हे वाचून थोडं आश्चर्य वाटेल. पण या भाजीने तुमचे तीळ घालवण्यासाठी मदत होते. यामध्ये असणारं विटामिन सी हे तुमच्या शरीरावरील तीळ काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं.
कसा करावा वापर –
- फ्लॉवरचे तुकडे करून त्याचा रस काढून घ्या
- हा रस तुम्ही तुमच्या तीळ आणि चामखीळवर लावा आणि किमान अर्धा तास तसाच राहू द्या
- थंड पाण्याने नंतर धुवा
स्ट्रॉबेरी – Til Ghalvnyache Upay In Marathi
स्ट्रॉबेरीचं आईस्क्रिम तर आपण प्रत्येकजण आवडीने खात असतो. पण स्ट्रॉबेरीचा उपयोग असादेखील करता येऊ शकतो याची आपल्याला कल्पना नसते. स्ट्रॉबेरीमधील असणाऱ्या पोषक तत्वामुळे तीळ काढून टाकण्यास मदत होते.
कसा करावा वापर –
- स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घ्यावे
- हे तुकडे तीळ असणाऱ्या ठिकाणी चोळावे
- काही दिवस सतत असं करत राहिल्यास तीळ निघून जातात
आंबट लस्सी तीळ घालवण्यास मदत करेल
आंबट लस्सीचा तुम्हाला यासाठी उपयोग करून घेता येतो. यामुळे तुम्हाला तीळ पटकन काढून टाकण्यास मदत होते.
कसा करावा वापर –
- आंंबट लस्सी घेऊन तुम्ही ती तीळ असणाऱ्या ठिकाणी लावा आणि किमान 10-15 मिनिट्स मसाज करा
त्यानंतर तो भाग व्यवस्थित सुकू द्यावा - एका बाजूला ग्लिसरीन आणि गुलाबपाणी व्यवस्थित प्रमाणात मिसळून ते त्यावर लावा
- एक तास तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने धुऊन टाका
बटाटा हा चेहऱ्यावरील तीळ घालवण्यासाठी उपाय आहे
बटाटा हा तुमच्या त्वचेवरील काळे डाग काढायला उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे याचा उपयोग तीळ काढण्यासाठीही उपयोग करून घेता येतो. यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे गुणधर्म असतात.
कसा करावा वापर –
- बटाट्याचे काप करून तीळ असणाऱ्या ठिकाणी चोळावे
- काही वेळ तसंच राहू द्या. बँडएडने तो भाग कव्हर करा
- किमान 4-7 दिवस असं रोज करा. बँडएडसह तीळ आपोआप निघून जाईल
लिंबाचा रस हा उत्तम उपाय आहे तीळ घालवण्यासाठी
लिंबू हा असा पदार्थ आहे जो तुमच्या सौंदर्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरत असतो. लिंबामध्ये असणारं विटामिन सी हे तुम्हाला तीळ काढण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसंच लिंबू हे नैसर्गिक ब्लिचींग आहे.
कसा करावा वापर –
- लिंबाच्या रसामध्ये कापसाचा बोळा बुडवून घ्या
- तीळ असणाऱ्या ठिकाणी लावा आणि टेप लावून ठेवा
- 20 मिनिट्सनंतर काढा आणि दिवसातून दोन वेळा तुम्ही हा उपाय करा आणि त्याचा चांगला परिणाम पाहा
वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स
टी ट्री ऑईल तीळ घालवण्यासाठी गुणकारी आहे
टी ट्री ऑईलचे अनेक फायदे आहेत. मुळात हे नैसर्गिक तेल असल्याने याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे याचा चांगला फायदा होतो.
कसा करावा वापर –
- कापसाचा बोळा टी ट्री ऑईलमध्ये बुडवून पिळून घ्यावा
- तीळ असणाऱ्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ ठेवावा
- दोन आठवडे रोज दिवसातून 2-3 वेळा हा प्रयोग करावा
ओरेगॅनो ऑईल तीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय आहे
काही जणांनी कदाचित या तेलाचं नावही ऐकलं नसेल. पण बाजारामध्ये तुम्हाला हे सहज प्राप्त होतं. सर्जरी करण्यापेक्षा या तेलाचा तीळ काढण्यासाठी खूपच सोप्या पद्धतीने उपयोग होतो.
कसा करावा वापर –
- 1-2 थेंब ओरेगॅनो ऑईल आणि 1-2 थेंब कॅस्टर ऑईल व्यवस्थित मिक्स करून घ्या
- हे तीळाच्या ठिकाणी लावा आणि मसाज करा. ते शरीरात मुरू द्या. धुऊ नका
- दिवसातून किमान 2-3 वेळा हा प्रयोग करा
आयोडिन तीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय आहे
हा अतिशय परिणामकारक उपाय आहे. तुम्ही नियमित याचा वापर केल्यास, तुम्हाला नको असलेले तीळ काढून टाकणं सहज सोपं आहे.
कसा करावा वापर –
- तीळावर तुम्ही डायरेक्टली आयोडिनचा वापर करू शकता
- सुरक्षेसाठी तुम्ही तीळाच्या आजूबाजूच्या त्वचेवर पेट्रोलियम जेली लावू शकता
- तीळ जाईपर्यंत आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता
मध (Honey) – Home Remedies to remove mole in marathi
मध हा नैसर्गिक औषधोपचार आहे. याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. याचा वापर करणंही अतिशय सोपं आहे. तसंच मध कायम आपल्या घरामध्ये असतो. हा खिशालादेखील परवडण्याजोगा पर्याय आहे.
कसा करावा वापर –
- तीळावर तुम्ही कच्चा मध लावून बँडएडने कव्हर करून घ्या
- एक तास तसंच ठेवून नंतर बँडएड काढा
- नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा
- दिवसातून जास्तीत जास्त वेळा हा प्रयोग तुम्ही करू शकता
सौंदर्य आणि आरोग्यवर्धक आहे मध, जाणून घ्या फायदे
हळद तीळ घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय आहे
हळद हा आपल्या घरातील अनादी काळापासून चालत आलेला बऱ्याच गोष्टींवरील घरगुती उपचार आहे. यामुळे तुमचे तीळही काढून टाकायला मदत होते हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. पण तुम्ही आता हळदीचादेखील यासाठी उपयोग करून पाहू शकता.
कसा करावा वापर –
- विटामिन सी ची गोळी एक चमचा हळद पावडरमध्ये नीट मिक्स करून घ्या. त्यामध्ये अगदी थोडा मध मिसळा
- ही पेस्ट आता तुमच्या तीळ असणाऱ्या ठिकाणी लावा
- 15-20 मिनिट्सनंतर व्यवस्थित सुकल्यावर थंड पाण्याने धुवा
कोथिंबीर तीळ घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय आहे
कोथिंबीरचा उपयोग खाण्यासाठी आपल्याला पटकन करता येतो. पण तीळ आणि चामखीळ काढण्यासाठीही याचा महत्त्वाचा उपयोग आपल्याला करून घेता येतो.
कसा करावा वापर –
- कोथिंबीरची पाणी घालून पेस्ट करून घ्या
- ही पेस्ट तीळ असणाऱ्या ठिकाणी लावा आणि साधारण 10 मिनिट्स ठेवा आणि नंतर धुवा
नारळाचे तेल तीळ घालवण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे
नारळाचं तेलदेखील कायम आपल्या घरात असतं. याच्यासारखा सोपा उपाय तुम्हाला शोधून सापडणार नाही. तुम्ही याचा उपयोग तीळ काढण्यासाठी अगदी घरबसल्या करू शकता.
कसा करावा वापर –
- तुम्हाला फक्त दोन थेंब नारळाचं तेल तुमच्या तिळांवर लावायचं आहे आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे
- रोज सकाळ आणि रात्री हे असं वापरून त्याचा परिणाम पाहा
बेकिंग सोडा हा तीळ घालवण्यासाठी फायदेशीर आहे
बेकिंग सोड्याचे खाण्यातील फायदे आपल्याला माहीतच आहेत. बेकिंग सोडा तीळ कोरडा करायला मदत करतो. त्यामुळे तीळ पटकन निघून येण्यास मदत होते.
कसा करावा वापर –
- अर्धा चमचा बेकिंग सोड्यामध्ये 2-3 थेंब कॅस्टर ऑईल मिसळा
- ही पेस्ट तुमच्या तीळावर लावा आणि बँडएडने रात्रभर कव्हर करून ठेवा
- रोज रात्री तुम्ही असंच करा. लवकरच याचा परिणाम दिसून येईल.
FAQ’s – चेहऱ्यावरील तीळ घालवण्यासाठी उपाय | Til Ghalvnyache Upay In Marathi
1. तीळ आणि चामखीळ याचा संबंध गुडलकशी जोडण्यात येतो का?
डॉक्टर तर नक्कीच असं काही सांगत नाहीत. मात्र सामुद्रीक शास्त्रानुसार आपल्याला तीळसंदर्भात असं सांगण्यात येतं. प्राचीन चायनीज फेशियल मोल अर्थात तीळाचा अभ्यास करतात आणि त्यांच्याप्रमाणे तीळ हे गुडलक असतात. पण या गोष्टी तुम्ही किती मानता यावर अवलंबून आहेत.
2. तीळ अथवा चामखीळ कापून काढून टाकता येऊ शकतो का?
तीळ अथवा चामखीळ खूप मोठा असेल तर अगरबत्ती जाळून हलक्या हाताने तीळावर लावून पटकन बाजूला घ्या. यामुळे काही दिवसात तीळ सुकून पडेल. पण यामुळे तुमची त्वचा जळण्याची भीती राहाते. त्यामुळे असा उपाय करण्यापेक्षा घरगुती उपाय केलेले जास्त चांगले.
3. तीळ घालवण्याचे इतर कोणते उपचार आहेत का?
तीळ घालवण्यासाठी डॉक्टर्स सर्जरी करायला सांगतात. पण आम्ही सांगितलेले घरगुती उपचार वापरून तुम्ही हे तीळ घालवण्याचा प्रयत्न करू शकता.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या लिंकवर क्लिक करा.
देखील वाचा –