ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
चेहऱ्यासाठी Face Razor निवडताना या गोष्टीं आहेत महत्वाच्या

चेहऱ्यासाठी Face Razor निवडताना या गोष्टीं आहेत महत्वाच्या

आपलं संपूर्ण शरीर केसाने भरलेले असते. काहींना शरीरावर खूप जास्त केस असतात तर काहींना विरळ. शरीरावर केस कितीही कमी असले तरी प्रत्येक महिन्याला चांगले दिसण्यासाठी आपल्याला वॅक्सिंग हे करावेच लागते. वॅक्स करणे हे कितीही फायद्याचे असले तरी काहींना वॅक्स केल्यामुळे त्वचेसंदर्भात अनेक त्रास होतात. त्वचेवर पुरळ येणे, त्वचा लाल होणे, सैल होणे असे अनेक त्रास उद्भवू लागतात. त्यामुळेच वॅक्सला कंटाळून अनेकजण त्वचेवरील केस काढण्यासाठी रेझरचा उपयोग करतात. चेहऱ्यावरील केस रेझरने काढायचा विचार करत असाल तर हल्ली चेहऱ्यासाठीही खास रेझर मिळते. कारण पुरुषांप्रमाणे महिलांची त्वचा नसते. त्यावरील केस कितीही जाड असले तरी देखील त्वचा ही नाजूक असते. चेहऱ्यावर वॅक्स करण्याचे काही दुष्परिणाम आहेत. त्यामुळे तुम्ही जर रेझरचा उपयोग करणार असाल तर Face Razor निवडताना तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहूया.

चेहऱ्यावरील केस काढताय? मग माहीत करुन घ्या या महत्वाच्या गोष्टी

Face Razor ची निवड करताना

Face Razor  निवडताना

Instagram

ADVERTISEMENT
  • फेस रेझर निवडताना किंमत जास्त किंवा कमी अशा म्हणजे त्याची निवड करायला जाऊ नका. कारण अनेकांना किंमत जास्त तो रेझर चांगला असे वाटते. पण तसे करण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन एखाद्या प्रोडक्टचा रिव्ह्यू वाचून मगच त्याची निवड करा. 
  • फेस रेझर हा नेहमी बारीक असायला हवा. कारण शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत आपला चेहरा लहान असतो. त्यावर असलेले बारीक बारीक केस काढण्यासाठी त्याचा ब्लेडही बारीक हवा. ज्यामुळे तुम्हाला घरीच आयब्रोजदेखील करता येतात. 
  • काही रेझर हे फारच धारदार असतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेझरचे ब्लेड हे खडबडीत हवेत. त्यामुळे तुम्हाला दाढीच्या रेझरसारख्या दुखापती होणार नाहीत. 
  • रेझर निवडताना त्याचा वापर किती वेळा करता येईल ते देखील तपासा. कारण काही रेझर हे फक्त एकाच वापरासाठी असतात. त्याचा पुन्हा वापर करुन बचत करणे त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. त्यामुळे रेझर घेताना ही गोष्ट ही लक्षात घ्या आणि बजेट चेक करा. 
  • फेसरेझरचा उपयोग हा चेहऱ्यावरील म्हणजेच अप्परलीप्स, गालावरील आणि कपाळावरील केस काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो. याशिवाय हनुवटीवरील केस काढण्यासही याची मदत मिळते. 

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

असा करा फेस रेझरचा वापर

रेझरचा वापर करताना

Instagram

कोणत्याही रेझरचा उपयोग चेहऱ्यासाठी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ही काळजी तुम्ही संपूर्ण शरीरावरील केस रेझरच्या मदतीने काढताना करु शकता 

ADVERTISEMENT
  • चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहऱ्यावरील अतिरिक्त पाणी काढून चेहरा थोडा ओलाच ठेवा. 
  • केसांच्या दिशेने रेझ फिरवून खाली आणा. गरज असल्यास पुन्हा रेझरचा वापर करा. एखादा केस राहिला म्हणून सतत रेझरचा वापर करणे टाळा. त्यामुळे चेहरा लाल होऊ शकतो.  शिवाय तुमच्या चेहऱ्याची त्वचा कोरडी होऊन ती त्रासदायकही ठरु शकते.
  • केस काढून झाल्यानंतर चेहऱ्यावर आवडते मिस्ट,गुलाबपाणी किंवा अॅलोवेरा जेल लावा. चेहऱ्याची जळजळ कमी होईल. 

आता Face Razor  निवडताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या.

चेहऱ्यावरील फॅट कमी करतील हे सोपे व्यायामप्रकार

11 Sep 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT