ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
मसाला डबा

किचनमध्ये मसाल्याचा डबा असायला हवा असा

किचनमध्ये  मसाल्याचा डबा हा महत्वाचे काम करत असतो. कारण रोजच्या जेवणासाठी मसाल्याच्या डब्याचा वापर केला जातो. घरात मसाल्याचा डबा कसा असायला हवा हे देखील माहीत असायला हवा. खूप जणांना किचनमध्ये फॅन्सी डबे आवडतात. पण ते रोजच्या वापराला कसे असायला हवे ते देखील माहीत असायला हवे. आज किचनमध्ये  मसाल्याचा डबा नेमका कसा असायला हवा ते जाणून घेऊया. शिवाय मसाल्याच्या डब्यामध्ये नेमकं काय असायला हवं ते देखील जाणून घेऊया

मसाल्याचा डबा आणि आकार

Instagram

हल्ली बरेच फॅन्सी डबे मिळतात. पण पारंपरिक मसाल्याचा डबा हा गोलाकार आकाराचा  असायचा. गोल डबे हे नक्कीच चांगले दिसतात. आणि त्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थितही राहतात. गोलाकार डब्यामध्ये तुम्हाला गोल डबे मिळतात. त्यामुळे त्यामध्ये मसाला एकदम नीट राहतो. खूप जणांकडे मसाल्याचा असा डबा नक्कीच असेल. मसाल्याच्या डब्याचे झाकण हे पारदर्शक असते. स्टील किंवा पितळेच्या प्रकारात मिळणारा हा मसाल्याचा डबा तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही. 

(गोलाकार डबा नीट वापरणे गरजेचे असते. जर हा डबा नीट ठेवला  नाही तर मसाल्याच्या डब्यातून मसाला इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. )

लाकडाचा मसाला डबा

Instagram

हल्ली खूप ठिकाणी आयताकृती  आकाराचा मसाला डबा मिळतो. हा मसाल्याचा डबा खूप जणांकडे असतो. लाकडाच्या स्वरुपातील हा डबा दिसायला फार सुंदर दिसतो. पण लाकडाचा डबा हा आत ट्रॉली बॉक्समध्ये ठेवता येत नाही. कारण त्या डब्याला मुळीच ओलावा चालत नाही. जर या डब्याला ओलावा लागतो. त्यावेळी यामधील मसाले ओले होतात.  त्यामुळे जर तुम्ही ओट्यावर मसाल्याचा डबा ठेवणार असाल तर तुम्हाला असा मसाल्याचा डबा घेतला तरी चालू शकेल. मसाल्याच्या या डब्यामध्ये वेगवेगळे आकार मिळतात. लहान-मोठे आणि तुम्ही कोणते मसाले ठेवणार यानुसार तुम्ही मसाल्याचा डबा निवडा.

ADVERTISEMENT

प्लास्टिकचा मसाला डबा

Instagram

चांगला मसाल्याचा डबा हल्ली अनेकांना हवा असतो. जास्ती काळ टिकणारा आणि एअर टाईट अशा प्रकारातील हा डबा खूप जणांच्या किचनसाठी परफेक्ट आहे. कारण खूप जणांना घरात किचनमध्ये वावर कमी असतो. मसाल्याच्या डब्यातील दर्प जाऊ नये यासाठी एअर टाईट डबे हे फार बरे पडतात. मसाल्याचा डबा जर तुम्ही घेतला तर तो उघडताना अनेकांना अडचणी येतात. जर तुम्ही फार वेंधळे असाल तर तुम्ही प्लास्टिकचा डबा अजिबात घेऊ नका. कारण  त्यामुळे मसाले मिक्स होण्याची शक्यता असते. 

मसाल्याच्या डब्याची ही गोष्टही हवी तुम्हाला माहीत

  1.   हातात मावणार नाही असे मसाला डबा अजिबात निवडू नका. खूप मोठा मसाला डबा हे अजिबात घेऊ नका.
  2.   मसाल्याचे झाकण सैल नको. जर झाकणं सैल असतील तर डबा पडण्याची शक्यता असते. 
  3. मसाल्याच्या डब्यामध्ये खडे मसाले ठेवू नका  कारण त्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होण्याची शक्यता असते. 
  4.  मसाल्याचा डबा हा योग्यवेळी धुवायला हवा. तरच तो मसाल्याचा डबा जास्त काळ चांगला राहतो. 

आता किचनमध्ये मसाल्याचा डबा निवडताना तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या

अधिक वाचा

किचन सेट करायचा विचार करत असाल तर या गोष्टी ठेवा लक्षात

ADVERTISEMENT


तांदळाला कीड लागत असेल तर करा सोपे उपाय

स्वयंपाघरातील तेलकट, चिकट डाग असे करा कमी

18 Oct 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT