ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
plus size bridal lehenga

प्लस साईज नवरीने ब्रायडल लेहंगा निवडताना घ्या काळजी

लग्नाच्या दिवशी प्रत्येक मुलीला अधिक सुंदर आणि आकर्षक दिसायचं असतं. लग्नामध्ये साडी कशी नेसायची याबाबत तर सर्वांना माहीत आहे. सहसा लग्नात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या (type of sarees) नेसल्या जातात. पण प्लस साईज महिलांना (plus size women) मात्र लग्नामध्ये लेहंगा घालताना काही अडचणी येऊ शकतात. जेव्हा अशा महिलांना लग्नात लेहंगा घालायचा असतो तेव्हा त्यांना आपण अधिक आकर्षक दिसावे असे वाटत असते. त्यामुळे जेव्हा प्लस साईज महिलांना आपल्या लग्नासाठी लेहंगा निवडायचा असतो तेव्हा त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लग्नामध्ये प्रत्येक मुलगी ही आकर्षकच दिसते आणि त्यासाठीच तिचा प्रयत्न असतो. आपण अधिक जाड आहोत म्हणून लेहंगा घालायचाच नाही असं अजिबात करू नका. लेहंगा घालूनही तुम्ही अधिक सुंदर दिसू शकता. प्लस साईज नवरीने (Plus size bride) लेहंगा निवडताना (wedding lehenga) काही काळजी घ्यावी आणि आम्ही दिलेल्या टिप्स फॉलो कराव्यात.

लेहंग्याचा रंग (lehenga colour)

Instagram

कोणत्याही आऊटफिटचा आणि विशेषतः नवरी जे आऊटफिट घालणार असेल त्याचा रंग अत्यंत महत्त्वाचा असतो. बरेचदा आपल्याला अनेक रंग दिसायला आवडतात पण काही रंग असे असतात जे आपल्याला आवडले तरीही ते आपण घातल्यावर आपल्यावर चांगले दिसत नाहीत. प्लस साईज नवरीसाठी लग्नात गदड रंगाचा लेहंगा अधिक चांगला दिसतो. गडद रंगाच्या लेहंग्यामध्ये अशा महिला अर्थात प्लस साईज महिला या अधिक बारीक दिसतात आणि तो रंग तुम्हाला अधिक आकर्षक दिसतो आणि उठावदार दिसतो. 

ब्लाऊजची नेकलाईन (Blouse Neckline)

आधुनिक लुकसाठी बऱ्याचदा अनेक महिला ऑफ शोल्डर (Off Shoulder) आणि हॉल्टर नेक स्लीव्ह्ज (Halter Neck Sleeves) घालण्याला प्राधान्य देतात. पण प्लस साईज महिलांना अशा स्वरूपाच्या नेकलाईनपासून वाचणं गरजेचे आहे. ब्लाऊजचा नेकलाईन डीप नेक ब्लाऊज, स्क्वेअर, व्ही शेप (V Shape Blouse) अशा स्वरूपाचे तुम्ही लेहंग्यासाठी वापरू शकता. लेहंग्यासाठी पारंपरिक स्वरूपाचा ब्लाऊज तुम्ही वापरणे जास्त चांगले ठरते. प्लस साईज महिलांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की, लहंगा आणि ब्लाऊज या दोन्हीमध्ये जास्त अंतर असू नये. तसंच तुमची पाठ जास्त दिसू नये याचीही काळजी घ्या. जेणेकरून तुम्ही बारीक दिसाल. 

फिश शेप लेहंगा घालू नका 

फिश शेप लेहंग्यामध्ये (Fish Shape Lehenga) तुमच्या शरीराचा आकार उठून दिसतो. पण बारीक असणाऱ्या मुलींनाच हा लेहंगा अधिक चांगला दिसतो. प्लस साईज महिलांना अजिबातच फिश शेप लेहंगा चांगला दिसत नाही. कारण यामध्ये पार्श्वभाग (hips) अधिक मोठे दिसतात. तर अशा महिलांना लेहंग्याचा ब्लाऊज हा कोपऱ्यापर्यंत घातला तर अधिक उठावदार दिसतो. तसंच अशा महिला बारीक दिसायला मदत मिळते. नवरी म्हणून तुम्ही फोटोमध्ये अधिक बारीक दिसायला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लेहंग्याची स्टाईल करा. 

ADVERTISEMENT

लेहंग्याची लांबी (Lehenga Height)

Instagram

प्लस साईज महिलांसाठी ब्रायडल लेहंग्याची लांबी ही जास्त असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही नवरी म्हणून लेहंगा घालणार असाल तेव्हा तुम्ही लग्नाआधी लेहंगा नक्की घालून बघायला हवा. तसंच तुम्ही या लेहंग्याची उंची जास्त ठेवावी. जेणेकरून तुमची जाडी लपली जाईल. तसंच तुम्ही जो लेहंगा घालणार आहात त्याखाली घालण्यात येणारे हिल्स दिसत नाही ना याचीही तुम्ही काळजी घ्या. तुमच्या पायातील हिल्स दिसणार नाहीत आणि ते लपले जातील इतकी लेहंग्याची लांबी असणे गरजेचे आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT