धावपळीच्या युगात आणि कोरोना संकटाच्या काळात दररोज भाजी विकत आणण्यासाठी घराबाहेर जाणं नक्कीच शक्य नाही. मग यावर उपाय हाच की भाज्या एकदाच आणून त्या नीट साठवून ठेवाव्या. कांदा, लसूण हे प्रकार तर आपण वारंवार खरेदी करत नाही. पण ते खरेदी केल्यावर नीट साठवून ठेवणं फार गरजेचं असतं, नाहीतर तर ते सडून खराब होऊ शकतात. पण स्वयंपाकाचा वेळ वाचावा यासाठी तुम्ही लसूण सोलून ठेवत असाल तर तो साठवून ठेवण्याची युक्ती तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवी. लसूण खाण्याचे फायदे अनेक आहेत.
जाणून घ्या लसूण कसा साठवून ठेवावा –
लसूण तुम्ही निरनिराळ्या प्रकारे साठवून ठेवू शकता. यासाठी या सोप्या टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहेत.
स्वच्छ आणि कोरड्या वातावरणात साठवा –
लसूण साठवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो निवडून आणि स्वच्छ करून हवेशीर बास्केटमध्ये अथवा जाळीच्या बॅगेत भरून ठेवणे. मध्यम आर्द्रता असलेल्या वातावरणात साठ ते पासष्ट डिग्रीवर लसूण सोलून ठेवणं नक्कीच शक्य आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र अशा पद्धतीने लसूण खूप दिवस साठवून ठेवणं कठीण जातं. यासाठी मग ते या दिवसांमध्ये फ्रिजमध्ये साठवून ठेवावेत.
Shutterstock
फ्रिजमध्ये साठवताना या गोष्टी लक्षात ठेवा –
लसूण सोलून फ्रिजमध्ये ठेवणं हा ते टिकवण्याचा एक सोपा मार्ग आहे. फ्रिजमध्ये यासाठी क्रिस्पर ड्रॉवर असतात. पण तसं नसेल तर एखाद्या हवा मोकळी राहील अशा डब्यामध्ये तुम्ही लसूण फ्रिजमध्ये ठेवू शकता. पण लक्षात ठेवा एकदा फ्रिजमध्ये ठेवलेले लसूण तुम्ही फ्रिजमधून बाहेर काढल्यावर पुन्हा फ्रिजमध्ये ठेवण्यास विसरला तर त्यांना अंकुर फुटू शकतो. यासाठी जेवढे हवे तेवढ्याच लसणाच्या पाकळ्या हव्या तेव्हा बाहेर काढा. ज्यामुळे लसूण खूप दिवस फ्रेश राहतील.
फ्रिजरमध्ये कसा साठवाल लसूण –
जर तुम्हाला आणखी जास्त दिवस लसूण साठवून ठेवायचा असेल तर तो तुम्ही फ्रिजरमध्ये साठवून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला लसणाची प्यूरी करावी लागेल. लसणाची पेस्ट तुम्ही जास्त दिवस फ्रिजरमध्ये साठवून ठेवू शकता. या प्यूरीला आईस क्युब ट्रे अथवा चॉकलेटच्या सिलिकॉन ट्रेमध्ये ठेवून त्याच्या क्युब्स तुम्ही फ्रिजरमध्ये साठवून ठेवू शकता.
लसूण भाजून जास्त दिवस टिकवा –
लसणाच्या पाकळ्या भाजून ठेवल्याने त्या जास्त दिवस टिकतात. यासाठी तुम्ही त्या तव्यावर अथवा ओव्हरमध्ये भाजून फ्रिजरमध्ये साठवून ठेवू शकता. स्वयंपाक करण्यापूर्वी त्याचा वापर करा ज्यामुळे त्या फ्रेश राहतील आणि लसणाचा सुंगध खाद्यपदार्थांना मिळेल.
Shutterstock
असा साठवून ठेवा तेलात –
लसून पारंपरिक पद्धतीने साठवून ठेवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे लसूण तेलात साठवून ठेवणे. कोणत्याही खाद्य तेलामध्ये तुम्ही लसणाच्या पाकळ्या टाकून ठेवल्या तर त्या जास्तीत जास्त दिवस टिकू शकतात. पारंपरिक पद्धतीने लोणचं तयार करूनही तुम्ही लसूण साठवून ठेवू शकता. असं लोणचं अथवा तेलात साठवलेला लसूण स्वयंपाकाचा स्वाद आणखी वाढवतो.
आम्ही शेअर केलेल्या लसूण साठवून ठेवण्याच्या या पद्धती तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्ही कसा वापर केला हे आम्हाला आमच्या कंमेट बॉक्समध्ये जरूर सांगा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
जाणून घ्या सेंद्रिय शेतीचे फायदे (Benefits of Organic Farming In Marathi)